नमस्कार मित्रांनो, जर तुम्हाला पोलीस उपनिरीक्षक बनायचं असेल तर एमपीएससी द्वारा घेण्यात येणारी संयुक्त गट व अराजपत्रित पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा शारीरिक चाचणी आणि मुलाखत तुम्हाला पार करावी लागते.
हे सर्व टप्पे पार करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही कोणत्या पुस्तकातून तयारी करतात..
योग्य पुस्तक निवडून जर तीच वारंवार वाचल्या गेली तर अपेक्षित यश मिळते म्हणूनच या पोस्टच्या माध्यमातून मी तुमच्यासोबत महाराष्ट्र राज्यातून दुसऱ्या क्रमांकाने 2019 ची संयुक्त गट ब परीक्षा पास करून पोलीस उपनिरीक्षक या पदी द्वितीय क्रमांक मिळवलेले गणेश यलमार सर यांची संदर्भसूची शेअर करीत आहे.
गणेश यलमार सर, पोलीस उपनिरीक्षक राज्यातून द्वितीय 2019
प्रथमता गणेश सरांचे गुण बघूया.
मुख्य परीक्षा गुण – 138
मैदानी चाचणी गुण – 98
मुलाखत गुण – 28
एकूण गुण – 264
मित्रांनो, पूर्व परीक्षा 100 गुणांसाठी घेतली जाते यामध्ये एकूण 100 प्रश्न असतात.
पूर्वपरीक्षेचा अभ्यासक्रम बघा : MPSC PSI prelims Syllabus
पूर्व परीक्षा संदर्भ सूची
चालू घडामोडी
- मासिक पृथ्वी प्रकाशनाची परिक्रमा
- इयर बुक Simplified पब्लिकेशन
राज्यघटना
- भारताची राज्यघटना रंजन कोळंबे सर किंवा इंडियन पोलिटी लक्ष्मिकांत
- पंचायत राज किशोर लवटे सर
इतिहास
- अकरावी इतिहास जुने स्टेट बोर्डाचे पुस्तक
- महाराष्ट्राचा इतिहास गाठाळ सर
- महाराष्ट्रातील समाज सुधारक आणि व्यक्ती विशेष उमेश कुदळे सर रयत प्रबोधिनी
विज्ञान
- महाराष्ट्र स्टेट बोर्ड ची पुस्तके आठवी ते दहावी
- सायन्स कोणते सर किंवा भस्के सर
अर्थशास्त्र
- भारतीय अर्थव्यवस्था रंजन कोळंबे सर किंवा अर्थव्यवस्था किरण देसले सर भाग 1
भूगोल
- महाराष्ट्राचा भूगोल ए बी सवदी सर किंवा महाराष्ट्राचा भूगोल दीपस्तंभ प्रकाशन
- महाराष्ट्र स्टेट बोर्ड ची पुस्तके सहावी ते बारावी
गणेश यलमार सर पीएसआय महाराष्ट्रातून द्वितीय – मुख्य परीक्षा पुस्तक सूची
पीएसआय मुख्य परीक्षेला एकूण दोन पेपर असतात
पेपर 1- 100 प्रश्न 200 गुण
पेपर 2 -100 प्रश्न 200 गुण
मुख्य परीक्षा पेपर 1 संदर्भ साहित्य
मराठी
- मो रा वाळंबे सर
- जुन्या प्रश्नांच्या सरावासाठी प्रीवियस ईयर क्वेश्चन लोकसेवा प्रकाशनाचा प्रश्नसंच मराठी आणि इंग्लिश
इंग्लिश
- बाळासाहेब शिंदे सर
- गणेश कड सरांचा क्लास गरज किंवा शक्य असल्यास
- Vocabulary मागील वर्षी चे सर्व प्रश्न पाठ करणे.
चालू घडामोडी पूर्वपरीक्षे प्रमाणे संदर्भ वापरावेत
संगणक
- मागील वर्षी चे प्रश्न
- उत्तम पवार सरांच्या नोट्स
RTI व RTS
मुख्य परीक्षा पेपर 2 संदर्भ साहित्य
कायदे
- ज्ञानेश्वर पाटील किंवा किशोर लवटे सर
- जुने प्रश्न विश्लेषण उत्तम पवार आदिती प्रकाशन
गणित बुद्धिमत्ता
- पूर्वपरीक्षेत प्रमाणे पुस्तक वापरावी
- जुने प्रश्न वारंवार सोडवणे पुस्तक g किरण सर
इतिहास भूगोल राज्यघटना – यासाठी पूर्वपरीक्षेला वापरलेले संदर्भ साहित्य वापरावे.