एमपीएससी गट क पूर्व आणि मुख्य परीक्षा अभ्यासक्रम 2026 | येथून डाउनलोड करा

एमपीएससी गट क पूर्व आणि मुख्य परीक्षा अभ्यासक्रम 2026:MPSC Group C Syllabus 2026,एमपीएससी गट क अभ्यासक्रम 2026,MPSC Group C Syllabus PDF Download,गट क पूर्व आणि मुख्य परीक्षा स्वरूप,MPSC group C prelim and Mains Syllabus 2026,MPSC group C Syllabus PDF download

Overview Table

MPSC गट क परीक्षा २०२६: मुख्य हायलाइट्स (MPSC Group C Exam 2026 Overview)

महत्त्वाचा घटकतपशील / माहिती
परीक्षेचे नावएमपीएससी गट क संयुक्त परीक्षा २०२६ (MPSC Group C Combined Exam 2026)
आयोजक संस्थामहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)
समाविष्ट पदेग्राम महसूल अधिकारी (तलाठी),लिपिक-टंकलेखक (Clerk-Typist), कर सहाय्यक (Tax Assistant), उद्योग निरीक्षक (Industry Inspector), दुय्यम निबंधक (Sub-Registrar), तांत्रिक सहाय्यक (Technical Assistant) इत्यादी.
निवड प्रक्रिया (Selection Process)१. पूर्व परीक्षा (Prelims)
२. मुख्य परीक्षा (Mains)
नकारात्मक गुण (Negative Marking)१/४ (२५%) — प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ गुण वजा
परीक्षा माध्यममराठी व इंग्रजी
अधिकृत वेबसाईटmpsc.gov.in

एमपीएससी गट क पूर्व परीक्षा अभ्यासक्रम (Latest Updated)

पूर्व परीक्षा स्वरूप (Prelims Exam Pattern)

पूर्व परीक्षा ही सर्व गट-क पदांसाठी (उदा. तलाठी ,लिपिक-टंकलेखक, कर सहाय्यक, उद्योग निरीक्षक, दुय्यम निबंधक इ.) सामायिक (Combined) घेतली जाते.

तपशीलमाहिती / स्वरूप
परीक्षेचे स्वरूपवस्तुनिष्ठ बहुपर्यायी (MCQs – OMR Sheet)
एकूण प्रश्न१०० प्रश्न
एकूण गुण१०० गुण
कालावधी१ तास (६० मिनिटे)
परीक्षेचे माध्यममराठी व इंग्रजी
प्रश्नपत्रिका पातळीपदवी (Degree Level) / उच्च माध्यमिक
नकारात्मक गुण (Negative Marking)१/४ (२५%) — प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ गुण वजा केले जातात.

एमपीएससी गट क पूर्व परीक्षा सविस्तर अभ्यासक्रम खालीलप्रमाणे आहे:

अ.क्र.विषय
सामान्य क्षमता चाचणी
१)इतिहास – आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास.
२)भूगोल – महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह – पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, रेखांश-अक्षांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे, इत्यादी.
३)अर्थव्यवस्था
भारतीय अर्थव्यवस्था – राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीति, इत्यादी.
शासकीय अर्थव्यवस्था – अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण, इत्यादी.
४)चालू घडामोडी – जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील.
५)राज्यशास्त्र
६)सामान्य विज्ञान – भौतिकशास्त्र (Physics), रसायनशास्त्र (Chemistry), प्राणिशास्त्र (Zoology), वनस्पतीशास्त्र (Botany), आरोग्यशास्त्र (Hygiene).
७)अंकगणित – बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक व टक्केवारी इत्यादी.
८)बुद्धिमापन चाचणी – उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न.

एमपीएससी गट क पूर्व परीक्षा सविस्तर अभ्यासक्रम download करण्यासाठी पुढील बटन वर क्लिक करा


MPSC गट क मुख्य परीक्षा स्वरूप (Mains Exam Pattern)

पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झालेले उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरतात. मुख्य परीक्षेत एकूण २ पेपर असतात. MPSC गट क पूर्व २०१८ ते २०२६ कट ऑफ

पेपरविषयप्रश्न संख्यागुणकालावधीमाध्यमस्वरूप
पेपर १मराठी व इंग्रजी
• मराठी (५० प्रश्न / ५० गुण)
• इंग्रजी (५० प्रश्न / ५० गुण)
१००२००१ ताससंबंधित भाषाMCQ
पेपर २सामान्य ज्ञान व बुद्धिमत्ता चाचणी
(General Studies & Intelligence Test)
१००२००१ तासमराठी व इंग्रजीMCQ
एकूणपेपर १ + पेपर २२००४००२ तास

MPSC गट क मुख्य पेपर १ अभ्यासक्रम

पेपर क्रमांक – १ – मराठी, इंग्रजी या विषयामध्ये खालील घटक/ उपघटकांचा समावेश असेल.

