समानार्थी शब्द मराठी ‘क’ ने सुरू होणारे : मराठीमध्ये एकाच शब्दाचे अनेक समानार्थी शब्द असतात. आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये समानार्थी शब्द खूप महत्त्वाचे आहे. म्हणूनच खाली मी काही समानार्थी शब्द मराठी मध्ये दिलेले आहेत. मराठी व्याकरण अभ्यासताना समानार्थी शब्द अभ्यासणे अतिशय गरजेचे आहे.त्यामुळे तुम्ही ते वाचू शकतात आणि तुमचा शब्दसाठा वाढवू शकता. मराठीमध्ये खूप साऱ्या शब्दांचे अनेक समानार्थी शब्द असतात.
समानार्थी शब्द मराठी म्हणजे काय
जर तुम्हाला समानार्थी शब्द म्हणजे काय हे जाणून घ्यायचे असेल तर त्यासाठी समानार्थी या शब्दाचा अर्थ माहित असावा लागेल. समानार्थी = समान अर्थ असणारे. म्हणजेच एकाच शब्दाचा समान अर्थ असणारा दुसरा शब्द असू शकतो किंवा दोन पेक्षा जास्त शब्द असू शकतात अशा शब्दांना आपण समानर्थी म्हणजेच समानार्थी शब्द असे म्हणतो. समान आहे अर्थ ज्याचा असे शब्द किंवा शब्दसमूह.
समानार्थी शब्द मराठी ‘क’ ने सुरू होणारे
खाली तुम्हाला मराठी बाराखडीतील क ने सुरु होणारे काही शब्द दिलेले आहेत व त्यांचे समानार्थी शब्द दिलेले आहेत प्रत्येक शब्दाला एक किंवा एकापेक्षा जास्त समानार्थी शब्द दिलेले आहेत. तुम्ही जर कोणत्याही शब्दाचा समानार्थी शब्द शोधत असाल तर या पोस्टच्या खाली मी सर्व समानार्थी शब्दांच्या लिंक्स दिलेले आहेत तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. बऱ्याचदा स्पर्धा परीक्षांमध्ये आपल्याला समानार्थी शब्द यावर प्रश्न दिसतात. खाली 50 पेक्षा जास्त “क” या अक्षराने सुरु होणारे शब्द व त्याचे समानार्थी शब्द दिलेले आहेत.
शब्द | समानार्थी शब्द |
---|---|
कंदुक | चेंडू |
कर्कश | कर्णकठोर , बोचणारे |
कच | माघार , अडचण , केस , ब्रह्म देवाचा पुत्र |
कच्चा | अपरिपक्व , अपूर्ण |
कमळ | राजीव,अंबुज , पंकज , सरोज , पद्म , उत्पल , अब्ज , कुमुद , अरविंद , नलिनी , सरसिज |
कज्जा | खटला , भांडण , लढाई , तुरा |
कट | संगनमत , कष्ट , गुप्त , मसलत |
कठोर | निर्दयी |
कुक्षी | पोट , पोटाची खळगी , म्यान , गर्भाशय |
कडक | टणक , महाग , शिस्तप्रिय , कठोर , तापट , जहाल , तेजस्वी , वाळलेले , सणसणीत , तिखट , तीक्ष्ण , कर्कश , दणकट |
कढ | उष्णतेमुळे फुटणारी उकळी , फेस , उमाळा , गहिवर , हुंदके |
कठीण | अवघड , बिकट , कडक |
कणव | दया , करुणा , |
कर्ण | कान , कुणतीपुत्र , उदार |
कर्तुत्व | पराक्रमी |
कर्दनकाळ | क्रूर , निर्दयी भयंकर |
कनक | सोने , कांचन, सुवर्ण , हिरण्य , हेम , धोतरा |
कपट | दुष्टावा , खोटेपणा , डाव , कट , डावपेच |
कपडा | वस्त्र , प्रवरण , वसन , पट , अंबर ,चीर |
कपर्दिका | कवळी |
कृपण | कंजूष , चिक्कू , कवडीचुंबक |
कपाळ | भाल , ललाट , निखिल , निढळ |
कबूल | संमत , मान्य , पसंत , मंजूर |
क्रम | अनुक्रम , रांग , ओळ |
कृमि | जंतु |
कन्या | मुलगी , पुत्रि , सुता , तनया , तनुजा , कन्यका , आत्मजा |
कर | हाथ , सारा , जकात, ग्रहण , संक्रांत , |
कर्म | प्रारब्ध , योगायोग , दैव व नशीब यांच्यामुळे घडणारे |
कर्मविपाक | कर्म फळ |
कल्याण | हित, कुशल , क्षेम |
करणी | चेटूक , कृती , कृत्य , क्रिया , गवंडी कामाचे एक साधन |
करपल्लवी | हातांच्या खुणांची भाषा |
करार | वचन , ठराव , कबुली |
कलगी | लावणी प्रकार , पागोट्या वरील रत्नजळीत |
कलश | तांब्या , भांडे , गडवा |
कष्ट | शारीरिक श्रम |
कस | धातूची परीक्षा |
कळ | पोटात होणारी व्यथा , यंत्र , भांडण , युक्ति |
काजळी | अंधारी , काळेपणा येणे |
इतर शब्दांनी सुरू होणारे समानार्थी शब्द (१००० + शब्द )
- क ने सुरु होणारे समानार्थी शब्द
- ख ने सुरु होणारे समानार्थी शब्द
- ग ने सुरु होणारे समानार्थी शब्द
- घ ने सुरु होणारे समानार्थी शब्द
- च ने सुरु होणारे समानार्थी शब्द
- छ ने सुरु होणारे समानार्थी शब्द
- ज ने सुरु होणारे समानार्थी शब्द
- झ ने सुरु होणारे समानार्थी शब्द
- ट ने सुरु होणारे समानार्थी शब्द
- ठ ने सुरु होणारे समानार्थी शब्द
- ड ने सुरु होणारे समानार्थी शब्द
- ढ् ने सुरु होणारे समानार्थी शब्द
- ण ने सुरु होणारे समानार्थी शब्द
- त ने सुरु होणारे समानार्थी शब्द
- थ ने सुरु होणारे समानार्थी शब्द
- द ने सुरु होणारे समानार्थी शब्द
- ध ने सुरु होणारे समानार्थी शब्द
- न ने सुरु होणारे समानार्थी शब्द
- प ने सुरु होणारे समानार्थी शब्द
- फ ने सुरु होणारे समानार्थी शब्द
- ब ने सुरु होणारे समानार्थी शब्द
- भ ने सुरु होणारे समानार्थी शब्द
- म ने सुरु होणारे समानार्थी शब्द
1 thought on “समानार्थी शब्द मराठी ‘क’ ने सुरू होणारे | Marathi Synonym १००० +”