MPSC Success Story: PSI Amol Gutukale MPSC 2022 rank 1 | अमोल सरांचा प्रवास

Success Story: Amol Gutukale MPSC rank 1 PSI 2022: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारा घेण्यात आलेल्या महाराष्ट्र एमपीएससी दुय्यम सेवा अराजपत्रित परीक्षा 2022 मधील पोलिस उपनिरीक्षक या पदाचा नुकताच निकाल जाहीर करण्यात आला. या निकलामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील 599 मुले पोलिस उप निरीक्षक बनली. सदर निकलामध्ये अमोल भैरवनाथ घुटूकडे (Ghutukade Amol Bhairavnath) यांचा महाराष्ट्रातून पहिला क्रमांक आलेला आहे. त्यांना एकूण 40 गुणांपैकी 363.50 गुण मिळून ते राज्यात प्रथम आलेले आहेत

Ghutukade Amol Bhairavnath

ParticularsDetails
Exam NameMPSC Combine group B exam 2022
PostPolice Sub Inspector
Rank 1 CandidateGhutukade Amol Bhairavnath
Total marks400 ( mains )+ 40 ( Interview )
Rank 1 candidate marks363.50
CategoryNT C
Birth date30/11/1994

MPSC Success Story : Ghutukade Amol Bhairavnath

अमोल हा एक छोट्याश्या दुष्काळी खेळयातून येतो आणि त्याचे इयत्ता 10 वी पासून स्पर्धा परीक्षेतुन अधिकारी बणण्याचे स्वप्न होते. त्यांनी त्यांचे इंजीनीरिंग चे शिक्षण 2018 ला पूर्ण करून काही वेळ खाजगी नोकरी केली ,पण त्यामध्ये लक्ष न लागल्यामुळे आपले लहानपणीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते पुण्यात आले आणि अभ्यास सुरू केला. त्याचे वडील शेती करतात. त्याने MPSC च्या अभ्यासाला सुरुवात 2021 नंतर केली आणि सातत्याने अभ्यास करून यश मिळवले. मुख्य परीक्षा झाल्यानंतर प्रॉपर फिजिकल ची तयारी केली आणि मुख्य परीक्षेला चांगले गुण मिळाल्यावर PSI होईल हे समजले होते पण महाराष्ट्रात प्रथम येणे याचा आनंद झाला असे अमोल सांगतो.

अमोल सकाळपासून ते रात्रीपर्यंत अभ्यास करायचे आणि मुख्य परीक्षेच्या दरम्यान ते सकाळी 5 वाजता त्यांच्या मित्रांसोबत discussion ला बसायचे. शिस्तीने अभ्यास केला. अमोल सांगतो की “मी daily 2-3 विषय घ्यायचो. सकाळी 8-9 ला नाश्ता करून अभ्यासाला बसायचो आणि जेवणाच्या वेळेपर्यंत एक विषय घ्यायचो. दुपारी झोप येण्याच्या कारणामुळे अर्धा तास आराम करून पुन्हा अभ्यासाला बसायचो. त्यानंतर गणित बुद्धिमत्ता सोडवायचो , नंतर चहाचा ब्रेक घेऊन दूसरा विषय वाचायचो आणि रात्री जेवनांतर आज दिवसभर जे वाचले ते पुनः एकदा बघून घ्यायचो आणि थोडा वेळ चालू घडामोडी वाचायचो. “

अमोल सांगतो की – अभ्यासादरम्यान अनावश्यक भीती बाळगायला नको आणि सोशल मीडिया चा कमीत कमी वापर करावा . ज्या गोष्टी मुले डिस्टर्ब होते त्या सोडून द्या. रिवीजन आणि सराव यावर यश अवलंबून आहे. वेळ लावून प्रश्न पत्रिका सोडवा आणि चुका शोधून त्यावर काम करा. यश नक्की मिळेल.

Leave a Comment