Padmakar Gaikwad Success Story-
असे म्हणतात की, जीवनातील शालेय वर्ष संपल्यानंतर आपले अभ्यासात मन लागत नाही आणि त्या काळानंतर आपण काहीही करू शकत नाही. परंतु या म्हटल्या जाणाऱ्या गोष्टी सर्वांच्याच बाबतीत समान असतील असं नाही. बऱ्याच बाह्य घटकांमुळे काही जणांना शालेय शिक्षणामध्ये एमपीएससीची तयारी करता येत नाही. परंतु मनामध्ये तीव्र इच्छा असेल तर एमपीएससी आपण कोणत्याही वयामध्ये व कितीही वर्षांचा गॅप असला तरी पास करू शकतो, हे आपल्याला पद्माकर गायकवाड सरांकडून शिकायला मिळते.
पद्माकर गायकवाड सर यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा या परीक्षेतून महाराष्ट्रातून १० वे येऊन उपजिल्हाधिकारी हे गट-अ चे पद मिळवलेले आहे. मित्रांनो, या लेखामध्ये आपण पद्माकर गायकवाड सरांचा खूप मोठा प्रवास अगदी कमी शब्दात मांडणार आहोत. (Deputy collector, MPSC state service 2019)
प्रत्येक वर्षी महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (Maharashtra Public Service Commission) विविध परीक्षा देतात. एकूण जागांच्या तुलनेत विद्यार्थ्यांची संख्या खूपच जास्त असते, म्हणूनच या परीक्षांमध्ये प्रचंड मेहनत लागत असते. आपण जरी प्रचंड मध्ये मेहनत घेतली तरी जर आपल्या पेक्षा कुणीही थोडी जास्त मेहनत घेतली तर त्याला/तिला ते पद मिळणार असते. अशा गळेकापू स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी विद्यार्थी धडपडत असतात. लोकांची वर्षानुवर्षे या परीक्षेतून पद मिळवण्यासाठी निघून जातात. म्हणून या परीक्षेतून एखादी पोस्ट मिळवणे म्हणजेच मृगजळच.
पद्माकर सर यांचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील बोरसर खुर्द या गावी झाला. त्यांचे प्राथमिक माध्यमिक आणि बारावीपर्यंतचे शिक्षण कन्नड तालुक्याच्या ठिकाणी झाले. त्यांनी दहावी मराठी मिडीयम मधून पूर्ण केलेली आहे. पद्माकर सर यांचे आई-वडील सध्या शेती करतात. लहान भावाचे Footware चे दुकान आहे. शेती करण्याआधी त्यांचे वडील कन्नड सहकारी साखर कारखान्यामध्ये कामाला होते. परंतु ज्याप्रमाणे इतर साखर कारखाने बंद पडतात त्याप्रमाणे तो देखील कारखाना बंद पडला. या गोष्टीला 15 ते 16 वर्ष पूर्ण झालेली आहेत. तेव्हा वडिलांचा जॉब गेल्यामुळे वडिलांनी कुटुंब चालवण्यासाठी एका कापड दुकानात काम केले आणि त्यांच्या आईने शिवणकाम शिकून ते काम सुरू केले. पद्माकर सर म्हणतात- ” कारखाना बंद पडल्यामुळे वडिलांची नोकरी जाणार आणि आई वडिलांचे कष्ट हेच माझ्यासाठी या परीक्षेच्या प्रोसेस मधील सर्वात मोटीव्हेट (Motivate) करणारी गोष्ट होती. वडिलांचा तोच स्ट्रगल बघून मला अभ्यास करण्यासाठी मोटिवेशन मिळाली आणि मी तास-न-तास अभ्यास केला. “
त्यांच्या भागातील ज्या व्यक्ती अधिकारी बनल्या आहेत त्यांची पार्श्वभूमी देखील अशाच स्वरूपाची होती, त्यामुळे त्यांनी देखील अगदी जिद्दीने आणि कष्टाने मेहनत घेऊन हे मृगजळ मिळवले. या परिस्थितीविषयी बोलताना शिवाजी महाराजांनी सांगितलेला धडा त्यांना आठवतो – “परिस्थिती कितीही बिकट असली तरी त्यातून मार्ग नक्की निघतो.”
