एमपीएससी च्या 2014 च्या परीक्षेमध्ये डीवायएसपी हे पद मिळवून किरण सूर्यवंशी सर राज्यात पहिले आले. त्यांना उपजिल्हाधिकारी हे पद मिळत होते परंतु पोलीस दरामध्ये काम करण्याची आवड असल्यामुळे त्यांनी डीवायएसपी हे पद निवडले. त्यांनाही कार्यक्षेत्र नक्कीच आवडायची. त्यांचे प्रशिक्षण नाशिक येथे पूर्ण झालेले आहे व ते सध्या डीवायएसपी म्हणून एटापल्ली-रोहा रायगड येथे कार्यरत आहेत.
महाराष्ट्रातील लाखो तरुण-तरुणी एमपीएससीच्या परीक्षा देत असतात परीक्षा देताना अनेक अडचणी आपल्याला येतात त्या अडचणीवर मात करण्यासाठी किरण सूर्यवंशी सरांची छोटीशी माहिती मी तुम्हाला या लेखांमध्ये देणार आहे.
किरण सूर्यवंशी सर सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील गोंदी या गावचे रहिवासी होते. तेथे त्यांचे इयत्ता तिसरी पर्यंत शिक्षण झालं. आणि पुढील शिक्षणासाठी ते दापोली येथे गेले. त्यांनी बीएससी एग्रीकल्चर चे शिक्षण कराड येथील महाविद्यालयांमधून पूर्ण केले. त्यांना स्पर्धा परीक्षांविषयी ची माहिती पुण्यातच मिळाली आणि पुण्यामध्ये स्पर्धा परीक्षांचे वातावरण असल्यामुळे त्यांनी स्पर्धा परीक्षांकडे वळण्याचा निर्णय घेतला.
कठोर परिश्रमातून त्यांनी एमपीएससी च्या 2014 च्या महाराष्ट्र राज्य सेवा पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा आणि मुलाखत पार करून डीवायएसपी हे पद मिळवले. डी वाय एस पी हे गट अ चे पद आहे. त्यांना उपजिल्हाधिकारी हे पद देखील मिळाले असते. परंतु लहानपणापासूनच पोलीस खात्यामध्ये नोकरी करण्याची आवड असल्यामुळे त्यांनी डीवायएसपी हे पद निवडले.
मित्रांनो किरण सूर्यवंशी सरांनी सांगितलेल्या खालील गोष्टी तुमच्या साठी महत्त्वपूर्ण ठरू शकतात-
- तुम्ही आपल्या आवडीनुसार क्षेत्र निवडा म्हणजे मनापासून काम केल्या जातं,
- ध्येय निश्चित करा मग काही अवघड राहत नाही.
- आपल्या भोवतीच्या वातावरणाचा परिणाम आपल्यावर होत असतो म्हणून वातावरणाची निवड विचारपूर्वक करा.
- वृत्तपत्रे व मासिके वाचून आपली विचार करण्याची आणि मत बनवण्याची प्रवृत्ती विकसित करा.
मित्रांनो तुम्ही जर एमपीएससी परीक्षेची तयारी करत असाल तर खालील लिंक तुमच्या साठी महत्वपूर्ण आहेत.
एमपीएससी अभ्यासक्रम
एमपीएससी पुस्तक सूची
एमपीएससी मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका
Common FAQ
किरण सूर्यवंशी कोण आहे?
किरण सूर्यवंशी हे एमपीएससीच्या 2014 च्या परीक्षेत डीवायएसपी पद मिळवून राज्यात प्रथम आलेले आहे.
राज्यसेवा 2014च्या परीक्षेमध्ये डीवायएसपी पद राज्यात प्रथम कोण आहे?
एमपीएससी राज्यसेवा 2014 च्या परीक्षेमध्ये राज्यात प्रथम सातारा जिल्ह्यातील किरण सूर्यवंशी सर आहेत.