टोकियो ऑलिंपिक २०२१- निरज चोप्रा MPSC UPSC क्रीडा चालू घडामोडी

Olympic 2021 विषयी

आधुनिक ऑलिंपिक खेळाची सुरुवात १८९६ मध्ये ग्रीस या देशात झाली.
या स्पर्धा दर 4 वर्षांनी भरवण्यात येतात.
ऑलिंपिक स्पर्धा 4 प्रकारच्या असतात.
  1. समर ऑलिंपिक
  2. विंटर ऑलिंपिक
  3. पॅरा ऑलिंपिक
  4. युथ ऑलिंपिक गेम्स
ऑलिम्पिक कायमस्वरूपी घोषवाक्य ( Motto ) : 
अधिक वेगवान , अधिक उंच , अधिक सामर्थ्यशाली ( faster , higher , stronger ) 
ऑलिम्पिकचे कायमस्वरूपी बोधचिन्ह ( Logo ) : एकमेकामध्ये गुंतलेली पाच रंगांची वर्तुळे ( निळा , पिवळा , काळा , हिरवा , लाल )

२०२० ची ३२ वी Olympic स्पर्धा

कोविड महामारीमुळे २०२० च्या स्पर्धा २०२१ मध्ये घेण्यात आल्या. या स्पर्धा जपानमधील टोकियो येथे घेतल्या.
टोकियो ऑलिंपिक २०२० चा कालावधी २३ जुलै २०२१ ते ८ ऑगस्ट २०२१ होता.
जगभरातील एकूण ११६५६ खेळाडू सहभागी होते, त्यापैकी भारतातील १२६ खेळाडू होते.
भारताने एकूण ७ पदके मिळवली ( १ सुवर्ण, २ रौप्य , ४ कांस्य ) 

ऑलिंपिक २०२१ मध्ये भारताने जिंकलेली पदके

सुवर्ण नीरज चोप्रा – भालाफेक
मीराबाई चानू रौप्य – भारतोल्लन ( Weightlifting )
रविकुमार दहिया रौप्य – कुस्ती
पी . व्ही . सिंधू कास्य – बॅडमिंटन
लवलिना बोर्गोहेन कांस्य – बॉक्सिंग
बजरंग पुनिया कांस्य – कुस्ती
भारतीय पुरुष हॉकी संघ कांस्य – हॉकी

नीरज चोप्रा यांची ऑलिंपिक मधील कामगिरी 

जन्म : 24 डिसेंबर 1997 – पानिपत , हरियाणा ( वय : 23 वर्षे ) 
पूर्ण नाव : नीरज सतीशकुमार चोप्रा . 
टोपण नाव : गोल्डन बॉय 
क्रीडाप्रकार : भालाफेक ( अथलेटिक्स ) 
टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेक प्रकारात ( अथलेटिक्स ) 7 ऑगस्ट 2021 रोजी सुवर्णपदक पटकावले . 
( त्याने त्याच्या दुसऱ्या * प्रयत्नात 87.58 मीटर भाला फेकून हे सुवर्णपदक पटकावले ) 
टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवणारा एकमेव भारतीय खेळाडू . 
ऑलिम्पिकमध्ये ट्रॅक अँड फिल्ड प्रकारामध्ये सुवर्णपदक मिळवणारा पहिला भारतीय अँथलिट आजपर्यंतच्या सर्व ऑलिम्पिकचा विचार करता वैयक्तिक प्रकारात भारतासाठी सुवर्णपदक मिळवणारा दुसरा खेळाडू ( पहिला – अभिनव बिंद्रा नेमबाजी – ऑलिम्पिक ) . 
आजपर्यंतच्या सर्व ऑलिम्पिकचा विचार करता वैयक्तिक प्रकारात भारतासाठी सुवर्णपदक पटकावणारा सर्वात तरुण खेळाडू . तसेच पदार्पणातच ( म्हणजेच आपल्या पहिल्याच ऑलिम्पिक स्पर्धेत ) सुवर्णपदक मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू . चोप्रा हा 2016 साली भारतीय लष्करात दाखल झाला . 
सध्या तो ‘ Junior Commissioned Officer ‘ या पदावर कार्यरत आहे . चोप्राने आतापर्यंत जिंकलेल्या पदकांची तालिका 2008 बीजिंग

इतर स्पर्धकांविषयी देखील माहिती टाकण्यात येत आहे. 

Leave a Comment