भारतीय अर्थव्यवस्था दुसरी पंचवार्षिक योजना

 भारतीय अर्थव्यवस्था

दुसरी पंचवार्षिक योजना


 कालावधी : 1 एप्रिल 1956 ते 31 मार्च 1961

 मुख्य भर : जड व मूलभूत उद्योग

प्रतिमान : पी सी महालनोबिस प्रतीमान.

                                         पी.सी. महलनोबिस

योजनेचे उप नाव : नेहरू महालनोबिस योजना (भौतिकवादी योजना)

योजनेचा खर्च : प्रस्तावित खर्च 4800 कोटी, वास्तविक खर्च 4600 कोटी रु.

उद्दिष्टे :

1) विकासाचा दर 7.5% प्रति वर्ष एवढा संपादन करणे.

2) जड व मूलभूत उद्योगांची स्थापना करून औद्योगीकरण.

3) दहा ते बारा लाख व्यक्तींसाठी नवीन रोजगार.

4) आर्थिक नीतीचे लक्ष – समाजवादी समाजरचनेचे तत्व(socialistic pattern of society). [तत्त्वाचा प्रथम स्विकार जानेवारी 1955 अधिवेशन अध्यक्ष यूएन ढेबर]

5) विशेष घटनाक्रम:

i. दुसरे औद्योगिक धोरण 30 एप्रिल 1956 रोजी घोषित करण्यात आले.

ii. दुसऱ्या योजनेमध्ये राज्य स्तरावर खादी व ग्रामोद्योग कार्यक्रमाची सुरुवात 1957- 58 मध्ये करण्यात आली.

iii. 1960-61 मध्ये सघन कृषी जिल्हा कार्यक्रम(IADP) सुरू करण्यात आला.



हाती घेण्यात आलेले प्रकल्प :

1) भिलाई पोलाद प्रकल्प रशियाच्या मदतीने 1959 मध्ये

2) रुरकेला पोलाद प्रकल्प पश्चिम जर्मनीच्या मदतीने 1959 मध्ये

3) दुर्गापूर पोलाद प्रकल्प ब्रिटनच्या मदतिने 1962 मध्ये

4) BHEL (Bharat heavy electricals limited) भोपाळ

5) दोन खत कारखाने I) नानगल ii) रूरकेला

 मूल्यमापन :

1) वाढीचा दर 4.21 टक्के एवढा संपादित केला गेला.

2) पोलाद उद्योगाची विशेष वाढ

3) समाजवादी समाजरचना चे उद्दिष्ट गाठण्यात अपयश

4) सामाजिक क्षेत्रात विशेषतः शिक्षण व आरोग्यसेवा विशेष वाढ

5) खालील प्रश्नांना सामोरे जावे लागले.

I. सुवेझ कालव्याचा प्रश्न

II. मोसमी पावसाची कमतरता

III. परकीय चलनाच्या साठ्यातील घट

6) किमतीचा निर्देशांक 30 टक्क्यांनी वाढला.

पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी पुढे दिलेल्या लिंक वर  क्लिक करा.

Download





Leave a Comment