जागतिक भूख निर्देशांक | Global Hunger Index for MPSC and competitive exams

उपासमार जाणून घेण्यासाठी जागतिक उपासमार निर्देशांक हा उत्तम निर्देशांक समजला जातो.

जागतिक उपासमार निर्देशांक (GHI – Global Hunger Index)

1) कोण मोजते ? – 2006 मध्ये अमेरिकास्थित IFPRI (International Food Policy Research Institute) आणि जर्मनीस्थित Welthungerhilfe या 2 संस्थांनी GHI विकसित करून प्रकाशित केला. 2007 मध्ये आयरिश संस्था Concern Worldwide देखील यात सहभागी झाली. 2018 मध्ये मात्र IFPRI यातून बाहेर पडली. त्यामुळे 2018 व नंतरचे अहवाल Welthungerhilfe आणि Concern Worldwide यांनी बनवले आहेत.

2) कसा मोजला जातो? GHI काढण्यासाठी खालील 3 आयाम (dimensions) व त्यातील 4 निर्देशांक (indicators) विचारात घेतात. प्रत्येक आयामाला 1/3 भारांश दिला जातो.

i) अपुरा अन्नपुरवठा (Inadequate Food Supply) – अन्नपुरवठा अपुरा होतोय का? हे मोजण्यासाठी लोकसंख्येतील कुपोषण (undernourishment) हा निर्देशांक मोजला जातो.

ii) बालकुपोषण (Child Undernutrition) – कुपोषण 2 पद्धतींनी मोजले जाते. शुष्क कुपोषण (wasting) म्हणजे उंचीप्रमाणे अपुरे वजन असणारी बालके. खुरटे कुपोषण (stunting) म्हणजे वयाप्रमाणे अपुरी उंची असणारी बालके. iii) बालमृत्यू (Child Mortality) 5 वर्षांखालील बालकांमधील मृत्यूदर

(Under Five Mortality Rate) विचारात घेतात. वरील आयामांवरून GHI काढला जातो.

3) इष्टतम मूल्य किती ? – GHI 0 ते 100 दरम्यान असतो. ० म्हणजे चांगला निर्देशांक, अर्थात उपासमार नसणे. 0 ते 9.9 कमी (low) उपासमार. 10 ते

19.9 – मध्यम (Moderate) उपासमार. 20 ते 34.9 गंभीर (serious) उपासमार. 35 ते 49.9- धोक्याची घंटी (alarming). 50 व त्यापेक्षा जास्त उपासमार. अत्यंत भयावह (extremely alarming)

4) चालू अहवाल

i) 2021 च्या अहवालाचे शीर्षक ‘Hunger and Food Systems in Conflict Settings’ असे होते. एकुणातला हा 16 वा अहवाल होता. या अहवालानुसार (2018-2020 पाहणी कालावधीत) भारताचा GHI 27.5 होता. या अहवालात एकूण 116 देशांचा GHI देण्यात आला. या यादीत भारत 101 व्या क्रमांकावर होता.

ii) 2022 च्या अहवालाचे शीर्षक ‘Food Systems Transformation and Local Governance’ असे होते. एकुणातला हा 17

वा अहवाल होता. या अहवालानुसार भारताचा GHI 29.1 होता. 121 देशांच्या यादीत भारत 107 व्या क्रमांकावर होता.

iii) 2023 च्या अहवालाचे शीर्षक ‘The Power of Youth in Shaping Food Systems’ असे होते. एकुणातला हा 18 वा अहवाल होता. या अहवालानुसार भारताचा GHI 28.7 होता. 125 देशांच्या यादीत भारत 111 व्या क्रमांकावर होता. भारतातील उपासमार सध्या ‘गंभीर (serious)’ या गटात मोडते. निराशाजनक बाब म्हणजे या यादीत श्रीलंका 60 व्या, नेपाळ 69 व्या, बांगलादेश 81 व्या आणि पाकिस्तान 102 व्या क्रमांकावर होता.

Leave a Comment