पीएसआय मुख्य 2020 परीक्षेचा निकाल जाहीर | येथे बघा कट ऑफ आणि शारीरिक चाचणीसाठी पात्र उमेदवारांची यादी


महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारा पोलीस उपनिरीक्षक या पदासाठी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट व मुख्य परीक्षा पार पडली. या परीक्षेच्या दोघेही उत्तर तालिका आल्यानंतर आयोगाने आज दिनांक 17 नोव्हेंबर 2022 रोजी पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर करून शारीरिक चाचणीसाठी पात्र झालेले उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेली आहे.


पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा 2020

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाधाराव पोलीस उपनिरीक्षक या पदासाठी 2020 या वर्षातील रिक्त पदांसाठी पोलीस उपनिरीक्षक 2020 मुख्य परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. यादी तुम्ही या पेज वरून डाऊनलोड करू शकतात.


650 जागांसाठी होणार शारीरिक चाचणी आणि मुलाखत

वर्ष 2020 मधील जाहिरातीस अनुसरून पोलीस उपनिरीक्षक या पदासाठी 650 जागा रिक्त आहेत आणि त्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब परीक्षेतून भरल्या जाणार आहेत.


एकूण 2616 उमेदवार शरीरिक चाचणीसाठी पात्र

आयोगाने आज प्रसिद्ध केलेल्या निकालामध्ये शारीरिक चाचणीसाठी एकूण 2616 उमेदवार पात्र झालेले आहेत. जाणून घ्या शारीरिक चाचणीचे स्वरूप.


या वेळेपासून शारीरिक चाचणी असेल पात्रता स्वरूपाची

दुय्यम सेवा 2020 पासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने शारीरिक चाचणी 60 गुणांसाठी पात्र स्वरूपाची केली असून त्याचे गुण अंतिम निवड यादी मध्ये मोजले जाणार नाहीत. पोलीस उपनिरीक्षक या पदासाठी 100 गुणांची शारीरिक चाचणी होत असते. यामध्ये धावणे गोळा फेक आणि pull-up हे इव्हेंट असतात.


पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा 2020 निवड झालेल्या उमेदवारांची यादी डाऊनलोड करा

आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रसिद्ध केलेली पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा 2020 ची यादी आपण खालील लिंक वरून डाऊनलोड करू शकता

  DOWNLOAD PDF  


पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा 2020 साठी कट ऑफ

पोलीस उपनिरीक्षक या पदासाठी मुख्य परीक्षा एकूण 400 गुणांसाठी घेतले जाते यामध्ये पेपर एक आणि पेपर दोन असे दोन पेपर असतात. प्रत्येक पेपर 200 गुणांचा असतो. पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा 2020 चा कट ऑफ ओपन कॅटेगिरी साठी 280.50 लागलेला आहे. खालील फोटोमध्ये तुम्ही कॅटेगिरी नुसार कट ऑफ बघू शकता.


जर तुमचं नाव या यादीमध्ये असेल तर तुम्हाला शुभेच्छा. आपल्याला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा.

Leave a Comment