“सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एमपीएससीची संयुक्त गट ब परीक्षा २०२० पुढे ढकलण्यात आलेली आहे. पुढील वेळापत्रक यथावकाश जाहीर करण्यात येईल.”
मित्रांनो 11 एप्रिल ला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची एमपीएससी अराजपत्रित संयुक्त गट ब पूर्वपरीक्षा घेतली जाणार आहे. परंतु corona च्या वाढत्या पार्श्वभूमीवर परीक्षा होणार की नाही याबाबत सर्वांमध्येच अजूनही संभ्रम आहेत.
एमपीएससी प्रत्येक परीक्षेच्या पार्श्वभूमीवर 4-5 दिवस अगोदर मार्गदर्शक सूचना जाहीर करते, त्या सूचना बहुदा परीक्षेच्या ठिकाणी वेळेवर हजर राहणे आणि कोरोना संबंधी काळजी घेणे याविषयी असतात. म्हणूनच आयोगाने 7 एप्रिल रोजी अशा स्वरूपाच्या मार्गदर्शक सूचना आपल्या ऑफिशियल वेबसाईटवर जाहीर केल्या. त्यामुळे परीक्षा शंभर टक्के होणार असं विद्यार्थ्यांना वाटत होतं.
विद्यार्थ्यांची मागणी परीक्षा पुढे ढकलण्याची आहे.
विद्यार्थी असं का म्हणत आहे.? पार्श्वभूमी जाणून घ्या:
राज्यसेवा पूर्व परीक्षा एप्रिल 2020 मध्ये घेण्यात येणार होती, परंतु त्याच काळामध्ये भारतामध्ये कोरोना चे संक्रमण वाढल्यामुळे ती परीक्षा चार ते पाच वेळा पुढे ढकलण्यात आली आणि बऱ्याच दिवसांनी त्या परीक्षेचे पुन्हा नव्याने वेळापत्रक जाहीर करण्यात आले आणि शेवटी राज्यसेवा पूर्व परीक्षा 11 मार्च 2021 ला घेण्याचे ठरवले होते,परंतु सरकारने वेळेवर निर्णय घेऊन ती परीक्षा postpone झाली असं दोन दिवस अगोदर जाहीर केलं आणि त्या वेळेस corona ची परिस्थिती सामान्य होती लॉक डाउन नव्हता म्हणूनच विद्यार्थ्यांनी रस्त्यावर येऊन संताप व्यक्त केला व त्यांच्या या रोषामुळे राज्य सरकारने त्यांना आश्वासन दिले की परीक्षा लवकरात लवकर होईल. शक्य तेवढ्या लवकर घेण्यात येईल आणि म्हणूनच परीक्षेचे वेळापत्रक आठ दिवसाच्या आत तयार करण्यात आले व परिक्षा ही 21 मार्च 2021 ला घेण्यात आली.
त्या काळामध्ये परीक्षा पुढे ढकलणे हे योग्य नसल्याचे काही तज्ञांनी सांगितले होते.
परंतु आता परिस्थिती पूर्णतः वेगळी आहे.महाराष्ट्रामध्ये तर हजारोच्या संख्येने corona रुग्ण वाढत आहे. तसेच लॉकडाऊन देखील जाहीर करण्यात आला आहे. काही भागांमध्ये वाहतूक सुविधा बंद आहे. एवढेच नाही तर पुण्यामध्ये एमपीएससी चा अभ्यास करणारे दोन अभ्यार्थी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. काही मुलं हे positive आहेत तर काही मुलं quarantine आहेत, या अशा वातावरणात परीक्षा घेण्याचे रिस्क शासनाने घेऊ नये अशी बर्याच नेत्यांची देखील मागणी आहे.
याबाबत मुख्यमंत्र्यांची भूमिका:
विविध नेत्यांच्या मागणीवरून मुख्यमंत्र्यांनी याबाबत बैठक बोलवली आहे.(आज 9 एप्रिल ला) त्या बैठकीतील निर्णय अद्याप माहित झालेला नाही.
राज ठाकरे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची संयुक्त गट ब पूर्व परीक्षा पुढे ढकलण्या संबंधी मुख्यमंत्र्यांशी फोन करून चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी याबाबत कोणतेही आश्वासन दिले नाही. मात्र मुख्यमंत्र्यांची भूमिका सकारात्मक असल्याची माहिती आहे.
या विषयी नवीन माहिती आल्यास ती याच पेजवर खाली अपडेट करण्यात येईल
“सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एमपीएससीची संयुक्त गट ब परीक्षा २०२० पुढे ढकलण्यात आलेली आहे. पुढील वेळापत्रक यथावकाश जाहीर करण्यात येईल.”