अ.क्र.विषय
मराठी :- सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे
इंग्रजी :- Common Vocabulary, Sentence structure, Grammar, use of Idioms and phrases & their meaning and comprehension of passage.

MPSC गट क मुख्य पेपर 2 अभ्यासक्रम

पेपर क्रमांक -२ – सामान्य क्षमता चाचणी या विषयामध्ये खालील घटक/ उपघटकांचा समावेश असेल.

अ.क्र.विषय
१.सामान्य बुद्धिमापन व आकलन – उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न
२.चालू घडामोडी – जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील.
३.अंकगणित व सांख्यिकी
४.माहितीचा अधिकार अधिनियम २००५ (as updated) व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५
५.भारतीय संघ राज्यव्यवस्था, भारतीय राज्यघटना, स्थानिक स्वराज्य संस्था, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ व कायदेमंडळ इत्यादी
घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्त्वे, घटनेची महत्त्वाची कलमे / ठळक वैशिष्ट्ये, केंद्र व राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क व कर्तव्ये, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे- शिक्षण, युनिफॉर्म सिव्हिल कोड, स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ – कर्तव्ये, अधिकार व कार्य, राज्य विधिमंडळ- विधानसभा, विधानपरिषद व त्यांचे सदस्य, अधिकार, कार्य व कर्तव्ये, विधि समित्या इत्यादी
६.आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास – सामाजिक व आर्थिक जागृती (१८८५-१९४७), महत्त्वाच्या व्यक्तींचे कार्य, समाज सुधारकांचे कार्य, स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमानपत्रे, शिक्षणाचा परिणाम, स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी, राष्ट्रीय चळवळी
७.भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल – महाराष्ट्राचा व भारताचा प्राकृतिक (Physical) भूगोल, मुख्य प्राकृतिक (Physiographic) विभाग, हवामान शास्त्र (Climate), पर्जन्यमान व तापमान, पर्जन्यातील विभागवार बदल, नद्या, पर्वत व पठार, विविध भूरूपे, राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग, नैसर्गिक संपत्ती- वने व खनिज, मानवी व सामाजिक भूगोल, लोकसंख्या, लोकसंख्येचे स्थानांतर (Migration of Population) व त्याचे उगम (Source) आणि गंतव्यस्थानावरील (Destination) परिणाम, ग्रामीण वस्त्या व तांडे, झोपडपट्ट्या व त्यांचे प्रश्न.
पर्यावरण – मानवी विकास व पर्यावरण, पर्यावरणपूरक विकास, नैसर्गिक साधनसंपत्तीचे संधारण विशेषतः वनसंधारण, विविध प्रकारची प्रदूषणे व पर्यावरणीय आपत्ति, पर्यावरण संवर्धन कार्यरत असलेल्या राज्य / राष्ट्र/ जागतिक पातळीवरील संघटना / संस्था इत्यादी.
८.सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान –
अ) भौतिकशास्त्र (Physics), ब) रसायनशास्त्र (Chemistry),
क) प्राणीशास्त्र (Zoology), ड) वनस्पतीशास्त्र (Botany)
इ) दूर संवेदन, हवाई व ड्रोन छायाचित्रण, भौगोलिक माहिती प्रणाली व त्याचे उपयोजन (Remote Sensing, Aerial and drone photography, Geographic Information System (GIS) and it’s application etc.)
फ) माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान (Information and communication technology.)
९.अर्थव्यवस्था व नियोजन, विकास विषयक अर्थशास्त्र
१ समग्रलक्षी अर्थशास्त्र
१.१ समग्रलक्षी अर्थशास्त्र
१.२ वृद्धी आणि विकास
१.३ सार्वजनिक वित्त
१.४ आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवल
२ भारतीय अर्थव्यवस्था
२.१ भारतीय अर्थव्यवस्था, भारतीय अर्थव्यवस्थेची आव्हाने व आर्थिक सुधारणा
२.२ भारतीय शेती व ग्रामीण विकास
२.३ सहकार
२.४ मौद्रिक व वित्तीय क्षेत्र
२.५ सार्वजनिक वित्त आणि वित्तीय संस्था
२.६ उद्योग व सेवा क्षेत्र
२.७ पायाभूत सुविधा विकास
२.८ आंतरराष्ट्रीय व्यापार आणि भांडवल
२.९ महाराष्ट्राची अर्थव्यवस्था

एमपीएससी गट क मुख्य परीक्षा सविस्तर अभ्यासक्रम download करण्यासाठी पुढील बटन वर क्लिक करा


Leave a Comment