वाक्प्रचार व अर्थ – मराठी व्याकरण Vakprachar ani arth marathi grammar

वाक्प्रचार व अर्थ: मराठी व्याकरण वाचताना त्यातील शब्द संग्रह वाचणे अतिशय गरजेचे आहे. मराठी वाक्प्रचार व त्याचे अर्थ येथे तुम्हाला दिसतिल, त्यामुळे प्रत्येक वाक्प्रचार काळजीपूर्वक वाचा आणि त्याचा अर्थ लक्षात ठेवा जेणेकरून परीक्षेमध्ये यावर आधारित कुठलाही प्रश्न तुम्हाला विचारला तर तुमचा चुकायला नको. खाली मराठी व्याकरणाचे इतर काही टॉपिक दिलेली आहे ते देखील तुम्ही वाचू शकतात. आम्ही लिहिलेली माहिती किंवा आम्ही छोटासा केलेला प्रयत्न तुम्हाला आवडला असेल, तर तुम्ही कमेंट करू शकतात आणि ही लिंक तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचू शकतात.

मराठीतील काही वाक्प्रचार व त्यांचे अर्थ :

मराठी वाक्प्रचार मराठी अर्थ
आतल्या आत कुढणे मनातल्या मनात दुख करणे
अभाळाल कवेत घेणे मोठ काम साध्य करणे
बस्तान ठोकणे मुक्काम ठोकणे
देणे घेणे नसणे संबंध नसणे
डोक्यावर घेणे अति लाड कारणे
जळफळाट होणे रागाने लाल होणे
प्रतिबंध करणे अटकाव करणे
तजविय करणे तरतूद करणे
पाचवीला पूजणे एखादी गोष्ट जन्मापासून असणे
माशी शिंकणे असथडा येणे
सही ठोकणे निश्चित करणे
उच्छाद मांडणे धिंगाणा घालणे
हुडहुडी भरणे थंडी भरणे
बाल लावणे शक्ति खर्च करणे
अट्टहास करणे आग्रह करणे
निष्प्रभ करणे महत्व कमी करणे
पुनरुज्जीव करणे पुन्हा उपयोगात आणणे
मनोरथ पूर्ण होणे इच्छा पूर्ण होणे
अनानंद देणे देऊन टाकणे
चित्त विचलित होणे मूळ विषया कडून लक्ष्य दुसरीकडे जाणे
सख्य नसणे प्रेमळ नाते नसणे
पिंक टाकणे थुंकणे
नसती बिलमत येणे नसती कटकट ओढवणे
काळीज उडणे भीती वाटणे 
नाक मुठीत धरणे आगतीक होणे
दातखिळा बसने बोलती बंद करणे
हिसका दाखविणे  बळ दाखऊन हिम्मत लक्षात आणून देणे
कानशीलांची भाजी होणे गुच्च मारून मारून कानशीलांची आकार बदलणे
उताने पडणे पराभूत होणे
उसने बळ आणणे खोटी शक्ति दाखविणे
गाजावाजा करणे प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न करणे
मिनतवारी करणे दादा-पुता करणे
रक्षणाची काळजी घेणे योगक्षेम चालविणे
बारा गावाचे पानी पिणे विविध प्रकारचे अनुभव घणे
वेसण घालणे मर्यादा घालणे
साद घालणे मनातल्या मनात दु:ख करणे
विदीर्ण होणे भग्न होणे,मोडतोड होणे
संभ्रमित होणे गोंधळणे
कूच करणे वाटचाल करणे
अनभिज्ञ असणे (एखाद्या विषयाचे) मुळीच ज्ञान नसणे
पळत ठेवणे लक्ष्य
ऊहापोह करणे सर्व बाजूंनी चर्चा करून साधकबाधक विचार करणे
लाष्टक लावणे झंझट लावणे,निकड लावणे
चाहूल लागणे एखाद्याचे अस्तित्व जाणवणे
