MPSC marksheet: एमपीएससी द्वारा 30 एप्रिल 2023 रोजी महाराष्ट्र संयुक्त गट ब आणि गट क अराजपत्रित पूर्व परीक्षा घेण्यात आली आणि या परीक्षेचा निकाल किंवा सीमांकन रेषा जाहीर करण्यात आलेल्या आहेत परंतु उमेदवाराची गुण त्यांच्या खात्यामध्ये आज उपलब्ध करून दिलेले आहेत. त्यामुळे जर तुम्ही 30 एप्रिल 2023 रोजी ची कम्बाईन परीक्षा दिली असेल तर तुम्हाला तुमची गुण बघता येतील येथे तुम्हाला ते गुण बघण्यासाठी काय करावे लागेल ते सांगण्यात आलेले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग दरवर्षी विविध पदांच्या निवळीसाठी एमपीएससी संयुक्त पूर्व परीक्षा 2023 पार पाडते पूर्व परीक्षा झाल्यानंतर पूर्व परीक्षेमध्ये जे उमेदवार पात्र होतात त्यांची मुख्य परीक्षा घेण्यात येते आणि सर्वांना त्यांचे पूर्व परीक्षेचे गुण दाखविले जातात.
तुम्हाला तुमचे पूर्व परीक्षेचे गुण बघण्यासाठी खालील काही स्टेप्स फॉलो करावे लागतील.
- प्रथमतः https://mpsconline.gov.in/candidate या वेबसाईटवर जा.
- त्यानंतर लॉगिन येथे क्लिक करा.
- तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड टाका
- कॅपच्या कोड फील करा.
- आणि लॉगिन या बटणावर क्लिक करा.
- त्यानंतर माय अकाउंट या सेक्शन मध्ये जा.
- खालीच कॉल करून संयुक्त गट ब 2023 समोरील व्ह्यू view या बटणावर क्लिक करा.
- त्यानंतर वेबसाईटच्या उजव्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला तीन पर्याय दिसतील. त्यामध्ये तुम्ही तुमची रिस्पॉन्स शीट बघू शकतात आणि तुमचे गुण बघू शकतात.
- Result/Marksheet समोरील view बटणावर क्लिक करा.
- त्यानंतर कुठलीही एक पोस्ट सिलेक्ट करा आणि view या बटणावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुमच्यापुढे तुमचे गुणपत्रक येईल. या गुणपत्रकाचा एक स्क्रीन शॉट काढून ठेवा जेणेकरून भविष्यामध्ये तुम्हाला ते बघता येईल.
एमपीएससीच्या सीमांकन रेषा जाहीर झाल्यानंतर बऱ्याच उमेदवारांना त्यांचे गुण बघायचे असतात कारण परीक्षा दिल्यानंतर पहिली उत्तर तालिका येथे त्यानंतर गुण बघितले जातात त्यानंतर दुसरी परीक्षा उत्तर तालिका येथे आणि सीमांतन रेषा जाहीर होतात परंतु काही उमेदवारांचे नाव निवड यादीमध्ये दिसत नाही म्हणून गुण बघणे अतिशय महत्त्वाचा आहे कारण बऱ्याच वेळा आपण उत्तर पत्रिका तपासताना चुकीची तपासतो आणि त्यामुळे एक दोन गुण कमी जास्त होतो. म्हणूनच एमपीएससीने उमेदवारांचे गुणपत्रक त्यांच्या प्रोफाईल मध्ये उपलब्ध करून दिलेले आहे. जर तुम्हाला एमपीएससीच्या सीमांत रेषा बघायचे असतील तर तुम्ही खाली दिलेल्या लिंक बघू शकतात आणि जर तुम्ही एमपीएससी 2024 साठी तयारी करत असाल तर त्या परीक्षेचा अभ्यासक्रम देखील मी खाली दिलेला आहे त्यावर क्लिक करून तुम्ही अभ्यासक्रम बघू शकता.
महत्त्वाच्या लिंक्स