2 जानेवारी 2022 च्या राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ची तयारी कशी करावी | Proper Planning for MPSC state service prelims 2021


मित्रांनो
, नुकतीच एमपीएससी राज्यसेवा परीक्षा 2021 साठी ची जाहिरात आलेली आहे. तुमच्यापैकी बऱ्याच उमेदवारांनी आता अभ्यासाला
गती दिलेली असेल. तुमच्या याच गतीला थोडी बूस्ट करण्यासाठी ही पोस्ट लिहीत आहे .
मित्रांनो तुमच्याजवळ सर्व काही उपलब्ध आहे राज्यसेवा अभ्यासक्रम
2021 आहे, राज्यसेवा मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका [2010-2020]
आहेत. पण तुम्हाला एक प्रश्न नक्की पडला असेल की या 80
दिवसामध्ये आपला एमपीएससी राज्यसेवा अभ्यास कसा होणार? एमपीएससी राज्यसेवा च्या
अभ्यासाचे नियोजन कसे करावे. या
3 महिन्यांमद्धे 
अभ्याससोबतच रिवीजन कशी करावी ?
 या
सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या पोस्ट च्या माध्यमातून मिळतील.
 

तुम्हाला राज्यसेवा अभ्यासक्रम , राज्यसेवा पुस्तके कोणती वाचायची हे माहीत असेल , असे मी गृहीत धरत आहे. 

मूलतः पेपर 1 मध्ये खालील विषय असणार आहेत

·       
चालू घडामोडी 

·       
इतिहास 

·       
भूगोल 

·       
भारतीय संविधान आणि
राज्यव्यवस्था
 

·       
अर्थशास्त्र 

·       
सामान्य विज्ञान 

 

2
जानेवारी 2022 च्या राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021
ची तयारी कशी करावी | Proper Planning for MPSC state
service prelims 2021

·       
अभ्यासक्रम बघा :
एमपीएससी आयोगाच्या दोनच अश्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहीत आहेत
, एक म्हणजे अभ्यासक्रम आणि दुसरे प्रश्नपत्रिका. अगदी काहीही वाचत बसू नका,
अभ्यासक्रम बघा आणि मग नेमक काय वाचावं लागेल हे तुम्हाला कळेल
म्हणून राज्यसेवा पूर्व परीक्षा
2021 चा अभ्यासक्रम नक्की
बघा. राज्यसेवा पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम मर्यादित आहे
, विस्तृत
दिलेला नाही.त्यामुळे दिलेल्या टॉपिक शी
related महत्वाची
माहिती वाचा.

 

·       
प्रश्नपत्रिका बघा :
मागील वर्षीच्या MPSC state service QUESTION papers प्रश्नपत्रिका हा आयोगाचा आरसा आहेत. त्या आरश्यांचा चांगला उपयोग
घ्या
, जवळपास किमान २०१५ पासूनाच्या तरी सर्व
प्रश्नपत्रिका प्रिंट करून सतत वाचा.राज्यसेवा पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका२०१५-२०२० प्रश्न कशे विचारले जातात यावर लक्ष द्या.यामुळे तुम्हाला कोणता घटक कसा
हाताळायचा हे कळेल.
 

 

·       
विश्लेषण करा : फक्त
प्रश्नपत्रिका बघून काही होणार नाही
, त्यांचे विश्लेषण
करावे लागेल.विश्लेषण साठी योग्य वेळ द्या. विश्लेषण म्हणजे प्रश्न किती खोलवर
विचारतात आणि प्रश्नांचा पॅटर्न लक्षात घ्या. अभ्यास करतांना तुम्ही जो टॉपिक
वाचला त्यावरील प्रश्न सोडवा. यासाठी तुम्ही लोकसेवा पब्लिकेशन चा २१००० प्रश्नसंच
हे पुस्तक वापरू शकतात.

 

·       
नियोजन करा : plan or
perish या वृत्ती प्रमाणे काम करा. जो प्लॅन करून अभ्यास करेल तोच
तारणार. नियोजन म्हणजे या काळात कोणत्या विषयाला किती वेळ द्यावा हे ठरवा
, रोजचे schedule बनवा , एका
हफ्त्याचे
schedule करा. अश्याप्रकरे महिन्याभरात अभ्यासाचे schedule
बनवा. नियोजन अगदीच खूप मोठ्ठं करू नका, पण
शक्य असेल तेवढे जास्त तास अभ्यासाला द्या. हळू हळू त्यामध्ये वाढ करा.
 

 

·       
अंमलबजावणी करा :
फक्त प्लॅन करून चालणार नाही
, त्याला तुम्ही follow केला पाहिजे. खूप मोठे असे प्लॅन्स बनवले तर ते collaps होतात. आणि मग आपल्याला निराशा येते की मी हे काम पूर्ण देखील करू शकला
नाही. म्हणून सुरुवातीला
6 च तास रोज अभ्यास करा, एकदा सवय लागली की आपोआप तुम्ही तास न मोजता अभ्यास कराल. लक्षात असू द्या
आपल्याला अभ्यास पूर्ण करायचा आहे तास संपवायचे नाहीत.
 

