Hello, welcome to mpscpoint.in website.
You will get the Marathi Grammar Noun topic with notes.
Marathi vyakaran – shabdanchya jati [Naam]
सर्वनाम
“सर्वनाम म्हणजे वाक्यात नामाच्या ऐवजी येणारा शब्द.”
या शब्दाचा उपयोग सर्व प्रकारच्या कामांसाठी होतो, म्हणून त्याला सर्वनाम असे म्हणतात. सर्वनाम हे नामाचा पुनरुच्चार किंवा पुनर्वापर टाळण्यासाठी वापरले जाते. सर्वनाम हा विकारी शब्द आहे.
उदाहरणार्थ –
मी, तू, तो, हा, जो,इत्यादी.
सर्वनामाचे प्रकार
मराठी भाषेत सर्वनामाचे एकूण सहा प्रकार आहेत
- पुरुषवाचक सर्वनाम
- दर्शक सर्वनाम
- संबंधी सर्वनाम
- प्रश्नार्थक सर्वनाम
- सामान्य सर्वनाम किंवा अनिश्चित सर्वनाम
- आत्मवाचक सर्वनाम
वरील प्रत्येक सर्वनामाचे प्रकाराचे विश्लेषण खालील प्रमाणे
1.पुरुषवाचक सर्वनामे
व्याकरणातील पुरुष म्हणजे काय?
लिहिण्याचे किंवा बोलण्याचे तीन वर्ग पडतात. पहिला म्हणजेच बोलणाऱ्यांचा वर्ग. दुसरा म्हणजे ज्यांच्याशी आपण बोलत आहे त्यांचा वर्ग आणि तिसरा म्हणजे ज्यांच्या विषयी आपण बोलतो त्यांचा वर्ग. व्याकरणात यांनाच पुरुष असे म्हणतात.
आणि या तीनही वर्गातील नामाबद्दल येणाऱ्या सर्वनामांना पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात.
- जेव्हा बोलणारा स्वतःचा उल्लेख करतो तेव्हा प्रथम पुरुषवाचक सर्वनाम असते. उदाहरणार्थ – मी, आम्ही, आपण, स्वतः इत्यादी
- ज्याच्याशी बोलायचे त्याचा उल्लेख करताना जी सर्वनामे आपण वापरतो ती द्वितीय पुरुषवाचक सर्वनामे असतात. उदाहरणार्थ – तू, तुम्ही, आपण, स्वतः
- ज्याच्या विषयी बोलायचे त्या व्यक्ती किंवा वस्तू यांचा उल्लेख करताना आपण जी सर्वनामे वापरतो ती तृतीय पुरुषवाचक सर्वनामे असतात उदाहरणार्थ तो ती ते त्या
2.दर्शक सर्वनाम
एखादी जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी जे सर्वनाम येते त्याला दर्शक सर्वनाम असे म्हणतात.
उदाहरणार्थ- हा, ही, हे, तो, ती, ते.
3.संबंधी सर्वनाम
वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शन सर्वनामाची संबंध दर्शवणाऱ्या सर्वनामला संबंधी सर्वनाम असे म्हणतात.
उदाहरणार्थ- जो-जी, जे, जे-ज्या
4.प्रश्नार्थक सर्वनामे
ज्या सर्वनामांचा उपयोग वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी केला जातो त्यांना प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतात.
उदाहरणार्थ-
कोण, काय, कोणास, कोणाला, कोणी इत्यादी
5. सामान्य सर्वनामे किंवा अनिश्चित सर्वनाम
कोण काय ही सर्वनामे वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी न येता ती कोणत्या नामाबद्दल आली आहे हे निश्चितपणे सांगता येत नाही तेव्हा त्यांना अनिश्चित सर्वनामे म्हणतात.
उदाहरणार्थ-
त्या डब्यात काय आहे?
कोणी कोणास हसू नये.
6. आत्मवाचक सर्वनाम
आपण या सर्वनामाचा अर्थ जेव्हा स्वतः असा होतो, तेव्हा त्यात मोठ्या सर्वांना वाटते. यालाच स्वतः वाचक सर्वनाम असे देखील म्हणतात.
उदाहरणार्थ-
मी स्वतः त्याला पहिले
तो आपण होऊन माझ्याकडे आला
तुम्ही स्वतःला काय समजता?
अशा प्रकारे सर्वनामाचे सहा प्रकार आहेत. हेच टॉपिक जसा मला वेळ मिळेल तसे मी अपडेट करत राहील. धन्यवाद
पुढील टॉपिक वाचा-