मराठी वर्णमाला – मराठी व्याकरण नोट्स Marathi Varnmala grammar Notes

येथे तुम्हाला मराठी वर्णमाला – मराठी व्याकरण या टॉपिक च्या नोट्स देत आहे, You will get Marathi grammar – Varnmala notes.


मराठी वर्णमाला 

तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनीला वर्ण असे म्हणतात. बोलतांना आपले मूलध्वनी हवेत विरू नयेत म्हणून आपण लिहून ठेवतो. ज्या सांकेतिक खुणांनी आपण मूलध्वनी लिहून ठेवतो त्या सांकेतिक खुणेला ध्वनिचिन्हे किंवा अक्षर असे म्हणतात. अक्षर म्हणजे नष्ट न होणारे. मराठी भाषेत एकूण ५९ वर्ण आहेत. या वर्णाच्या मालिकेलाच वर्णमाला किंवा मुळाक्षरे असे म्हणतात.

मराठी वर्णमाला

अ, आ, ॲ, ऑ, इ, ई, उ, ऊ, ऋ, लॄ, ए, ऐ, ओ, औ, अं, अ:

क, ख, ग, घ, ङ, 

च, छ, ज, झ, ञ, 

ट, ठ, ड, ढ, ण, 

त, थ, द, ध, न, 

प, फ, ब, भ, म, 

य, र, ल, व, श, ष, स, ह, ळ, क्ष, ज्ञ


एकूण स्वर – 14 [अ, आ, ॲ, ऑ, इ, ई, उ, ऊ, ऋ, लॄ, ए, ऐ, ओ, औ ]

एकूण स्वरादी –  2 [ अं, अ: ]

एकूण व्यंजने – 34 [ क ते ज्ञ ]


स्वरांचे प्रकार:

(1) ऱ्हस्व स्वर व दीर्घ स्वर 

    काही स्वरांचा उच्चार आखूड होतो,उच्चारस कमी वेळ लागतो. त्यांना ऱ्हस्व स्वर म्हणतात. 

उदा – अ,इ, उ, ऋ, लॄ,

    काही स्वरांचा उच्चार लांब होतो म्हणून त्यांना दीर्घ स्वर म्हणतात. 

उदा – आ, ई, ऊ, ऐ, ओ, औ


(2) संयुक्त स्वर 

    दोन स्वर एकत्र येऊन बणलेल्या स्वरांना संयुक्त स्वर म्हणतात. 

उदा – ए, ऐ, ओ, औ

     ए = अ + इ किंवा ई ,  ओ = अ + उ किंवा ऊ 


(3) सजातीय स्वर व विजातीय स्वर 

    एकाच उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर म्हणतात. 

उदा – अ – आ, इ – ई, उ – ऊ

    भिन्न उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना विजातीय स्वर म्हणतात. 

उदा – अ – इ, अ – उ , इ – ए , उ – ए , अ – ऋ 

    

2 thoughts on “मराठी वर्णमाला – मराठी व्याकरण नोट्स Marathi Varnmala grammar Notes”

Leave a Comment