वर्ष व महोत्सव: बऱ्याच वेळा तुम्ही कुठेतरी शुभेच्छा देतांना वाचत असाल की आज अमुक अमुक संस्थेचा सुवर्ण महोत्सव/हीरक महोत्सव आहे, पण नेमके तुम्हाला माहीत आहे का की ते केव्हा साजरे केले जातात? चला आज जाणून घेऊया
Contents
show
विविध वर्ष व महोत्सव
- रौप्य महोत्सवी वर्ष – २५ वर्षांची पूर्ती
- सुवर्ण महोत्सवी वर्ष – ५० वर्षांची पूर्ती
- हीरक महोत्सवी वर्ष – ६० वर्षांची पूर्ती
- अमृत महोत्सवी वर्ष – ७५ वर्षांची पूर्ती
- शताब्दी महोत्सवी वर्ष – १०० वर्षांची पूर्ती
- शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष – १२५ वर्षांची पूर्ती
- शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष – १५० वर्षांची पूर्ती
- शतकोत्तर हीरक महोत्सवी वर्ष – १६० वर्षांची पूर्ती
- शतकोत्तर अमृत महोत्सवी वर्ष – १७५ वर्षांची पूर्ती
- द्वीशताब्दी महोत्सवी वर्ष – २०० वर्षांची पूर्ती