वाक्यांचे प्रकार – केवलवाक्य मिश्रवाक्य संयुक्तवाक्य | मराठी व्याकरण

वाक्यांचे प्रकार मराठी व्याकरण : मराठी व्याकरणाचा अभ्यास करताना आपल्याला वाक्यांचे प्रकार माहित असायला हवे मराठीमध्ये वाक्यांचे अनेक प्रकार आहेत त्यातील महत्त्वाचे प्रकार म्हणजे केवल वाक्य, मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य होय. विविध स्पर्धा परीक्षांमध्ये आपल्याला वाक्यांचे प्रकार विचारले जातात. त्या स्वरूपाचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला मराठी व्याकरणातील वाक्यांचे प्रकार अभ्यासणे गरजेचे आहे.

” अनेक शब्द एकत्रित येऊन अर्थपूर्ण बनणाऱ्या शब्दांच्या समूहास वाक्य असे म्हणतात ”

वाक्यांचे प्रकार

एखादा वाक्यामधून जो अर्थ प्रकट होतो त्यावरून त्या वाक्याचे प्रकार पडत असतात.

वाक्य हे विधानार्थी असू शकते वाक्य हे प्रश्नार्थक असू शकते तसेच वाक्य हे उद्गारअर्थ असू शकते. आपण उदाहरणांच्या माध्यमातून समजून घेऊया.

  • माझे वडील आज पर गावी गेले. (या वाक्यात फक्त विधान केलेले असते म्हणून त्याला विधानार्थी वाक्य असे म्हणतात. )
  • तू काल शाळेत का आला नाही? (या वाक्यामध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे त्यामुळे या स्वरूपाच्या वाक्याला प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात. )
  • अरेरे! खूप वाईट झाले! (या वाक्यातून भावनेचा उद्गार काढलेला असतो म्हणून त्याला उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात)

मराठीमध्ये काही वाक्य होकारार्थी असतात तर काही वाक्य नकारार्थी असतात ज्या वाक्यामध्ये नकार दर्शवलेला नसतो त्या वाक्यांना होकार आरती म्हणतात व ज्यामध्ये नकार दर्शक शब्दांचा वापर करून नकार दर्शवतात तर त्या वाक्यांना नकारार्थी वाक्य असे म्हणतात.

उदाहरणार्थ

नितीन दररोज अभ्यास करतो.

सुरेखा नियमित अभ्यास करीत नाही.

वरील वाक्यांमधील पहिले वाक्य हे सकारात्मक स्वरूपाचे आहे म्हणजेच होकारार्थी आहे आणि दुसरे वाक्य हे नकारार्थी आहे कारण त्यामध्ये नाही हा शब्द वापरला असून नकार दर्शक आहे.

मराठी मधील वाक्यांचे काही इतर प्रकार:

  • आज्ञार्थी – ज्या वाक्यामध्ये आज्ञा दर्शवलेली असते त्या वाक्याला आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात. उदाहरणार्थ: मुलांनो, चांगला अभ्यास करा.
  • विध्यर्थी – ज्या वाक्यामध्ये क्रियापदाच्या अर्थावरून कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा या गोष्टींचा बोध होत असेल तर त्या वाक्याला विध्यर्थी वाक्य असे म्हणतात. उदाहरणार्थ: मला परीक्षेत पहिला वर्ग मिळावा. (विध्यर्थी वाक्य ओळखण्यासाठी वाक्याच्या क्रियापदाला शेवटी वा/वी/वे प्रत्यय असेल तर ते वाक्य विध्यर्थी समजावे.)
  • संकेतार्थी – वाक्यातील क्रियापदाच्या अर्थावरून अमुक केले असते तर अमुक झाले असते अशी अट किंवा संकेत असा अर्थ निघत असेल तर त्या संकेतार्थी वाक्य असे म्हणतात. उदाहरणार्थ: जर हवे ते पुस्तक मिळाले, तर माझे संशोधन पूर्ण होईल.

