PM – cares for children yojana 2021 MPSC/UPSC पीएम केअर्स फॉर चिल्ड्रेन

• ‘ पीएम केअर्स फॉर चिल्ड्रेन ‘ योजना 

शुभारंभ : 29 मे 2021 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते .
• प्रमुख उद्देश : कोव्हिड -19 मुळे दोन्ही पालक किंवा पालनपोषण करणारे किंवा कायदेशीर पालक / दत्तक पालक गमावलेल्या मुलांना अर्थात अनाथ मुलांना आर्थिक पाठबळ उपलब्ध करून देणे . 

या योजनेचे 5 प्रमुख घटक : 

1 ) मुलाच्या नावे मुदत ठेव : 
संबंधित अनाथ मुलगा किंवा मुलीच्या नावे पीएम केअर्स फंडातून मुदत ठेवी काढण्यात येतील आणि हा मुलगा किंवा मुलगी 18 वर्षांची झाल्यावर त्या प्रत्येकासाठी 10 लाख रुपये उपलब्ध करून देण्यात येतील . 
ही रक्कम उच्च शिक्षणाच्या कालावधीत त्याची किंवा तिची वैयक्तिक आवश्यकता पूर्ण करण्यासाठी 18 वर्षापासून पुढील 5 वर्षांसाठी मासिक आर्थिक पाठिंबा / छात्रवृत्ती देण्यासाठी वापरली जाईल आणि 23 व्या वर्षात पदार्पण केल्यावर त्याला किंवा तिला वैयक्तिक आणि व्यावसायिक वापरासाठी एकरकमी 10 रुपये दिले जातील . 

2 ) 10 वर्षाखालील मुलांसाठी शालेय शिक्षण : 
मुलाला जवळच्या केंद्रीय विद्यालयात किंवा खासगी शाळेत डे स्कॉलर म्हणून प्रवेश दिला जाईल . 
मुलास खासगी शाळेत प्रवेश मिळाल्यास  आरटीईच्या निकषांनुसार पीएम केअर्समधून फी दिली जाईल . 

गणवेश , पाठ्यपुस्तके आणि वह्यांच्या खर्चासाठी देखील पीएम केअर्समधून पैसे दिले जातील . 

3 ) 11-18 वर्षांच्या मुलांसाठी शालेय शिक्षण : 
मुलाला सैनिकी शाळा , नवोदय विद्यालय इ .सारख्या कोणत्याही केंद्र शासकीय निवासी शाळांमध्ये प्रवेश देण्यात येईल . जर मूल काळजीवाहू पालक / आजी आजोबा / विस्तारित कुटुंबाच्या देखरेखीखाली असेल तर त्याला जवळच्या केंद्रीय विद्यालयात किंवा खासगी शाळेत डे स्कॉलर म्हणून प्रवेश दिला जाईल . गणवेश , पाठ्यपुस्तके आणि वह्यांच्या खर्चासाठी देखील पीएम केअर्समधून पैसे दिले जातील . 

4 ) उच्च शिक्षणासाठी मदत : 
• मुलास सध्याच्या शैक्षणिक कर्जाच्या निकषांनुसार देशातील व्यावसायिक अभ्यासक्रम / उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज मिळवून देण्यात मदत केली जाईल . या कर्जावरील व्याज पीएम केअर्सद्वारे भरले जाईल . मुलास खासगी शाळेत प्रवेश मिळाल्यास आरटीईच्या निकषांनुसार पीएम केअर्समधून फी दिली जाईल . 

• केंद्र किंवा राज्य सरकारच्या योजनेंतर्गत अशा मुलांना शासकीय निकषांनुसार पदवीधर / व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शैक्षणिक . शुल्क / कोर्स फी इतकीच शिष्यवृत्ती देण्याचा पर्याय आहे . विद्यमान शिष्यवृत्ती योजनेंतर्गत पात्र नसलेल्या मुलांसाठी , पंतप्रधान केअर्समधून सममूल्य शिष्यवृत्ती दिली जाईल . 

5 ) आरोग्य विमा : 
5 लाख रुपयांच्या आरोग्य विमा कवचासह सर्व मुलांची आयुष्मान भारत ( PM – JAY ) योजनेंतर्गत लाभार्थी म्हणून नोंदणी केली जाईल . 
या मुलांची प्रिमिअम रक्कम 18 वर्षे वयापर्यंत पंतप्रधान केअर्सद्वारे दिली जाईल .
(Source : loksatta)

Leave a Comment