MPSC ने राष्ट्रीय उत्पन्न या टॉपिक वर आयोगाने विचारलेले सर्व प्रश्न

MPSC previous year questions based on the topic National Income in economics: We have provided you all the question related to mpsc examinations with answer.

MPSC Economics PYQ with answers in Marathi – National Income

Q 1) भारतातील राष्ट्रीय उत्पन्नाच्या मापनासंदर्भात खालील विधाने विचारात घ्या :

(राज्यसेवा मुख्य जाने. 2023)

अ. निर्वाह शेतीमुळे आपणास राष्ट्रीय उत्पन्नाचा कमी आकडा प्राप्त होतो.

ब. वस्तू विनिमय पद्धतीच्या अस्तित्वामुळे आपणास राष्ट्रीय उत्पन्नाचा जास्त आकडा प्राप्त होतो.

क. काळ्या अर्थव्यवस्थेच्या अस्तित्वामुळे आपणास राष्ट्रीय उत्पन्नाचा जास्त आकडा प्राप्त होतो.

वरीलपैकी कोणती विधान/ने बरोबर आहेत ?

(1) अ, ब आणि क बरोबर आहेत

(2) अ आणि ब बरोबर आहेत

(3) अ आणि क बरोबर आहे

(4) फक्त अ बरोबर आहे

Answer : 4

Q 2). एकूण देशांतर्गत उत्पादन (GDP) आणि एकूण राष्ट्रीय उत्पादन (GNP) यामधील फरक खालीलपैकी कोणत्या विधानात प्रतिबिंबित होतो ?

(राज्यसेवा मुख्य जाने. 2023)

(1) GDP आणि GNP या दोन्ही संकल्पना एकच आहेत.

(2) GNP मध्ये देशातील उत्पादन घटकांनी परदेशात केलेली प्राप्ती मोजली जाते.

(3) GDP मध्ये देशातील उत्पादन घटकांनी परदेशात केलेली प्राप्ती मोजली जाते.

(4) GNP या संज्ञेत भांडवली घसारा वगळला जातो.

Answer : 2

Q 3) पुढीलपैकी कोणते उदाहरण/उदाहरणे स्थूल देशांतर्गत उत्पादन मोजमापाचा भाग नाही ?(राज्यसेवा मुख्य जाने. 2023)

अ. कार निर्मितीसाठी वापरलेल्या टायरचे मूल्य.

ब. जुन्या / वापरलेल्या पुस्तकांचे विक्री मूल्य.

क. हस्तांतरण देयके.

ड. मालमत्ता विक्री व्यवहार मध्यस्थाला दिलेली दलाली. पर्यायी उत्तरे :

(1) फक्त अ

(2) अ, ब आणि क

(3) अ, ब, क आणि ड

(4) ब आणि ड

Answer : 2

Q 4) राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संस्थेने मांडलेल्या खालील संज्ञांपैकी कोणती संज्ञा ‘तीव्र (क्रोनिक) बेरोजगारी’ दर्शविते ?

(राज्यसेवा मुख्य जाने. 2023)

(1) दैनिक स्थिती बेरोजगारी

(2) सद्य स्थिती बेरोजगारी

(3) नित्य स्थिती बेरोजगारी

(4) वरीलपैकी सर्व

Answer : 3

Q 5) बाजार किंमतीस स्थूल देशांतर्गत उत्पादन आणि घटक खर्चास स्थूल देशांतर्गत उत्पादन यातील फरक हा प्रामुख्याने……मुळे निर्माण होतो. (राज्यसेवा मुख्य जाने 2023)

(1) प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर

(2) प्रत्यक्ष कर आणि अनुदाने

(3) अप्रत्यक्ष कर आणि अनुदाने

(4) अनुदाने आणि कर्जे

Answer : 3

Q 6) खालील विधाने विचारात घ्या. (वनसेवा मुख्य ऑक्टोबर, 2022)  

अ. दादाभाई नौरोजींनी सर्वप्रथम राष्ट्रीय उत्पन्नांचा अंदाज मांडला.

