शब्दांच्या जाती – विशेषण आणि प्रकार | Marathi Grammar Visheshan | Mpscpoint

Marathi Grammar – Visheshan


Hello, welcome to mpscpoint.in website. 
You will get the Marathi Grammar Noun topic with notes. 
Marathi vyakaran – shabdanchya jati [Naam]


विशेषण

“नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दास विशेषण असे म्हणतात. “

उदाहरणार्थ-

हिरवे गवत
काळे मांजर
भरपूर धान्य

वरील अंडरलाईन केलेले शब्द ही त्यात या नामाची विशेष माहिती सांगत आहे म्हणून त्यांना विशेषण असे म्हणतात.


विशेषण हा घटक अभ्यासताना दोन महत्त्वाच्या संकल्पना तुम्हाला माहित असायला हव्यात,

विशेषण आणि विशेष्य

ज्या नामाबद्दल विशेषण अधिक माहिती सांगते त्यांना मला विशेष्य असे म्हणतात. ज्याचे वर्णन केले जाते ते विशेष्य तर वर्णन करणारा शब्द विशेषण असतो. 

जसे वरील तीन उदाहरणांमध्ये गवत, मांजर आणि धान्य हे विशेष्य आहेत.

आता आपण विशेषणाचे प्रकार अभ्यास करूयात.


विशेषणाचे प्रकार

विशेषणांचे मुख्य तीन प्रकार आहेत

  1. गुण विशेषण 
  2. संख्या विशेषण 
  3. सार्वनामिक विशेषण


या मुख्य प्रकार व्यतिरिक्त पुढील तीन प्रकार आहेत.

  1. नामसाधित विशेषण
  2. सर्वनामीक विशेषण  
  3. धातुसाधित विशेषण 
  4. अव्ययसाधित विशेषण
  5. परिणाम वाचक विशेषण 
  6. समास घटित विशेषण 

प्रथमता आपण गुणविशेषण विषयी अधिक माहिती बघू

1.गुण विशेषण

“जे विशेषण वापरून एखाद्या नामाचा गुण किंवा विशेष दाखविला जातो त्या विशेषणाला गुण विशेषण असे म्हणतात.”

उदाहरणार्थ- शूर राजा, रेखीव चित्र, निळासावळा झरा.



2.संख्या विशेषण

“जे विशेषण वापरून नामाची संख्या दर्शवले जाते त्या संख्याविशेषण असे म्हणतात.”

संख्या विशेषणाचे पाच प्रकार पडतात.

अ) गणनावाचक संख्याविशेषण 

ब) क्रम वाचक संख्या विशेषण 

क) आवृत्ती वाचक संख्या विशेषण 

ड) पृथकत्ववाचक संख्या विशेषणे

ई) अनिश्चित संख्या विशेषण

वरील संख्या विशेषण यांच्या प्रकारांची त्यांच्या नावानुसार अर्थ आहेत ते आपण खालील प्रमाणे बघू या.

अ) गणनावाचक संख्याविशेषण 

दहा मुले, सत्तर रुपये, अर्धा तास

वरील शब्दांमध्ये दहा, सत्तर, अर्धा या विशेषणाचा उपयोग केवळ गणना करण्यासाठी होतो, म्हणून त्याला गणनावाचक विशेषण असे म्हणतात.


ब) क्रमवाचक संख्या विशेषण 

दुसरा वर्ग, आठवी इयत्ता, साठावे वर्ष

वरील शब्दांमध्ये दुसरा, आठवी, साठावे ही विशेषणे वस्तूंचे क्रम दाखवतात म्हणून त्यांना क्रमवाचक विशेषण असे म्हणतात.


क) आवृत्तीवाचक संख्या विशेषण

चौकट आंबे, दुहेरी भिंत

वरील शब्दांमध्ये चौपट दुहेरी ही विशेषणे संख्येची किती वेळा पुनरावृत्ती झाली हे दाखवतात त्यांना आवृत्ती वाचक संख्या विशेषण म्हणतात.