पडाव पडणे वस्ती करणे
तगादा लावणे पुनः पुन्हा मागणी करणे
खायचे वांधे होणे उपासमार होणे,खायला न मिळणे
भंडाऊन सोडणे त्रास देणे
कात्रीत सापडणे दोन्ही बाजूंनी संकटात सापडणे
सांजावणे संध्याकाळ होणे
भाऊबंदकी असणे नात्यानात्यात भांडण असणे
खितपट पडणे क्षीण होत जाणे
उताणा पडणे पराभूत होणे
उसने बळ आणणे खोटी शक्ति दाखविणे
नूर पातळ होणे रूप उतरणे
तोंड भरून बोलणे खूप स्तुति करणे
वाचा बंद होणे तोंडातून एक शब्दही बाहेर न पडणे
निक्षून सांगणे स्पष्टपणे सांगणे
भानावर येणे परिस्तितीची जाणीव होणे,शुद्धीवर येणे
ज्याचे नाव ते असणे उपमा देण्यास उदाहरण नसणे
साशंक होणे शंका येणे
दक्षता येणे काळजी घेणे
डोळे वटारणे रागाने बघणे
पोटात कावळे ओरडणे भुकेणे व्याकूळ होणे
फटफटणे सकाळ होणे
चिटपट करणे कुस्तीत हरविणे
उसंत मिळणे वेळ मिळणे
जीव वरखाली होणे घाबरणे
अंगावर काट येणे भीती वाटणे
बाजारगप्पा निंदा नालस्ती
धिंडवडे निघणे फजिती होण
कच्छपी लागणे नादी लागणे
कुणकुण लागणे चाहूल लागणे
डोळे लाऊन बसने खूप वाट पाहणे
जिवाची मुंबई करणे अतिशय चैनबाजी करणे
धारवाडी काटा बिनचूक वजनाचा कट
अठरा गुणांचा खंडोबा लाबाळ माणूस
पोटात ठेवणे गुप्तता ठेवणे
अंगी तथा भरणे मगरुरी करणे
अंगाला होणे अंगाला छान बसने
योगक्षेम चालविणे रक्षणाची काळजी वाहने
मिश्यांना तूप लावणे उगीच ऐट दाखवणे
काळ्या दगडावरची रेघ खोटे न ठरणारे शब्द 
गढून जाणे मग्न होणे , गुंग होणे
कणव असणे आस्था किंवा करुणा असणे
हातभार लावणे सहकार्य करने
पुढाकार घेणे नेतृत्व करणे
कटाक्ष असणे कल असणे ,भर असणे ,जोर असने
बांधणी करणे रचना करणे
भरभराट होणे प्रगती होने
वंचित राहणे एखादी गोष्ट न मिळणे
बडेजाव वाढवणे प्रौढी मिरवणे
काळजी घेणे चिंता वाहने
हेवा वाटणे मत्सर वाटणे
समजूत काढने समजावने
खंड न पडणे एखादे कार्य करतांना मध्ये न थांबणे
ताटकळत उभे राहणे वाट पाहणे
उपोषन करणे लंघन करणे
लवलेश नसणे जराही पत्ता नसणे
पहारा देने राखण करणे
गट्टी जमणे दोस्ती होणे
नजर वाकडी करणे वाईट हेतु बाळगणे
भान ठेवणे जाणीव ठेवणे
बाहू स्फुरण पावणे स्फूर्ति येणे
प्रघात पडणे रीत असणे
काळ्या पाण्याची शिक्षा मरेपर्यंत कैद होणे
परिसीमा गाठणे पराकोटीला जाणे
प्रभावित होणे छाप पडणे
आयोजीत करणे सिद्धता करणे
पार पडणे संपवणे
भरारी मारणे झेप घेणे
पसंती मिळणे अनुकूलता लाभणे
जम बसने स्थिर होणे
तारांबळ होणे घाईगडबड उडणे
अप्रूप वाटणे कौतुक वाटणे
वारसा देणे हक्क सोपवणे
नाळ तोडणे संबंध तोडणे
आडाखे बांधणे मनात आराखडा किंवा अंदाज करणे
