Postman Mailguard 25/01/2021 Questions and tips
Postman/Mailguard पेपर 1 मध्ये तुम्हाला खालील क्रमानुसार प्रश्न विचारण्यात येतात:
a. General Knowledge
b. Math
c. Reasoning
ज्यांचा पेपर अजून व्हायचा बाकी आहे त्यांना काही सूचना:
- पेपरमध्ये ज्या स्वरूपाचे गणित विचारले जात आहे त्या स्वरूपावरून तुम्ही सुरुवातीला गणित
- न सोडवता बुध्दीमत्ता घ्या.(बुध्दीमत्ता सोपे विचारले जात असल्याने तुम्हाला paper संपेपर्यंत कॉन्फिडन्स राहील की तुमचे बरेच प्रश्न बरोबर येतील)
- यासाठी फक्त 30-35 मिनिटेच वेळ द्या.
- दुसऱ्या क्रमांक ला गणित सोडवायला घ्या
- यासाठी 35-40 मिनिटे द्या. प्रश्न राहिल्यास सोडून द्या.
- आणि उरलेल्या 20-25 मिनिटात GK अगदी 10 मिनिटात complete होऊ शकते. आणि उरलेला वेळ जे सोडून दिलेले आहेत त्यांना tick करून घ्या.
- कोणताही प्रश्न tick करण्याचे सोडू नका, सर्वच tick करा (कारण पेपर ला negative मार्किंग नाही)
खाली आज विचारलेले काही प्रश्न दिलेले आहेत:
Gk:
1) हैदराबाद कोणत्या नदीच्या किनाऱ्यावर आहे?
2) जनगणनेनुसार सर्वात कमी घनता असलेले राज्य कोणते?
3) कलम 338 A कशा संबंधित आहे?
4) जलंदर हे शहर कोणत्या राज्यात आहे?
5) चेरापुंजी हे ठिकाण कोणत्या पर्वतरांगेमध्ये आहे?
6) यंग इंडिया वृत्तपत्र कोणी सुरु केले?
7) जवाहरलाल नेहरू यांनी राष्ट्रीय झेंडा केव्हा फडकवला होता?
8) संविधानातील कलम 16 विषयी प्रश्न?
9) आलमगीर ही पदवी कोणत्या मुघल बादशहाला मिळाली होती?
10) नीतिशास्त्र वर आधारित तीन ते चार प्रश्न विचारले होते.
11) केरळ मधील पत्रकार दिलेला होता आणि हा कोणत्या राज्याचा आहे असं विचारलं होतं?
12) प्रंग्योंग सरोवर कोणत्या केंद्रशासित प्रदेशात आहे?
(इत्यादी प्रश्न मिळालेले आहेत, आणखी मिळाल्यास येथे update केल्या जातील)
बुध्दीमत्ता:
बुध्दीमत्ता मध्ये प्रश्न हे सोपे तसेच मध्यम लेव्हल चे विचारले जात आहे.
परंतु out of syllabus प्रश्न नाहीत ही आपल्यासाठी एक चांगली गोष्ट आहे.
प्रश्न सांगता येणार नाही पण कशा स्वरूपाचे येतात ते थोडक्यात सांगतो.
• काही आकृत्या असतात आणि त्यापासून एखादी आकृती तयार प्रश्र्नातील कोणत्या क्रमांकाच्या आकृत्या लागतील असे विचारतात.
• (जसे- प्रश्नात 5 आकृत्या दिल्या होत्या आणि या पाच अकृत्यांपैकी कोणत्या 3 आकृत्या घेऊन त्रिकोण तयार होईल?
• पाण्यातील प्रतिबिंब आकृत्या मधील न विचारता एखादा इंग्रजी शब्द दिला जातो.( किमान 1)
• पुढील संख्या काढा. (यामध्ये बेरीज वजाबाकी यावर आधारित विचारले जातात) (किमान 4…5)
• दिशा या टॉपिक वर अगदीच सोपे प्रश्न असतात. (किमान 4..5)
• विधाने आणि निष्कर्ष यावर प्रश्न (4..5)
• Sitting arrangements यावर 1 प्रश्न पण त्यावर आधारित 3..4 प्रश्न
• (प्रश्न दोन लाईन चे असतात किव्वा गोलाकार बसलेले मित्र यावर असतात.
• सहसंबंध (किमान 1)
गणित:
या पेपर मधील सर्वात कठीण नसलेला पण किचकट असलेला विषय.
प्रश्न सोपेच आहेत पण संख्या खूप मोठ्या दिल्या जातात त्यामुळे उदाहरण सोडवायला वेळ लागतो. आणि काही वेळा तर या संख्याच्या गोंधळामुळे उत्तरच येत नाही.😄
अभ्यासक्रमात दिलेल्या 8 टॉपिक वर प्रत्येकी 4…5 असे विचारतात. आणि 30/45 मिनिटात एकूण प्रश्न सोडवणे खूप कठीण आहेत जरी व्यक्ती math मध्ये phd असला तरीही.
मित्रांनो जेवढं सोप्या पद्धतने सांगता येईल तेवढं मी सांगितलेलं आहे. जर थोडी देखील मदत झाली असेल तर पोस्ट ला share नक्की करा.
#postman #gkpostman #mathpostman