MPSC Updates: महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब परीक्षा घेतली जाते. या परीक्षेमध्ये महाराष्ट्रातील लाखोंच्या संख्येने उमेदवार सहभागी होतात. नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब मुख्य परीक्षा 2022 मधील सर्व पदांच्या उत्तर तालिका आयोगाने जाहीर केलेल्या आहेत त्याविषयी ही अपडेट आहे.
MPSC दुय्यम सेवा मुख्य २०२२
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक 29 ऑक्टोबर 2023 रोजी आयोजित महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022 मधील पोलीस उपनिरीक्षक, राज्यकर निरीक्षक, सहाय्यक कक्ष अधिकारी आणि दुय्यम निबंधक या पदांच्या प्रथम उत्तर तालिका उमेदवारांच्या माहितीसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या त्या संदर्भात उमेदवारांनी अधिक प्रमाणे स्पष्टीकरण देऊन ऑनलाईन पद्धतीने सादर केलेल्या हरकती, तसेच तज्ञांचे अभिप्राय विचारात घेऊन आयोगाने उत्तर तालिका सुधारित केलेली आहे आणि या उत्तर तालिकेतील उत्तरे अंतिम समजण्यात येतात.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारा दरवर्षी या परीक्षेचे आयोजन केले जाते आणि पूर्व परीक्षा पास झाल्यानंतर उमेदवार मुख्य परीक्षेसाठी बसतात मुख्य परीक्षेमध्ये आपल्याला किती गुण मिळाले हे बघण्यासाठी आपल्याला उत्तर तालिका तपासावी लागते. त्यासाठी एमपीएससी आयोग आपल्याला प्रथम उत्तर तालिका देत असतो, प्रथम उत्तर तालिकेवर जे काही ऑप्शन ऑब्जेक्शन घ्यायचे असतील ते ऑब्जेक्शन घेतल्यानंतर अंतिम उत्तर तालिका येत असते आणि त्यानुसार गुण मोजून तुमचे अंतिम गुण जाहीर होत असतात.
येथे बघा उत्तर तालिका
महाराष्ट्र दुय्यम सेवा गड व मुख्य परीक्षा 2022 च्या अंतिम उत्तर तालिका बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंक चा वापर करा. खाली दिलेल्या लिंक मध्ये एमपीएससीच्या सर्व प्रश्नपत्रिका तसेच त्यांच्या उतरतालिका देण्यात आलेल्या आहे त्यामुळे तुम्हाला सर्व माहिती एकाच ठिकाणी असलेली मिळेल.
एमपीएससीच्या सर्व अपडेट तुम्हाला एमपीएससी पॉइंट या वेबसाईट वरती दररोज मिळत राहतात त्यामुळे दैनंदिन स्वरूपामध्ये तुम्ही आमच्या वेबसाईटला भेट देऊ शकता. धन्यवाद!
आता एमपीएससीच्या अपडेट टेलिग्राम वर मिळवणे झाले सोपे टेलिग्राम चैनल जॉईन करा. link : Join Telegram