छातीत धस्सदिशी गोल येणे अचानक खूप घाबरणे
परिपाठ असणे नित्य क्रम असणे
ठाण मांडणे एक जागेवर बसून राहणे
विरस होणे निराश होणे
चाहूल लागणे मागोवा लागणे
सुड घेणे   बदला
घेणे 
धडपड करणे खूप कस्ट करणे
ग्राह्य धरणे योग्य आहे असे समजणे
प्रतिष्टापित करणे स्तापणा करणे
अमलात आणणे करवाई करणे
दप्तरि दाखल होणे संग्रही जमा होणे
चक्कर मारणे फेरफटका मारणे
ठसा उमटवणे छाप पाडणे
प्राचारात आणणे जाहीरपणे माहिती देणे
घोकमपट्टि करणे अर्थ लक्ष्यात न घेता पाठ करणे 
धास्ति घेणे घाबरने
हसता हसता पोट् दुखणे खूप हसणे
कापरे सुटणे घाबरल्यामुळे थरथरणे 
डोळ्याला डोळा न भिडवने घाबरून नजर न देणे
विपर्यास होणे असंगत अर्थ लावणे
आंबुण जाणे विटून जाणे
लळा लागणे ओढ लागणे
आवर्जून पाहणे मुद्दामहून पाहणे
मती गुंग होणेआश्चर्य वाटणे
प्राणाला मुकणे जीव जाणे
तोंड देणे मुकाबला करणे
रोष ठेवणे चीड येणे
ललकारी देणेजयघोष करणे
अभंग असणेअखंड असणे
उत्पात करणे विध्वंस करणे
उदास होणे खिन्न होणे
देखरेख करणे राखण करणे
भ्रमण करणे भटकंती करणे
पदरी घेणे स्वीकार करणे
बेत करणे योजना आखणे
प्रक्षेपित करणे प्रसारित करणे
बत्तरबाळ्या होणे नासधूस होणे
खपणे कष्ट करणे
चिल्लेपिल्ले वाऱ्यावर सोडणे अनाथ करणे 
हंबरडा फोडणे मोठ्याने रडणे
देहातून प्राण जाणे मरण येणे
वणवण करणे खूप भटकणे
डोळ्यास धारा लागणे रडणे
भडभडून येणे हुंदके देणे
दिस बुडून जाणे सूर्य मावळणे
वजन पडणे प्रभाव पडणे
हशा पिकणे हास्यस्पोट होणे
मुखोद्गत असणे तोंडपाठ असणे
टिकाव लागणे निभाव लागणे
अभिलाषा धरणे एखाद्या गोष्टीची इच्छा बाळगणे
झुंज देणे लढा देणे
प्रतिकार करणे विरोह करणे
व्रत घेणे वसा घेणे
अंगी बानणे मनात खोलवर रुजणे
विसावा घेणे विश्रांती घेणे
दडी मारणे लपून राहणे
पाळी येणे वेळ येणे
डोळे फिरणे खूप घाबरणे
देखभाल करणे जतन करणे
रवान होणे निघून जाणे


मराठी व्याकरणाचे इतर टॉपिक

Marathi Grammar Topics

1] Marathi Varnmala [ मराठी वर्णमाला ]

2] Marathi Grammar Shabdanchya jati [ शब्दांच्या जाती ]

3] Marathi Vyakaran Sandhi  [ संधि ]

  • स्वरसंधी 
  • व्यंजनसंधी 

4] Marathi Grammar ling [ लिंग ]

5] Marathi  Grammar vachan [ वचन ]

6] Marathi Grammar Vibhakti [ विभक्ती ]

7]Marathi Grammar Prayog [ प्रयोग ]

8]Marathi Grammar Samaas [ समास ]

9] Marathi Grammar Alankar [ भाषेचे अलंकार ]

10] Marathi vyakaran vakprachar arth [ मराठी व्याकरण वाक्प्रचार अर्थ ]

11] Marathi Vyakaran mhani [ म्हणी ]

Leave a Comment