 

ड) पृथकत्व वाचक संख्या विशेषण 

एकेक मुल, बारा बाराचा गट

वरील शब्दांतील एकेक बारा बरांचा ही विशेषणे वेगवेगळा असा बोध करून देतात अशा विशेषणांना पृथकत्ववाचक संख्या विशेषणे असे म्हणतात.


ई) अनिश्चित संख्या विशेषण

सर्व मोटारी, थोडी फुले, इतर लोक

वरील शब्दांतील सर्व थोडी इतर ही संख्या विशेषणे निश्चित अशी संख्या दाखवत नाही म्हणून त्यांना अनिश्चित संख्या विशेषण असे म्हणतात. वरील उदाहरणे जर तुम्ही बघितली तर त्यामध्ये एखादी संख्या ही निश्चित नाही सर्व म्हणजेच ही एक संच दाखवणारी संख्या आहे विशिष्ट अशी संख्या नाही त्यामुळे अनिश्चित संख्या विशेषण होते.


3. सार्वनामिक विशेषण

माझे पुस्तक, असल्या झोपड्या, तो पक्षी

वरील शब्दांतील माझे, असल्या, तो ही मूळची सर्वनामे आहेत. सर्वनाम नाम एवजी येत असते, पण वरील शब्दात सर्वनामा पुढे नावे आलेली आहेत, म्हणून ती आता सर्वनामे नसून त्यांच्या पुढे आलेले जी नाव आहेत त्या नामान बद्दल विशेष माहिती सांगतात, म्हणून ती विशेषणाची कार्य करतात.

या सर्वाना मनापासून बनलेल्या विशेषणनांना  सार्वनामिक विशेषण किंवा सर्वनाम साधित विशेषण असे म्हणतात.

सर्वनाम हे विशेषण म्हणून मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, या स्वरूपात न येता, माझा, तुझा ,त्याचा, आमचा ,तुमचा, तिचा या स्वरूपामध्ये येत असते.


तर वरील तीन प्रकार विशेषणाचे मुख्य प्रकार आहेत


जेव्हा इतर शब्दांचा  विशेषण या प्रमाणे उपयोग होतो, तेव्हा त्यांचे खालील प्रकार पडतात

नामसाधित विशेषणे

एखाद्या नामाबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी जेव्हा दुसर्‍या एखाद्या नामातच वापर केला जातो तेव्हा त्यास नाम साधित विशेषण असे म्हणतात.

नितीन चे कापड दुकान आहे.

मला कोल्हापुरी चप्पल परिधान करायला आवडते.


सार्वनामिक विशेषण

एखाद्या नमन बद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी नामा पूर्वी सर्वनामाचे उपयोग केल्यास अशा सर्वणामास सार्वनामिक विशेषण म्हणतात.

असला  मुलगा चांगला म्हटला जाणार नाही.

हा आमचा बैल आहे.


धातुसाधित विशेषणे

क्रियापदातील जो मूळ शब्द असतो त्याला धातू असे म्हणतात. धातूंना प्रत्येक जोडून त्यांचा नमापूर्वी विशेषण सारखा उपयोग होतो.

पिकलेला पेरू
पेटती ज्योत
वाहती नदी

वरील विशेषणात पिकलेला, पेटती, वाहती हे धातू आहेत.


अव्ययसाधित विशेषणे

वरचा मजला, मागील मोटार, पुढची गल्ली


परिणाम वाचक विशेषण

संख्येत न मोजता येणाऱ्या नामापूर्वी वापरलेल्या प्रमाण दर्शक शब्दांना परिणाम वाचक विशेषण म्हणतात.

काही तेल, थोडे पाणी


समास घटित विशेषण

सामासिक शब्दांचा सुद्धा विशेषण याप्रमाणे वापर केला जातो.

पंचमुखी हनुमान

नवरात्र महोत्सव


अशाप्रकारे विशेषणाचे इतर सहा प्रकार पडतात.

Leave a Comment