Jagrati Awasthi UPSC CSE 2020 Success Story जाग्रती अवस्थि यशोगाथा



जाग्रती अवस्थी यांनी यूपीएससी सिव्हिल सेवा परीक्षा 2020 मध्ये भारतामध्ये दुसरी रँक मिळवलेली आहे. मुलींमधून पहिल्या आलेल्या आहेत. [Jagrati Awasthi get rank 2 in UPSC CSE 2020- first among girls]

जाग्रती अवस्थी या मध्यप्रदेशमधील असून त्यांनी Maulana Azad National institute of technology Bhopal येथून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्येB tech पूर्ण केलेले आहे. 2017 पासून ते 2019 पर्यंत त्यांनी BHEL इथे इंजिनिअर म्हणून नोकरी केली. येथे नोकरी करताना त्यांना वाटले की सिव्हिल सेवेमध्ये त्यांना रुची आहे म्हणून त्यांनी यूपीएससी करण्याचा निर्णय घेतला. तमिळ लहानपणी पण याच गोष्टी करावासा वाटायचा. 

त्यासाठी त्यांनी 2019 च्या जानेवारी महिन्यापासून एकाग्रतेने तयारी करण्यास सुरुवात केली. त्यांना समाजासाठी काहीतरी करावे असे वाटू लागले. जानेवारीपासून तर अजून पर्यंत त्यांनी तयारी केली आणि जूनमध्ये पूर्व परीक्षा दिली परंतु पूर्व परीक्षेमध्ये त्या पास होऊ शकले नाही. पूर्वपरीक्षा पास न झाल्यामुळे त्यांना एक गोष्ट समजली की या परीक्षेमध्ये अभ्यास आणि परिश्रम महत्त्वाचा आहे. म्हणूनच त्यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला.


जॉब सोडल्यानंतर त्यांनी 2019 च्या जुलै महिन्यापासून तर 2020 च्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत तयारी केली. दररोज आठ ते दहा तास अभ्यास केला. तयारी सुरू केल्यानंतर त्यांनी आपल्या मध्ये असलेल्या कमतरते ला माहीत करण्याचा प्रयत्न केला. परीक्षेच्या मागणीला त्यांनी समजले आणि त्यानुसार स्ट्रॅटेजी बनविली. परीक्षेला आपल्याकडून काय अपेक्षित आहे कोणत्या स्वरूपाचे प्रश्न येत आहे? कोणती पुस्तके आपण घ्यायला पाहिजे वाचायला पाहिजे? त्यावर त्यांनी भर दिला. खूप सराव केला. पहिल्यांदा ज्या कमतरता होत्या त्या भरून काढल्या.

कोरुना काळामध्ये तयारी करण्यासाठी त्यांना ऑनलाईन साहित्याची खूप मदत झाली. ऑनलाइन टेस्ट सिरीज दिल्या ऑनलाइन मुलाखती दिल्या. लिहून लिहून अभ्यास करा असा सल्ला ते आपल्याला देतात. लिहिलेल्या गोष्टी या जास्त प्रमाणावर व जास्त कालावधीसाठी लक्षात राहतात. 

एखाद्या प्रयत्नामध्ये नाही झालं तर मागे वळून न बघता आपल्या चुकांना शोधा व त्या चुका सुधारा आणि त्यानुसार वागा. येणाऱ्या प्रयत्नांवरती लक्ष केंद्रित करा. एक दिवस नक्कीच तुमचा असेल.

Leave a Comment