महाराष्ट्र भूगोल: खनिज संपत्ती

महाराष्ट्र भूगोल: खनिज संपत्ती


महाराष्ट्र मध्ये खनिज संपत्तीची मुख्य क्षेत्रे खालील प्रमाणे आहेत.

पूर्व विदर्भ: चंद्रपूर गडचिरोली भंडारा, गोंदिया नागपूर व यवतमाळ

कोकण व दक्षिण महाराष्ट्र: सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे व कोल्हापूर जिल्हा.

वरील दोन क्षेत्रांमध्ये प्रामुख्याने महाराष्ट्राची खनिज संपत्ती केंद्रित झालेली आहे.

महाराष्ट्र मध्ये प्रामुख्याने खालील खनिजे आढळतात

मॅग्नीज लोहखनीज बॉक्साईट चुनखडी डोलोमाईट कायनाईट व सीलमनाईट क्रोमाइट.


मँगनीज 

भारतात मॅंगनीजचा साठा सुमारे 161 दशलक्ष तन असून त्यापैकी 40 टक्के साठा महाराष्ट्रात आहे मॅग्नीज प्रामुख्याने भंडारा व नागपूर जिल्ह्यांमध्ये असून त्या खालोखाल सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आढळते.


लोहखनिज

भारतात लोहखनिजाचा अंदाजे साठा 1346 कोटी टनाचा आहे यापैकी 20 टक्के लोह खनिज महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात लोह खनिजाचे महत्त्वाचे साठे चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर व सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहेत. टॅको नाईट व जांभा खडका मध्ये लोहखनिज आढळते. हेमा टाईप हे महत्त्वाचे खनिज चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात आहे.


गडचिरोली जिल्ह्यात सुरजगड भागातील साठे चांगल्या प्रतीचे आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात लोह खनिज च्या खाणी आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात शाहुवाडी व राधानगरी तालुक्यात लोहखनिजाचे साठे आहेत.


बॉक्साईट

जांभा खडकात बॉक्साईटचे साठे असतात. बॉक्साइट चा उपयोग मुख्यत्वे करून अल्युमिनियम तयार करण्यासाठी केला जातो सुमारे 80 टक्के बॉक्साईट हे अल्युमिनियम साठी वापरले जाते आणि उर्वरित सिमेंट, लोह व पोलाद उत्पादनासाठी वापरतात. भारतातील २१ टक्के बॉक्साइट चे उत्पादन महाराष्ट्रात होते. महाराष्ट्रात कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड ठाणे पालघर सांगली व सातारा या जिल्ह्यांमध्ये बॉक्साईटचे साठे आहेत.


क्रोमाइट 

धातु उद्योग किमतीखळ्यांवर प्रक्रिया करणारे उद्योग व रसायन उद्योग यामध्ये क्रोमाइट चा उपयोग होतो. भारतातील एकूण क्रोमाइटच्या साठ्यापैकी सुमारे दहा टक्के साठा महाराष्ट्रात असून तो भंडारा-गोंदिया सिंधुदुर्ग व रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आहे.


चुनखडी

चुन्याचा मूलभूत पदार्थ चुना फलक आहे बांधकामात जोडण्यासाठी लागणारा चुना हा चुनखडक बाजून तयार केला जातो भरपूर प्रमाणात विखुरलेल्या मातीच्या चुनखडीच्या रूपात असलेल्या कंकरापासून चुनाव उपलब्ध होतो महाराष्ट्रात भारताच्या चुनखडीचा 9% साठा व उत्पादन फक्त दोन टक्के आहे महाराष्ट्रात चुनखडीच्या अंदाजे साठे 4000 दशलक्ष टन इतके आहेत. महाराष्ट्रात चुनखडीचे साठे प्रामुख्याने यवतमाळ गडचिरोली चंद्रपूर या जिल्ह्यात विंध्येयन खडकात आहेत.


डोलोमाईट

डोलोमाईट हे लोह पोलाद निर्मितीसाठी वापरले जाते व काही प्रमाणावर खत कारखान्यांमध्ये वापरतात. याचे साठे प्रामुख्याने यवतमाळ चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आहेत याशिवाय रत्नागिरी व नागपूर जिल्ह्यात डोलोमाईट आढळते चौरस प्रस्तर समूहाची निगडित असलेले डोलोमाईटचे साठे मात्र केवळ नागपूर जिल्ह्यात आहेत भारताच्या डोलोमाईटच्या एकूण साठ्यापैकी पैकी फक्त एक टक्का साठा महाराष्ट्रात आहे.

Leave a Comment