ब. हा 1867-68 या वर्षातील राष्ट्रीय उत्पन्नाचा अदाज होता

क. दादाभाई नौरोजी यांनी त्यांच्या ‘पॉवर्टी अँड अन – ब्रिटिंग रुल इन इंडिया’ या पुस्तकात राष्ट्रीय उत्पनाचा अंदाज मांडला आहे.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

(1) अ आणि ब

(2) ब आणि क

(3) अ आणि क

(4) वरील सर्व

Answer : 4

Q 7) देशांतर्गत हरित सकल उत्पादन (Green GDP) संबंधी विचार करता खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

(राज्यसेवा मुख्य, मे 2022)

अ) अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी संसाधनांचा वापर करा.

ब) अर्थव्यवस्थेची वाढ प्रभावीपणे करण्यासाठी संसाधनांचा पर्याप्त, कार्यक्षमतेने आणि परिणामकारक वापर करा.

क) अर्थव्यवस्थेच्या वाढी करीता संसाधनांचे शोषण करा.

ड) अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी संसाधने संपेपर्यंत वापरा.

पर्यायी उत्तरे :

1) विधान अ, ब आणि ड बरोबर आहेत

2) केवळ विधान ब बरोबर आहे

3) विधान अ, क आणि ड बरोबर आहेत

4) केवळ विधान क बरोबर आहे

Answer : 2

Q 8) स्थूल देशांतर्गत उत्पादनाबद्दल खालील दृष्टीकोन आहेत :

(राज्यसेवा मुख्य, मे 2022)

अ) हा उत्पादनाच्या एकूण मूल्याचा प्रवाह.

ब) हा एकूण प्राप्तीचा किंवा उत्पन्नाचा प्रवाह.

क) हा एकूण खर्चाचा प्रवाह.

पर्यायी उत्तरे :

1) अ आणि ब विधाने योग्य आहेत

2) ब आणि क विधाने योग्य आहेत

3) अ आणि क विधाने योग्य आहेत

4) अ, ब आणि क विधाने योग्य आहेत

Answer : 4

Q 9) उत्पादन एककाद्वारे बाजारभावानुसार स्थूल मूल्यवर्धित उत्पन्न मिळवण्यासाठी उत्पादनमूल्यातून खालील गोष्टी/गोष्ट वजा कराव्या लागतील.

(राज्यसेवा मुख्य, मे 2011)

अ) मध्यवर्ती वापराचे मूल्य

ब) गुंतवणूकीचे मूल्य

क) व्यक्तिगत उत्पन्न

1) अ विधान योग्य आहे

2) ब विधान योग्य आहे

3) क विधान योग्य आहे

4) अ, ब आणि क विधाने योग्य आहेत

Answer : 1

Q 10) ‘आर्थिक वृद्धीची’ पुढील संकल्पना कुणी मांडलेली आहे? 10.

(राज्यसेवा मुख्य, मे 2022)

“आर्थिक वृद्धी म्हणजे बचत दर आणि लोकसंख्येत होणाऱ्या वाढीमुळे दीर्घकाळात क्रमाने आणि स्थिरपणाने होणारा बदल وو होय.’

1) श्रीमती उर्सुला हिक्स

2) प्रो. किंडलबर्जर

3) अमर्त्य सेन

4) प्रो. शुम्पीटर

Answer : 4

Q 11) . राष्ट्रीय उत्पन्नाची खाती खालील गोष्टी समजून घेण्यास मदत करतात. (राज्यसेवा मुख्य, मे 2022)

अ) चार्टर्ड अकौंटंटचा व्यवसाय

ब) अर्थव्यवस्थेच्या एकूण प्रदानाची कामगिरी

क) विश्लेषणात्मक प्रारूपाच्या बांधणीसाठीची चौकट.

पर्यायी उत्तरे :

1) अ विधान योग्य आहे

2) अ आणि ब विधाने योग्य आहेत

3) ब आणि क विधाने योग्य आहेत

4) अ, ब आणि क विधाने योग्य आहेत

Answer : 3

Q 12) . खालीलपैकी कोणती संकल्पना “राष्ट्रीय उत्पन्न” या संकल्पनेशी संबंधित आहे ?  (कंबाईन गट ‘क’ पूर्व एप्रिल, 2022)

1) साठा

2) अंशलक्षी

3) प्रवाही

4) वरीलपैकी कोणतेही नाही

Answer : 3

13. खालील विधाने विचारात घ्या. (Combine ‘B’ 2021)

अ. स्वातंत्र्यानंतर, भारत सरकारने ऑगस्ट 1948 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न समितीची नियुक्ती केली.

