नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारा राज्यसेवा पूर्व 2021 परीक्षेसाठी ची जाहिरात निघालेली आहे. 05 ऑक्टोबर 2021 ला आयोगाने ही जाहिरात आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेली आहे. मागील काही वर्षांच्या तुलनेत यावर्षी जाहिराती जास्त संख्येने आहेत. एमपीएससी राज्यसेवा 2020 साठी ची मुख्य परीक्षा अजून पार पडलेली नाही. गेल्या दोन वर्षांमध्ये एमपीसी ची बरीच पदे रिक्त होती त्याची मागणी पत्र आयोगाला मिळाले.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021, 2 जानेवारी 2020 ला प्रस्तावित आहे आणि मुख्य परीक्षा दिनांक 7, 8 व 9 मे 2022 रोजी आयोजित करण्यात येईल. 6 ऑक्टोबर पासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. लवकरात लवकर अर्ज करून घ्या.
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. पूर्व परीक्षा दिनांक 2 जानेवारी, 2022 रोजी व मुख्य परीक्षा दिनांक 7, 8 व 9 मे, 2022 रोजी आयोजित करण्यात येईल. https://t.co/XnX063nev0
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) October 4, 2021
एमपीएससी 2021 साठी अर्ज कसा करावा?
- प्रथमता www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर जा.
- खाते तयार केले नसेल तर नवीन खाते तयार करा आणि अगोदरच खाते असेल तर लॉगिन करा.
- त्यानंतर दिलेल्या पाच पायऱ्या [steps] पूर्ण करून प्रोफाईल लॉक करा.
- राज्यसेवेच्या जाहिराती शेजारील या पदासाठी पात्र आहात का यावर क्लिक करुन बघा.
- आणि apply वर क्लिक करा.
जाहिरात क्रमांक 106/2021 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 च्या पदसंख्येमधील वाढीसंदर्भातील शुद्धिपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. pic.twitter.com/uFjOjorZLl
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) October 8, 2021
एमपीएससी राज्यसेवा २०२१ ची जाहिरात बघा
आज दिनांक आठ ऑक्टोबर 2021 रोजी यामध्ये नवीन १०० पदे ॲड करण्यात आलेली आहे.
मित्रांनो काही अडचण असल्यास खाली कमेंट करू शकता. धन्यवाद !