Mpsc PSI prelims and mains syllabus with pdf Download


नमस्कार मित्रांनो,प्रत्येक परीक्षा
पास होण्यासाठी त्या परीक्षेचा अभ्यासक्रम अतिशय महत्त्वाचा आहे आणि म्हणूनच पोलीस
उपनिरीक्षक या पदाची परीक्षा पास होण्यासाठी त्या पदाच्या परीक्षेचा अभ्यासक्रम
आपल्याला माहित असणे गरजेचे आहे म्हणूनच या पोस्टमध्ये मी तुम्हाला पीएसआय पूर्व
आणि मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम विस्तृतरित्या सांगणार आहे.

In this post I am going to share MPSC
combine group B syllabus
specifically PSI prelims and Mains syllabus
pdf.

प्रथमतः पी. एस. आय. या पदाविषयी
काही बेसिक गोष्टी माहित करून घ्या :

महाराष्ट्र
लोकसेवा आयोगा द्वारा विविध परीक्षा घेण्यात येतात
,त्यातीलच एक परीक्षा म्हणजे एमपीयससी संयुक्त गट ब परीक्षा .

या परीक्षेमधून तीन
पदे भरली जातात:

     १. पोलीस उपनिरीक्षक (Police sub inspector-PSI)

     २. सहाय्यक कक्ष अधिकारी (Assistant Section Officer- ASO)

     ३. राज्य कर निरीक्षक ( State Tax Inspector-STI)


वर सांगितलेल्या
तीनही पदांसाठी एकच पूर्व परीक्षा घेतली जाते. म्हणूनच तिला संयुक्त पूर्व परीक्षा
असे म्हटले जाते. पूर्व परीक्षेमद्धे मिळालेल्या गुणानुसार प्रत्येक पदासाठी वेगवेगळे
कट ऑफ लागतात आणि त्यानुसार तुम्हाला मुख्य परीक्षेसाठी पात्र होता येते. (मागील वर्षी चे कट ऑफ बघण्यासाठी येथे क्लिक करा.) म्हणून पूर्व परीक्षेला तीनही पदांसाठी समान अभ्यासक्रम
असतो. या पोस्ट मध्ये आपण फक्त 
PSI या पदासाठीचा
अभ्यासक्रम बघणार आहोत.

PSI पूर्व परीक्षा अभ्यासक्रम : (PSI prelims syllabus 2022)

पूर्व परीक्षेला 100 प्रश्नांचा 100 गुणांचा एक पेपर असतो म्हणजेच प्रत्येक प्रश्नाला एक गुण व असे एकूण 100 प्रश्न असतात. यासाठी तुम्हाला एक तास वेळ दिला जात असतो. ( Negative marking is 1/4rth i.e. 0.25 marks will be substracted for each
wrong answer from the correct marks )

परीक्षेचे स्वरूप
वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असते.
i.e. Multiple Choice Questions(MCQ)

सामान्य क्षमता
चाचणी पेपर
1

  • चालू घडामोडी : जागतिक तसेच भारतातील
  • नागरिकशास्त्र : भारताच्या घटनेचा
    प्राथमिक अभ्यास
    , राज्य
    व्यवस्थापन (प्रशासन) ग्राम व्यवस्थापन (प्रशासन)
  • इतिहास : आधुनिक भारताचा इतिहास विशेषतः महाराष्ट्राचा
    इतिहास.
  • भूगोल : (विशेषतः महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष
    अभ्यासासह पृथ्वी जगातील विभाग ) हवामान
    , अक्षांश-रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी
  • अर्थव्यवस्था : भारतीय अर्थव्यवस्था –
    राष्ट्रीय उत्पन्न
    शेती
    उद्योग
    , परकीय
    व्यापार
    , बँकिंग
    ,लोकसंख्या
    ,दारिद्र्य
    व बेरोजगारी
    , मुद्रा
    आणि राजकोषीय नीति
    , इत्यादी.
    शासकीय अर्थव्यवस्था – अर्थसंकल्प
    , लेखा, लेखा परीक्षण इत्यादी
  • सामान्य विज्ञान : भौतिकशास्त्र ,रसायनशास्त्र ,वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र आणि
    आरोग्यशास्त्र
  • बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणित: बुद्धिमत्ता चाचणी –
    उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न.
    अंकगणित – बेरीज
    ,वजाबाकी
    , गुणाकार
    ,भागाकार, दशांश अपूर्णांक व
    टक्केवारी.

 अशा प्रकारे
आपल्याला पूर्व परीक्षेचा सिल्याबस
दिलेला आहे.

 

PSI मुख्य परीक्षा अभ्यासक्रम :

मित्रांनो पीएसआय
मुख्य परीक्षेला दोन पेपर असतात.

प्रत्येक पेपर 200 गुणांचा असतो.

यासाठी
अभ्यासक्रम व वेळ पुढे दिलेल्या पीडीएफ मध्ये तुम्हाला बघता येणार आहे.

पीडीएफ डाउनलोड
करा.



PSI प्रश्नपत्रिका २०१०-२०२० download करण्यासाठी पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा

PSI साठी कोणती पुस्तके वाचावीत 

5 thoughts on “Mpsc PSI prelims and mains syllabus with pdf Download”

Leave a Comment