MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा भूगोल विषयाची तयारी कशी करावी ?


मित्रांनो, भूगोल हा राज्यसेवा पुर्व परीक्षेच्या दृष्टीने आतिशय महत्वाचा विषय आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षेला या विषयावर आधारित 14-15 प्रश्न हमखास असतात. म्हणजे 28-30 गुण मिळू शकतात आणि अभ्यास व्यवस्थित असेल तर गुण येणारच. तर या विषयाची तयारी कशी करावी यावर आपण बोलुयात.


भूगोल – राज्यसेवा पूर्व परीक्षा

एमपीएससी पूर्व परीक्षेला भूगोल मध्ये तुम्हाला :

  1. जगाचा भूगोल
  2. भारताचा भूगोल
  3. महाराष्ट्र चा भूगोल,

यावर आधारित प्रश्न असतात. कोणत्या subtopic ला किती गुण असतात हे खालील तक्त्यामध्ये देण्यात येत आहे. त्या chart चे फक्त निरीक्षण करा.म्हणजे तुम्हाला कळेल की कोणता टॉपिक जास्त महत्त्वाचा आणि कोणता कमी महत्वाचा.

मागील वर्षी भूगोल विषयाचे विचारण्यात आलेले प्रश्न :

(तक्ता खाली दिलेला आहे. ) 

एमपीएससी राज्यसेवा पूर्व भूगोला साठी कोणती पुस्तके वाचावी.

योग्य पुस्तके वाचणे अतिशय महत्वाचे आहे. बाजारात शेकडो पुस्तके आहेत पण ती सर्वच आपल्या कामाची नाही किंवा आपल्याला उपयुक्त नाही . म्हणून कोणती पुस्तके महत्वाची आहेत याची यादी देत आहे.

11 वी भूगोल दोन्ही NCERT 

(यातून तुमचा प्राकृतिक भाग कव्हर होईल आणि भारताचा आणि काही प्रमाणात जगाचा भूगोल कव्हर होईल.)

Note : जर तुम्ही मराठीतून तयारी करत असाल आणि ncert खूपच कठीण जात असतील तर मार्केट मध्ये इंद्रजित राठोड सर, शारदा प्रकाशनाचे प्राकृतिक भूगोल 11 वी NCERT वर आधारित पुस्तक छान आहे. त्यात सर्व संकल्पना मराठीत दिलेल्या आहेत.

महाराष्ट्राचा भूगोल A B सवदी सर

यातून महाराष्ट्राशी संबंधित सर्व पार्ट कव्हर होतो.

जगाच्या भुगोलावर महाराष्ट्र भूगोलाचा तुलनात्मक दृष्ट्या कमी प्रश्न येतात. त्याविषयी काही न वाचलेले बरे.

भारताचा भूगोल साठी भगीरथ प्रकाशनाचे बुक वापरू शकता ( पुरेसा वेळ असल्यास )

एखाद्या टॉपिक ला असलेले गुणदान लक्षात घेऊनच अभ्यास करा. सरावाला महत्व द्या. त्यासाठी लोकसेवा २१००० घेऊ शकता. टेस्ट paper सोडवा. 

अश्या प्रकारे वर सांगितलेली माहिती जर तुम्ही तंतोतंत पाळली तर नक्कीच 20+ गुण मिळू शकतात. धन्यवाद.! 

Leave a Comment