Polity-Making of the constitution | संविधान निर्मितीची प्रक्रिया | MPSC notes

घटनेची निर्मिती Making of the Constitution


राज्यसेवा मुख्य परीक्षा सामान्य अध्ययन 2 साठी अतिशय महत्वाचा टॉपिक आहे . 

(दिलेली माहिती pdf स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी सर्वात खाली दिलेल्या डाउनलोड बटनावर क्लिक करा )

‘प्रौढ मताधिकारवर निवडून आलेल्या घटना समितीने
कोणत्याही बाह्य हस्तक्षेपाची शिवाय स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेची निर्मिती केली
पाहिजे’ -जवाहरलाल नेहरू
 

लोर्ड पेथिक लॉरेन्स, सर स्पोर्ट क्रिप्स व
अलेक्झांडर त्रिसदस्यीय कॅबिनेट मिशन
24 मार्च 1947 रोजी भारतात  आले.

समितीची संरचना :

नोव्हेंबर 1946 मध्ये संविधान  सभेची स्थापना झाली.सभेत एकूण 389 जागा होत्या.त्यातील ब्रिटीश भारतासाठी एकूण 296 जागा होत्या आणि
संस्थां
नासाठी 93 जागा होत्या. त्यातीलच ब्रिटिश भारतासाठी गव्हर्नर असलेल्या 11 प्रांतांतून  ( मद्रास, बॉम्बे, संयुक्तप्रांत,बिहार, मध्य प्रदेश, ओरिसा, पंजाब, वायव्य सरहद्द प्रांत, पश्चिम बंगाल व आसाम)292 जागा निवडून द्यायच्या
होत्या आणि प्रत्येकी 1 याप्रमाणे मुख्य आयुक्तांच्या प्रांतांमधून 4 जागा
निवडायच्या होत्या .

1946 मध्ये झालेल्या 296 जागांसाठी च्या
निवडणुकीमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ने  
208 जागा जिंकल्या, मुस्लिम लीगने 73 जागा जिंकल्या आणि इतर पक्षांनी 15 जागा जिंकल्या. 

बैठका :

  • संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 मध्ये झाली. त्या
    बैठकीला
    211 सदस्य हजर होते. 
  • डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांची त्या सभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून निवड
    करण्यात आली होती.
  • त्यानंतर 11 डिसेंबर 1946
    ला संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून डॉ राजेंद्र प्रसाद यांची निवड करण्यात आली. आणि उपाध्यक्ष म्हणून एच सी मुखर्जी
    यांची निवड करण्यात आली. संविधानाचे घटनात्मक सल्लागार म्हणून सर बी एन राव यांना ओळखतात.

उद्दिष्टांचा ठराव:

  •  13 डिसेंबर 1946
    रोजी पंडित नेहरू यांनी  संविधान सभेमध्ये
    मांडला.
  •  22 जानेवारी 1947 रोजी तो संमत
    करण्यात आला.

स्वातंत्र्याचा कायदा 1947
अन्वये:

  • घटना समितीला सार्वभौम दर्जा देण्यात आला
  • घटना समिती हे कायदे मंडळ बनले
  • घटनासमिती स्वतंत्र भारताची पहिली संसद बनली
  • ज्यावेळी घटना समिती म्हणून कार्यरत असे त्यावेळी डॉ राजेंद्र प्रसाद
    अध्यक्ष असत आणि ज्या वेळी कायदेमंडळ संस्था म्हणून कार्यरत असेल त्यावेळी जी व्ही  मावळंकर हे अध्यक्ष असत.
     

इतर महत्त्वाची माहिती:

  • 22 जुलै 1947
    रोजी राष्ट्रध्वज स्वीकारला
  • 24 जानेवारी 1950 रोजी राष्ट्रगीत
    राष्ट्रगान स्वीकारले आणि याच दिवशी डॉ राजेंद्र प्रसाद तसेच स्वतंत्र भारताचे
    पहिले राष्ट्रपती बनले.
  • संविधान संपूर्णपणे बनवून तयार होण्यासाठी दोन वर्ष अकरा महीने आणि अठरा दिवस  लागलेत.
  • यामध्ये एकूण 11 सत्रे झाली व संविधान बनवण्यासाठी एकूण 64 लाख रुपये इतका
    खर्च आला.
  • 1949 मध्ये संविधान सभेने भारताच्या राष्ट्रकुल सदस्यत्वाला मान्यता दिली.