कौटुंबिक पार्श्वभूमी बघून, त्यांनी 12 वी नंतर डिप्लोमा करून एखाद्या कंपनीमध्ये जॉब करण्याचे ठरविले आणि स्पर्धा परीक्षांचे स्वप्न अगोदरपासूनच त्यांच्या मनामध्ये होते. परंतु कौटुंबिक परिस्थिती पाहता त्यावेळेस ते शक्य नसल्यामुळे त्यांनी कंपनी मध्ये जॉब करायला सुरुवात केली. 2010 ला भारत सरकारच्या Indo German Tool Room, Aurangabad येथे त्यांनी डिप्लोमा पूर्ण केला. आणि 2011 मध्ये त्यांनी कंपनी मध्ये (KSB Teck Pvt Ltd) जॉब सुरू केला. परंतु ते म्हणतात ना- “स्वप्न स्वस्थ बसू देत नाही.” त्यामुळेच त्यांनी 2011 साली सर्व स्पर्धा परीक्षांसाठी लागणारी एक बेसिक शैक्षणिक पात्रता म्हणजे पदवीचे शिक्षण यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ मधून पूर्ण केले. त्यांनी इतिहास या विषयांमध्ये बीए केले. ही पदवी त्यांनी 2014 मध्ये पूर्ण केली. सुरुवातीला त्यांनी यूपीएससी ची तयारी केली आणि 2015 ची आणि 2016 ची मुख्य परीक्षा दिली. नोकरी मुळे वेळ कमी असायचा म्हणून यांनी MPSC कडे त्यांचा अभ्यास वळवला. त्यांनी एमपीएससीच्या परीक्षा देण्यास सुरुवात केली. 2015 ते 2018 या कालावधीमध्ये परीक्षा आणि सोबतच जॉब असं मेन्टेन करायचं चालू होते.
2017 मध्ये त्यांचं लग्न झालं. त्यांच्या पत्नी देखील जॉब ला होत्या आणि यामुळेच पत्नीला विश्वासात घेऊन त्यांनी जॉब सोडण्याचा निर्णय घेतला.
” नोकरी सोडली नसती तर आयोगाच्या निवड यादीत येण्याचा योग आला नसता “- असे सर म्हणतात.
29 व्या वर्षी सर्वजण सेटल झालेले असतात आणि यामध्ये त्यांनी सर्वकाही अनसेटल करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय अगदी सहज घेतलेला नव्हता, तर सर्व बाबींचा विचार करून आणि मागील तीन वर्षाचा अनुभव सोबत असताना हा निर्णय घेण्यात आला होता. हे एक कॅलक्युलेटेड रिस्क होते.
जे काही करायचं ते पुढील दोन वर्षात करायचा असं त्यांनी ठरवलं. आणि अगदी मनापासून तयारी सुरू केली. त्यामुळेच त्यांनी लग्न, बर्थडे, मित्र, नातेवाईक, बाहेर फिरणे यांच्या पासून संबंध हा दूरच ठेवला. जास्तीत जास्त वेळेचा उपयोग कसा करता येईल यावर त्यांनी भर दिला आणि येणाऱ्या दोन वर्षाचे सर्व प्लॅनिंग त्यांनी केली. महत्त्वाच्या नसणाऱ्या गोष्टींना त्यांनी टाळले आणि तो वेळ अभ्यासामध्ये घालवला. सरांची पत्नी पुण्यामध्येच जॉब ला असल्यामुळे त्यांनी तिथेच लायब्ररी – अभ्यासिका जॉईन करून अभ्यास सुरू केला.
2018 ला त्यांची 2 मार्क ने मुलाखत हुकली, कारण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी अभ्यास थोडा लेट सुरू केला होता.
सर सांगतात, जेव्हा तुम्ही 21व्या 22व्या वर्षी एमपीएससी च्या तयारीला लागतात तेव्हा तुमच्याकडे निश्चितच वेळ असतो परंतु जेव्हा तुम्ही अगदीच 28, 29 या वर्षामध्ये तयारीला लागतात त्या वेळेस तुमच्याकडे वेळ कमी असतो आणि सर्वजण सेटल होण्यासाठी तयारी करत असतात आणि त्यातच तुम्हाला जर ही गोष्ट करायची असेल तर अगदीच सर्व गोष्टींचा विचार करून तुम्ही या क्षेत्रामध्ये उतारा. माझ्यासाठी ही गोष्ट योग्य ठरली परंतु तुमच्यासाठी योग्य ठरेलच असे नाही.
प्रयत्न करत रहा, एक दिवस नक्कीच तुमचा असेल.
Related Links
Padmakar Gaikwad Marksheet
Padmakar Gaikwad Booklist
prelims
mains