ब. या समितीमध्ये प्रा. पी. सी. महालनोबिस, प्रा. डी. आर. गाडगीळ आणि प्रा. व्ही. के. आर. व्ही. राव यांचा समावेश होता.

क. राष्ट्रीय उत्पन्न समितीचा पहिला अहवाल 1951 मध्ये आणि अंतिम अहवाल 1954 मध्ये आला.

वर दिलेल्या विधांनापैकी कोणते विधान/कोणती विधाने चूकीची आहे/आहेत ?

पर्यायी उत्तरे :

1) फक्त अ

2) फक्त अ आणि ब

3) फक्त अ आणि क

4) फक्त ब आणि क

Answer : 1

Q 14) निव्वळ राष्ट्रीय उत्पादना संबंधात कोणते/ती विधान/विधाने अयोग्य आहे/आहेत ?

(राज्यसेवा पूर्व 2021)

अ. हे विशिष्ट आर्थिक वर्षात केलेले वस्तू व सेवांचे उत्पादन मूल्य व परदेशातून येणाऱ्या निव्वळ उत्पादन घटकांचे (Factor income) उत्पन्न दाखविते.

ब. ह्याच्यात निर्यात, आयात यांचा समावेश असतो परंतु परदेशातून येणाऱ्या निव्वळ उत्पादन घटकांचे उत्पन्न समाविष्ट नसते.

क. ह्याला ‘निव्वळ’ उत्पन्न म्हणतात कारण यामध्ये सकल राष्ट्रीय वार्षिक उत्पन्नातून भांडवली घसाऱ्याची वजावट केली असते.

पर्यायी उत्तरेः

1) फक्त क

2) फक्त अ

3) फक्त ब

4) अ आणि क

Answer : # (Cancelled by MPSC)

Q 15). उपभोगावर आधारित राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या कोणी मांडली होती ?

(राज्यसेवा मुख्य, 2020)

1) आल्फ्रेड मार्शल

2) ए.सी. पिगू

3) प्रा. फिशर

4) जे.एम. केन्स

Answer : 3

Q 16). बाजार किंमतीनुसार स्थूल देशांतर्गत उत्पादन आणि स्थूल राष्ट्रीय उत्पादन यांमधील फरक हा खालीलपैकी एका घटकामुळे दिसून येतो :

(राज्यसेवा मुख्य, 2020)

1) एकूण वस्तू व सेवांचे उत्पादन.

2) परदेशी उत्पादन घटकांपासून उत्पन्नाचा समावेश.

3) परदेशी नागरिकांनी देशात उत्पादित केलेल्या वस्तू व सेवा.

4) घटक किंमतीनुसार वस्तू व सेवांच्या उत्पन्नाची बेरीज.

Answer : 2

Q 17). राष्ट्रीय उत्पादनाच्या गणनेच्या निव्वळ उत्पादन पध्दतीबाबतीत खालीलपैकी कोणते विधान खरे आहे ?

(राज्यसेवा मुख्य, 2020)

1) राष्ट्रीय उत्पादन हे सर्व घटकांना केलेल्या प्रदानाची बेरीज आहे.

2) राष्ट्रीय उत्पादन हे देशातील संपूर्ण खर्चाची बाजारभावानुसार केलेली बेरीज आहे.

3) राष्ट्रीय उत्पादन हे भाडे, वेतन, व्याज आणि नफा यांच्या बेरजेतून भांडवल घसारा वजा केल्यावर मिळणारी रक्कम आहे.

4) राष्ट्रीय उत्पादन हे देशातील सर्व क्षेत्रांतील उत्पादनाच्या बाजारभावातील किंमतीनुसार मोजले जाते.

Answer : #

Q 18). राष्ट्रीय उत्पन्नाच्या मापनातील कोणत्या दोन मुख्य अडचणी आहेत ?

