एमपीएससी निकाल: महाराष्ट्र मध्ये विविध परीक्षांच्या भरतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगा द्वारा विविध परीक्षा आयोजित केल्या जातात. एमपीएससी परीक्षेचे निकाल जाहीर करताच एमपीएससी उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण बघायला मिळते. आज अभ्यास करत असलेला विद्यार्थी अगदी निकालाने लगेचच अधिकारी बनल्याचे दिसते. एमपीएससी द्वारा विविध गट ब संवर्गातील पदांसाठी महाराष्ट्र राज्य दुय्यम सेवा परीक्षा घेतली जाते. आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र राज्य दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 202२ चे निकाल लावलेले आहेत.
महाराष्ट्र राज्य दुय्यम सेवा गट ब मुख्य परीक्षा 2022 निकाल
महाराष्ट्रातील विविध केंद्रांवर महाराष्ट्र राज्य दुय्यम सेवा गट ब मुख्य परीक्षा 2022 घेण्यात आली होती. या परीक्षेमध्ये एकूण दोन पेपर असतात. खालील पदांसाठी ही परीक्षा घेतली जाते:
- पोलीस उपनिरीक्षक
- राज्यकर निरीक्षक
- सहाय्यक कक्ष अधिकारी
- दुय्यम निबंधक
वर दिलेल्या पदांपैकी दोन पदांचा निकाल आयोगाने लावलेला आहे. आता तुम्ही राज्य कर निरीक्षक आणि दुय्यम निबंधक यांचा निकाल बघू शकतात.
निकाल कसा बघता येईल
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारा लावलेला निकाल बघण्यासाठी खालील पद्धतीचा वापर करू शकता. किंवा या पोस्टच्या सर्वात खाली याद्या दिलेल्या आहेत त्या डाऊनलोड करून वाचू शकतात.
- निकाल बघण्यासाठी प्रथमतः mpsc.gov.in या वेबसाईटवर जा.
- तिथे गेल्यानंतर लेटेस्ट अपडेट्स मध्ये तुम्हाला आज आलेल्या अपडेट्स दिसतील.
- तिथे राज्यघट निरीक्षक आणि दुय्यम निबंधक यांच्या याद्या उपलब्ध आहेत.
- किंवा खाली मी पीडीएफ दिलेल्या आहेत.
येथे बघा एमपीएससी निकालाच्या निवड याद्या
येथे तुम्हाला आज जाहीर झालेल्या निकालाच्या पीडीएफ मिळतील. पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी फक्त तुम्हाला त्यावर क्लिक करायचं आहे.
MPSC Sub registrar 2022 General merit list (दुय्यम निबंधक गुणवत्ता यादी 2022)
MPSC Sub registrar 2022 provisional merit list(दुय्यम निबंधक तात्पुरती निवड यादी 2022)
MPSC STI 2022 General merit list (राज्य कर निरीक्षक गुणवत्ता यादी 2022)
MPSC STI 2022 provisional merit list(राज्य कर निरीक्षक तात्पुरती निवड यादी 2022)
आम्हाला आशा आहे की तुम्हाला हवी असलेली माहिती इथून मिळाली असेल तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट करू शकता. आम्ही नक्की तुमच्या प्रश्नाचा उत्तर देण्याचा प्रयत्न करू.