एका वाक्यात किती विधाने असतात त्यावरून वाक्यांचे तीन प्रकार मानले जातात

  1. केवल वाक्य
  2. मिश्र वाक्य
  3. संयुक्त वाक्य

1) केवल वाक्य :

पुढील वाक्य वाचा.

  1. पावसाळ्यात सगळीच झाडे हिरवी होतात.

केवल वाक्यामध्ये प्रत्येक वाक्यात एकच विधान आहे म्हणजे प्रत्येकात एकच उद्देश्य व एकच विधेय आहे. थोडक्यात, ज्या वाक्यात एकच उद्देश्य व एकच विधेय असते त्यास केबल किंवा शुद्ध वाक्य म्हणतात.

2) मिश्र वाक्य :

पुढील वाक्य वाचा.

  1. आकाशात जे वाटप चमकतात, तेव्हा मोर नाचू लागतो.
  2. तो म्हणाला की, तुला शाळेत जावेच लागेल.

वरील वाक्य क्रमांक दोन विचारात घ्या, मिश्र वाक्य अभ्यासताना आपल्याला प्रधान वाक्य आणि गौण वाक्य या संकल्पना माहित असाव्या. वाक्यामध्ये ज्या वाक्याला जास्त महत्त्व असते ते प्रधान वाक्य असते. आणि ज्याला कमी महत्त्व असते ते गौण वाक्य असते. थोडक्यात जे वाक्य स्वतंत्र असते त्यास मुख्य किंवा प्रधान वाक्य म्हणतात व अवलंबून असणाऱ्या वाक्याला गौण वाक्य किंवा पोट वाक्य असे म्हणतात. वाक्य क्रमांक दोन मध्ये तुला शाळेत जावेच लागेल हे प्रधान वाक्य आहे आणि तो म्हणाला की हे गौण वाक्य आहे त्यामुळे या स्वरूपाच्या वाक्याला मिश्र वाक्य असे म्हणतात.

वरील प्रकारचा वाक्यप्रचार लक्षात ठेवण्यासाठी काही महत्त्वाचे टिप्स – जे वाक्य उभयान्वयी अव्ययांनी जोडून तयार होतात त्यांना मिश्र वाक्य असे म्हणतात. (यामध्ये साधारणतः स्वल्पविराम बघायला मिळतो)

3) संयुक्त वाक्य

पुढील वाक्य वाचा.

  1. मी चहा बनवला व अनिताला पिण्यासाठी दिला.
  2. आज मी मराठीचा अभ्यास करेल किंवा इंग्रजीचा अभ्यास करेल.

पहिला वाक्यात दोन स्वतंत्र केवल वाक्य व या समुच्चय बोधक उभयान्वयी अव्ययाने जोडले आहेत व दुसऱ्या वाक्यातही दोन स्वतंत्र वाक्य किंवा या विकल्प बोधक उभयान्वयी अव्ययाने जोडली आहे. अशा रीतीने दोन किंवा अधिक केवल वाक्य प्रधानत्व बोधक उभयान्वयी अव्ययांनी जोडली असता जे एक जोड वाक्य तयार होते, त्यास संयुक्त वाक्य असे म्हणतात.

संयुक्त वाक्यात दोन किंवा अधिक केवल वाक्य असतात असे नाही. दोन किंवा अधिक मिश्र वाक्यप्रधानत्वबोधक उभयान्वयी अव्ययांनी जोडली गेली असतील किंवा एक केवल वाक्य मिश्र वाक्याशी प्रधानत्वबोधक उभयान्वयी अव्ययाने जोडले गेले असेल तर त्यासही संयुक्त वाक्य म्हणतात.

मिश्र वाक्य व संयुक्त वाक्य यात फरक

मिश्र वाक्यात एकच वाक्य प्रधान असते बाकीचे सर्व गौण असतात. संयुक्त वाक्यात दोन किंवा अधिक प्रधान वाक्य असतात.

1 thought on “वाक्यांचे प्रकार – केवलवाक्य मिश्रवाक्य संयुक्तवाक्य | मराठी व्याकरण”

Leave a Comment