 

·       
सराव महत्वाचा :
आपली
progress कशी आहे हे आजमावण्यासाठी तुम्ही सराव केलाच
पाहिजे. ‘
Practice makes man perfect’ याप्रमाणे काम करा.
एमपीएससी आयोगाचे तसेच वेगवेगळ्या
class चे जे काही पेपर जेवढे
मिळतील तिथून घ्या आणि सोडवायला सुरुवात करा.कारण वेळ कमी आहे
, csat चा अभ्यास कमी आणि सराव जास्त करा. Csat तुम्हाला
पूर्व परीक्षा पास करून देऊ शकतो म्हणून रोज
3 ते 5 या वेळेत पेपर सोडवा. एक दिवसाआड देखील सोडवला तरी चालेल. पण किमान 30
पेपर सोडवा. आणि गणित बुध्दीमत्ता साठी कोणतेही एकाच पुस्तक वापरा. passages
वर भर द्या.

 

एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२१-२०२२ साठी नियोजन कसे कराल

प्रथमतः MPSC booklist ठरवून घ्या. त्यानुसार प्रत्येक दिवशी GS चे 2 विषय घ्या. आणि CSAT ला आवश्यकतेप्रमाणे 2..3 तास द्या. आजपासून तुमच्याकडे
75 days आहेत , त्यांचा पुरेपूर वापर
करा. थोडी रूपरेषा सांगतो.

येत्या 15 ते 20 दिवसांमध्ये जे काही
नवीन वाचायचं असेल ते वाचा. जास्तच
sources वापरून सर्वच
वाचत बसू नका. मोजकेच वाचा. आणि त्यापुढील
30 दिवसांमध्ये revision
आणि सराव चालू करा. आणि उरलेल्या पुढील दिवसांमध्ये फक्त सरावावर भर
द्या. उत्तरे शोधण्याचे व काढण्याचे तंत्र विकसित करा. आणि ते सरवरूनाच होणार आहे.

मी सांगितलेल्या गोष्टी पटत असतील तरच follow करा अन्यथा तुम्हाला आवडेल ते आवडेल त्या वेळेस वाचू शकता.

Mpsc
राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२१ साठी प्रत्येक दिवसाचे नियोजन खालील
प्रकारे करू शकतात.

1) 
सकाळी 7 ला अभ्यासाला
बसा.
Library मध्ये किंवा रूम मध्ये किंवा घरी जिथे असाल
तिथे.

2) 
7 ते 9:30 हा सकाळचा एक महत्वाचा
स्लॉट पूर्ण करा. यामध्ये तुम्ही कोणताही
1 GS चा विषय घेऊ
शकतात. महत्वाचा व स्कोरिंग असणारा विषय शक्यतो निवडावा. (
Polity,
economics, science)

3) 
9:30 ते 10 मस्त नाश्त्यासाठी एक
ब्रेक घ्या.

4) 
पुन्हा 10 ते 11 वाचलेल्या टॉपिक वर आधारित MCQ ( Multiple Choice Questions ) सोडवा.

5) 
11 ते 12 या वेळेमध्ये GS च्या एखाद्या विषयाची रिविजन करा.

6) 
12 ते 2/3 या वेळेमध्ये जेवण आणि
थोडा
rest करा. या काळात अभ्यास करण्याचा निरर्थक प्रयत्न
करू नका. (ज्यांना जमेल त्यांनी केला तरी हरकत नाही)

7) 
3 ते 5 या वेळेमध्ये csat
चा पेपर सोडवा.

8) 
5 ते 6 आपले गुण बघून, कोणत्या विषयांमध्ये आपल्याला आणखी अभ्यासाची गरज आहे हे ओळखा. काही
जणांना उतारे चांगली जमलं तर काहींना गणित आणि बुद्धिमत्ता चांगलं जमतं. म्हणून
आपल्या कम्फर्ट झोन ओळखून त्यावर मेहनत घ्या आणि जास्तीत जास्त गुण मिळवा.

9) 
सहा नंतर पुन्हा तुम्ही 2 तास GS चा विषय अभ्यासू शकता. आठ ते दहा या वेळेमध्ये तुम्हाला इतर
महत्वाचं करायचं असेल किंवा आपले आवडीचे पुस्तक वाचायचे असतील तर ते वाचू शकतात.

10) 
मित्रांनो कमी तास अभ्यास करा परंतु
जेवढे तास तुम्ही अभ्यास करणार आहात त्यामध्ये तुमची
100% ओतून द्या.

आपल्याला खूप मुलांसोबत स्पर्धा करायची आहे. नकारात्मक गोष्टींपासून
दूर रहा. आपला अभ्यास चालूच ठेवा. धन्यवाद !

काही अडचण असल्यास कमेंट सेक्शन आहे खाली तिथे विचारू शकता.

Join
telegram: https://t.me/mpscpoint755

Leave a Comment