(राज्यसेवा मुख्य, 2020)

1) सूक्ष्म व स्थूल

2) संकल्पनात्मक व सांख्यिकीय

३) लवचिक व कठीण

4) वरीलपैकी कोणतेही नाही

Answer : 2

Q 19) . खालीलपैकी कोणते विधान /विधाने अयोग्य आहे/आहेत ?

(राज्यसेवा पूर्व, 2020)

अ. विशिष्ट कालावधीत देशाच्या नागरिकांनी उत्पादित केलेल्या वस्तू व सेवांचे एकूण पैशातील मूल्य म्हणजे स्थूल राष्ट्रीय उत्पादन (GNP) होय.

ब. उत्पन्नाचा असा भाग जो देशात उत्पादित होतो, परंतु परदेशी नागरिकांना प्राप्त होतो. त्याचा समावेश स्थूल राष्ट्रीय उत्पादनात (GNP) केला जातो.

क. प्रति माणसी उत्पन्न हे देशातील लोकांचे सीमांत उत्पन्न दर्शविते.

पर्यायी उत्तरे :

1) अ आणि ब

2) अ आणि क

3) ब आणि क

4) वरील तीनही विधाने बरोबर आहेत

Answer : 3

Q 20) . खालीलपैकी कोणती संज्ञा अशा वक्राचे वर्णन करते की, जो वक्र दोन प्रकाराच्या वस्तुंची अशी मिसळण (combination) दर्शवतो की ज्यामध्ये त्यावेळी उपलब्ध असलेल्या सर्व उत्पादन घटकांचा संपूर्ण कार्यक्षमतेने वापर केला जातो :

(वनसेवा मुख्य 2019)

1) समतृष्टी वन

2) उत्पादन शक्यता वक्र

3) समपरिमाण वक्र

4) लॉरेंझ वक्र

Answer : 2

Q 21). विकासाच्या अर्थशास्त्रात करणाऱ्या वक्राला उत्पन्नाच्या असमानतेचे विश्लेषण असे संबोधले जाते.

(वनसेवा मुख्य 2019)

1) लॉरेंझ वक्र

2) कुझनेटस् वक्र

3) समग्र पुरवठा वक्र

4) फिलिप्स वक्र

Answer : 1

Q 22)  सार्वभौमिक मूलभूत उत्पन्नाची भारतासाठीची संकल्पना खालीलपैकी कोणत्या अर्थतज्ञाने प्रथम मांडली ?

वनसेवा मुख्य 2019)

1) पी.आर. ब्रह्मानंद

2) ए.के. सेन

3) प्रणब बर्धन

4) जगदीश भगवती

Answer : 3

Q 23) . केंद्रीय सांख्यिकीय संघटनेनुसार सेवाक्षेत्राच्या वर्गीकरणात खालीलपैकी कोणत्या क्षेत्राचा समावेश होत नाही ?

(राज्यसेवा मुख्य-2019)

(1) व्यापार, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट

(2) वाहतूक, साठवणूक आणि दळणवळण

(3) गृहनिर्माण आणि वित्तपुरवठा

(4) वरीलपैकी काहीही नाही

Answer : 4

Q 24) . राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजणीची खालीलपैकी कोणती पद्धत अर्थव्यवस्थेतील विविध क्षेत्रांचे तुलनात्मक महत्त्व प्रकट करते ?

(राज्यसेवा मुख्य-2019)

1)उत्पादन पद्धत

2) उत्पन्न पद्धत

3) व्यय पद्धत

4) वरीलपैकी कोणतीही नाही

Answer : 1

Q 25). हरित राष्ट्रीय उत्पन्नाचे (GNI) मापनाशी पुढीलपैकी कोणते घटक संबंधित आहेत?

(राज्यसेवा पूर्व – 2018)

ब. नैसर्गिक संसाधनांमध्ये घट

अ. राष्ट्रीय उत्पन्न

क. पर्यावरणीय ऱ्हास

पर्यायी उत्तरे :

(1) फक्त अ आणि क

(2) फक्त अ

(3) फक्त अ आणि ब

(4) वरील सर्व

Answer : 4

More questions soon. Thanks for visiting.

Leave a Comment