महत्त्वाच्या समित्या:

मुख्य समित्या

1]संघराज्य अधिकार समिती – जवाहरलाल नेहरू

2]संघराज्य राज्य घटना समिती – जवाहरलाल नेहरू

3]प्रांतिक राज्यघटना समिती – सरदार पटेल

4]मसुदा समिती – डॉ आंबेडकर

5]मूलभूत अधिकार व अल्पसंख्यांक आणि आदिवासी व अंतर्भूत न केलेल्या क्षेत्रात
बाबत सल्लागार समिती – सरदार
 
पटेल

या समितीच्या उपसमित्या खालील प्रमाणे :

a)अधिकार उपसमिती : जे बी कृपलानी 

b)अल्पसंख्यांक
उपसमिती : एच  सी मुखर्जी

c)ईशान्य सीमा आदिवासी क्षेत्र आणि आसामची अंतर्भूत न केलेली व अंशतः अंतर्भूत न
केलेले क्षेत्रे यासंदर्भातील उपसमिती : गोपीनाथ bardoloi

d)आसाम वगळता इतर अंतर्भूत न केलेली व अंशतः अंतर्भूत केलेली क्षेत्रे ह्या
संदर्भातील उपसमिती : A V ठक्कर

e)वायव्य सरहद्द आदिवासी क्षेत्र उपसमिती

6)कामकाज प्रक्रिया नियम समिती – डॉ राजेंद्र प्रसाद

7)संस्थाने समिती – पंडित जवाहरलाल नेहरू

8)सुकानु समिती डॉक्टर राजेंद्र प्रसाद

काही दुय्यम समित्या:

1]वित्त व कर्मचारी समिती – डॉ राजेंद्र प्रसाद

2]अधिकार पत्रे समिती – अल्लादी कृष्णस्वामी अय्यर

3]गृह समिती – बी पट्टाभिसीतारामय्या

4]कामकाज क्रम समिती – डॉ के एम मुंशी

5]राष्ट्रध्वजा संबंधी हंगामी समिती – डॉ राजेंद्र प्रसाद

6]घटना समितीच्या कार्याविषयी समिती – ग वा मावळणकर

7]सर्वोच्च न्यायालया बाबत हंगामी समिती – एस वरदाचारी 

8]प्रांताच्या मुख्य आयुक्तांची समिती – पट्टाभिसीतारामय्या

9]आर्थिक तरतूदविषयक तज्ञांची समिती – नलिनी रंजन सरकार

10]भाषावार प्रांत संबंधी समिती – एस के दार

11]घटनेचा मसुदा परीक्षण करणारी विशेष समिती – पंडित नेहरू

12]वृत्तपत्र कक्ष समिती – उषा नाईक सेन 

13]नागरिकत्व वरील एतदर्थ समिती – एस वरदाचारी 


मसुदा समिती:

  • मसुदा समितीची स्थापना 29 ऑगस्ट 1947
    रोजी झाली, 
  • या समितीमध्ये एकूण 7 सदस्य होते. 
  • बी आर आंबेडकर 
  • गोपालस्वामी अय्यंगार  
  • कृष्णस्वामी अय्यर 
  • डॉ के एम
    मुंशी 
  • सईद मोहम्मद सादुल्ला 
  • एन माधवराव 
  • टी टी कृष्णमाचारी
  • फेब्रुवारी 1948 मध्ये मसुदा प्रसिद्ध करण्यात आला.
  • ऑक्टोबर 1948 मध्ये सुधारित मसुदा प्रसिद्ध करण्यात आला कामकाज एकूण 141 दिवस चालले.

Download Polity- Making of the constitution handwritten Notes in Marathi pdf

Thank you and yes Don’t forget to share with your friends

 

Leave a Comment