तलाठी भरती २०२३ पुन्हा रेस्पॉन्स शिट बदलून आल्या | येथे वाचा सविस्तर

तलाठी २०२३: संपूर्ण महाराष्ट्र मध्ये विविध परीक्षा केंद्रवरती तलाठी भरतीच्या परीक्षा घेण्यात आल्या. तलाठी भरती विषयी महत्त्वाची अपडेट इथे तुम्हाला मिळेल. तलाठी भरतीच्या परीक्षा वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये घेण्यात आल्या होत्या. त्यामुळे परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये खूप मोठी तफावत निर्माण होते. यासाठी नॉर्मलायझेशन पद्धतीचा वापर केला जातो. त्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्यावर अन्याय होत नाही आणि सर्वांना गुणदान व्यवस्थित होते.

तलाठी भरती निकालाची टप्पे

तलाठी भरती ही परीक्षा ऑनलाइन स्वरूपामध्ये टीसीएस द्वारा घेण्यात आली होती आणि त्याचे काही महत्त्वाचे टप्पे असतात ते खालील प्रमाणे

  • प्रथम उत्तर पत्रिका जाहीर करणे (रिस्पॉन्स शीट)
  • प्रथम उत्तर तालिकेमधील चुका दुरुस्त करून अंतिम उत्तर तालिका प्रसिद्ध करणे.
  • यानंतर स्कोर लिस्ट जाहीर करणे.
  • यानंतर सामान्य मिरीट लिस्ट जाहीर करणे.
    अंतिम निवड यादी प्रसिद्ध करणे

तलाठी भरती 2023 निकालाबाबत सद्यस्थिती

तलाठी भरती 2023 च्या परीक्षांच्या रिस्पॉन्स शीट मिळालेल्या होत्या त्यावर उमेदवारांनी घेतलेल्या आक्षेपांना अनुसरून अंतिम रिस्पॉन्स शीट जाहीर करण्यात आल्या. परंतु त्यामध्ये देखील त्रुटी आढळून आल्यामुळे आता टीसीएस ने पुन्हा त्यामध्ये थोडाफार बदल करून पुन्हा अंतिम रिस्पॉन्सिड जाहीर केलेले आहेत. त्यामुळे मुलांच्या गुणांमध्ये दोन ते चार मार्कांची तफावत निर्माण होणार आहे. याचे कारण असे की टीसीएस द्वारा काही बरोबर प्रश्नांची उत्तरे बदलण्यात येऊन चुकीची दिल्या गेली. आणि काही प्रश्न रद्द करण्यात आले. परंतु आता या सर्व समस्यांचे निराकरण करत तलाठी भरतीच्या रिस्पॉन्सिट अंतिम जाहीर केलेल्या आहेत.

तलाठी भरती रिस्पॉन्स शीट 2023 कशा बघाव्या

तलाठी भरती अंतिम रिस्पॉन्स शीट बघण्यासाठी पुढील पद्धतीचा वापर करा.
खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
त्यानंतर आपल्या तलाठीचे लॉगिन डिटेल वापरून लॉगिन करा.
लॉगिन केल्यानंतर उजव्या बाजूला वर तीन डॉट वर क्लिक करा.
त्यानंतर खाली कॅंडिडेट रिस्पॉन्स नावाचा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा.
तिथे गेल्यानंतर क्लिक हेअर वर क्लिक करा आणि तुमची रिस्पॉन्स शीट डाउनलोड होईल.

https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/login.html

Leave a Comment