Ria Dabi achieves rank 15 in UPSC CSE 2020 यूपीएससी रॅंक 15 – रिया डाबी | पहिल्याच प्रयत्नात IAS

युपीएससी ही भारतातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. दरवर्षी लाखोंच्या संख्येने उमेदवार परीक्षा देत असतात. म्हणून या परीक्षेमध्ये यश मिळवणे हे तेवढे सोपे नाही. तुम्हाला अतिशय मेहनत परिश्रम करावे लागतात.
मित्रांनो, तुम्ही टीना डाबी यांचे नाव ऐकले असेल, यूपीएससी सिविल सर्विसेस २०१५ परीक्षेमध्ये त्या भारतामध्ये प्रथम आलेल्या होत्या. पहिल्याच प्रयत्नात त्यांनी हे घवघवीत यश मिळवले होते.
नुकताच यूपीएससी सिविल्स सेवा २०२० चा रिझल्ट लागला. त्यात महाराष्ट्रातील उमेदवारांनी देखील चांगली कामगिरी केली. जिथे तिथे तुम्हाला रिया डाबी हे नाव ऐकायला मिळालं असेल. 

रिया डाबी कोण आहेत?

रिया डाबी ह्या 2015 मध्ये प्रथम आलेल्या टीना डाबी यांच्या बहीण आहे. त्यांनी पहिल्याच प्रयत्नांमध्ये यूपीएससी २०२० मध्ये भारतामध्ये 15 वी रँक मिळवलेली आहे.
रिया डाबी यांचे आई-वडील हे देखील आय ए एस आहेत. आपण नेहमी असे म्हणत असतो, की फॅमिली बॅकग्राऊंड असल्यामुळे त्यांच्यासाठी या गोष्टी सोप्या होऊन जातात. परंतु मित्रांनो यूपीएससी सर्वांसाठी समान घेतली जाते. त्यामुळे हा निष्कर्ष आपला नक्कीच चुकतो. त्यांनीदेखील तेवढीच मेहनत घेतलेली असते जेवढे तुम्ही घेतलेली असते. त्यांनी आपल्याला यूपीएससीसाठी सांगितलेल्या काही टिप्स आपण पुढे बघूया.

यशाचे श्रेय 

रिया डाबी त्यांच्या आई-वडिलांना व बहिणीला त्यांच्या यशाचे श्रेय देतात. त्यांच्या आई-वडिलांनी त्यांना लहानपणापासूनच शिस्ती पूर्वक वागणूक दिली आणि त्यामुळेच त्यांना हे यश मिळवता आलं. शालेय वयापासूनच त्यांना न्युज पेपर वाचण्याची सवय लावली. न्यूजपेपर वाचल्यामुळे अपडेटेड राहण्याची त्यांना सवय लागली. 


  • यूपीएससी साठी काही ठराविक पुस्तके असतात ती काळजीपूर्वक वाचावीत. 
  • रीविजन वर जास्तीत जास्त भर द्यावा.
  • रिया डाबी यांनी ऑप्शनाल सब्जेक्ट पुढीलप्रमाणे घेतला होता- political science and international relations.

रिया डाबी आणि टीना डाबी यांनी सोबत अभ्यास केला का / टीना दाबी यांनी त्यांना कोणती मदत केली?

दोन्ही बहिणी मध्ये पाच वर्षाचा वयाचा फरक असल्यामुळे त्या सोबत अभ्यास करू शकत नव्हत्या. कारण जेव्हा टिना डाबी या कॉलेजमध्ये होत्या तेव्हा रिया डाबी शाळेमध्ये होत्या. परंतु महत्त्वाचे मार्गदर्शन त्यांनी रिया दाबी यांना केलेले आहे.

आय ए एस UPSC कोचिंग घेतली होती का?

त्यांनी 2019 मध्ये लॉकडाउन लागण्यापूर्वी युपीएससी साठी कोचिंग पूर्ण केलेली होती. त्यानंतर रिया ने घरीच राहून अभ्यास केला.
मेहनती ला यश नक्की मिळते. त्यामुळे मेहनत करा, एक दिवस नक्कीच तुमचा असेल.

0 thoughts on “Ria Dabi achieves rank 15 in UPSC CSE 2020 यूपीएससी रॅंक 15 – रिया डाबी | पहिल्याच प्रयत्नात IAS”

Leave a Comment