शब्दांच्या जाती – नाम आणि नामाचे प्रकार | Marathi Grammar Naam | Mpscpoint

Hello, welcome to mpscpoint.in website. 
You will get the Marathi Grammar Noun topic with notes. 
Marathi vyakaran – shabdanchya jati [Naam]

शब्दांच्या जाती :

शब्दांच्या आठ जाती आहेत.

नाम
सर्वनाम 
विशेषण
क्रियापद
क्रियाविशेषण
शब्दयोगी अव्यय
केवलप्रयोगी अव्यय
उभयान्वयी अव्यय

या पोस्टमध्ये आपण नाम या शब्दाच्या जाती बद्दल माहिती घेणार आहोत.

नाम

“प्रत्यक्षात असणार्‍या किंवा कल्पनेने जानलेल्या वस्तूंना किंवा त्यांचे गुणधर्म ना दिलेली जी नावे त्यांना व्याकरणात नामे असे म्हणतात.”

उदाहरणार्थ-

खरेपणा, औदार्य, पुस्तक, चेंडू, मुलगा, वामन, हरी, साखर, देव, स्वर्ग.


नामाचे प्रकार

नामाचे मुख्य तीन प्रकार आहेत 

  1. सामान्य नाम 
  2. विशेष नाम 
  3. भाववाचक नाम

तीनही प्रकार आपण स्‍पष्‍टीकरणासहित बघूया.


1. सामान्य नाम –

“एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला सर्वसामान्य नाव दिले जाते त्याला सामान्य नाम असे म्हणतात.”

उदाहरणार्थ –

घर, शाळा, नदी, मुलगा, शिक्षक.

मराठी मध्ये काही समुदाय वाचक नाम असतात.( उदाहरणार्थ- कळप, सैन्य, गड, समिती) यांना देखील सामान्य नाम असेच म्हणतात. तसेच जी पदार्थवाचक नाम असतात ( उदाहरणार्थ- तांबे, दूध, साखर, कापड ) यांना देखील मराठीत सामान्यनामातच मोडले जाते.


2. विशेष नाम-

“ज्या नामाने जातीचा बोध होत नसून, त्यातील एका विशिष्ट व्यक्तीचा प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध होतो त्यास विशेष नाम असे म्हणतात.”

उदाहरणार्थ –

सुजित, आशा, हिमालय, भारत, गंगा.


सामान्य नाम आणि विशेष नाम मधील मुख्य फरक:

सामान्य नाम हे एका समूहाला दिले जाते जसे – नदी. परंतु विशेष नामामध्ये नद्यांची नावे असतील जसे गंगा, सिंधू, तापी, चंद्रभागा, नर्मदा. अशाच स्वरूपामध्ये पर्वत हे सामान्य नाम आहे परंतु हिमालय, सातपुडा हे विशेषनाम आहेत. हा महत्त्वाचा फरक आहे.


3. भाववाचक नाम – 

ज्या नामाने प्राणी किंवा वस्तू यांच्या मध्ये असलेल्या गुणधर्म किंवा भाव यांचा बोध होतो त्याला भाववाचक नाम असे म्हणतात.

उदाहरणार्थ –

शूर, विर, महान, गुलामगिरी, धैर्य.

विशेष नामांना धर्मवाचक नाम असे देखील म्हणतात.


बऱ्याच वेळा सामान्य नाम विशेष नामाचे कार्य करते आणि विशेष नाम सामान्य नामाचे कार्य कर्ते.

खालील उदाहरण पहा-

शेजारची तारा यंदा बीकॉम झाली.

वरील वाक्यात तारा हे मूळचे सामान्य नाम आहे आणि या वाक्यामध्ये त्याचा उपयोग विशेष नाम म्हणून करण्यात आलेला आहे.

त्याचप्रमाणे,

अरुन कुंभकरणच दिसतो.

वरील वाक्यांमध्ये कुंभकर्ण हे मूळचे विशेषनाम आहे. परंतु इथे कुंभकर्ण हा शब्द म्हणजे अतिशय झोपाळू या अर्थाने वापरलेला आहे म्हणजे मूळची विशेषनामे वरील वाक्यात सामान्य नामाचे कार्य करतात.

काहीवेळा भाववाचक नामाचे उपयोग विशेष नामा सारखा केला जातो.

उदाहरणार्थ –

विश्वास अतिशय चांगला मुलगा आहे

वरील वाक्यात विश्वास हे भाववाचक नाम आहे परंतु वरील वाक्यामध्ये त्याचा उपयोग विशेषनाम म्हणून करण्यात आलेला आहे.

वरील उदाहरणांवरून असे दिसून येईल की सामान्यनामे व विशेषनामे व भाववाचक नामे एकमेकांचे कार्य करतात.

व्हिडिओ च्या माध्यमातून समजून घेण्यासाठी खाली दिलेला व्हिडिओ बघू शकतात.👍☺️


1 thought on “शब्दांच्या जाती – नाम आणि नामाचे प्रकार | Marathi Grammar Naam | Mpscpoint”

Leave a Comment