रिस्क घेऊन नोकरी सोडली – आज उपजिल्हाधिकारी | Prasad Chaugule MPSC success story

प्रसाद सरांनी 2019 च्या MPSC च्या राज्यसेवा(state service) परीक्षेमद्धे प्रथम येऊन उपजिल्हाधिकारी(Deputy collector) हे पद मिळवले. त्यांनी हे यश कसे मिळवले.? हेच आपण या पोस्ट मध्ये बघणार आहोत. (Prasad Chaugule sir MPSC success story. MPSC topper 2019 prasad chaugule)


प्रसाद चौगुले हे सातारा जिल्ह्यातील कराड येथील रहिवासी आहेत. त्यांचे 5वी पर्यंतचे शिक्षण हे कराड येथे झाले. त्यानंतर 6 वी पासूनचे पुढचे शिक्षण ‘जवाहर नवोदय विद्यालय’ येथे झाले. ही एक निवासी शाळा होती. प्रसाद एकुलते एक असल्यामुळे त्यांना इतर्  खाजगी शाळेमध्ये  टाका, असा नतेवाईकांचा आग्रह होता. परंतु प्रसादच्या आई-वडिलांना त्यांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून स्वतः पासून दूर करून नवोदय विद्यालयात प्रवेश करून दिला. त्यामुळेच त्यांना संघर्ष किंवा Struggle म्हणजे नेमका काय हे अगदी कमी वयात कळाले. ती शाळा ही CBSC होती आणि त्यातील शिक्षक हे देखील खूप चांगले होते, यामुळे त्यांना अभ्यासात गोडी निर्माण झाली. पुस्तक वाचण्याची आवड निर्माण झाली. प्रसाद च्या वडिलांचा आयटीआय झालेला आहे आणि आई 7वी शिकलेली आहे. त्यांना दोन इंजिनिअरिंग झालेल्या  मोठ्या बहिणी आहेत. 


दहावी झाल्यानंतर त्यांनी पुन्हा 11 वी आणि 12 वी साठी विज्ञान शाखेला प्रवेश घेतला आणि सी ई टी(CET) चा अभ्यास केला. CET मध्ये चांगले गुण असल्यामुळे 2013 ला इंजिनियरिंगला मेकॅनिकल ब्रँच ला ऍडमिशन मिळाले. त्यांचे इंजीनियरिंग कॉलेज कराड मधीलच होते. प्रसाद सर त्यांच्या कॉलेजच्या सर्व वर्षांमध्ये टॉपर होते. कॉलेजमध्ये त्यांच्या मनामध्ये स्पर्धा परीक्षा करावे असे काहीही नव्हते. कॉलेजमध्ये असताना एका नामांकित कंपनीत त्यांची निवड झाली. आपल्याला स्टॅबिलिटी मिळत आहे म्हणून त्यांना आनंद होता तसेच त्यांच्या घरच्यांनाही आनंद होता. म्हणून त्यांनी ती नोकरी जॉइन केली.

ट्रेनिंग पिरियड संपल्यानंतर जेव्हा जॉब सुरू झाला, तेव्हा मात्र त्यांना कुठेतरी असं वाटू लागलं की, आपण यापेक्षा काहीतरी वेगळं करायला हवं. त्यांना दररोज 3 तास प्रवास करून कंपनीमध्ये जॉब करावा लागत होता. कंपनीत असताना ते बर्‍याचदा त्यांच्या मित्रांचा रुमवर जायचे. त्यांचे बरेच मित्र आधीपासूनच एमपीएससीची तयारी करत होते. म्हणून अधून मधून ते त्यांची पुस्तक वाचायचे व त्यातूनच त्यांना असे वाटू लागले की आपण देखील हे करू शकतो. यामध्ये आपल्याला देखील आवड आहे. या वातावरणात राहून त्यांनी एमपीएससी करण्याचा निर्णय घेतला. परंतु एक अडचण म्हणजे अशी होती की त्यांच्या जॉब चा दोन वर्षांचा बॉन्ड होता आणि त्यांना एकच वर्ष झालेलं होतं त्यामुळे 3 लाख रुपये परत देऊन पुन्हा अपयश आल्यास आपण काय करू? हे त्यांच्या मनात विचार चालू होते, परंतु अशातच त्यांनी कम्बाईन(MPSC  subordinate services combined group B) परीक्षेचा Attempt दिला होता आणि त्यामध्ये त्यांना यश मिळालं होतं. त्यामुळेच त्यांना असं वाटू लागलं की, आपण काहीही अभ्यास न करता जर ही परीक्षा पास होऊ शकतो, तर आपण पूर्णवेळ अभ्यास केल्यानंतर नक्कीच राज्यसेवा(MPSC state service) पास होऊ. त्यामुळे त्यांनी Calculated Risk घेऊन जॉब सोडण्याचा निर्णय घेतला.

जॉब सोडण्याच्या दोन-तीन महिने आधी त्यांनी एमपीएससी परीक्षा नेमकी काय आहे(SyllabusBook ListQuestion Papers) या विषयी सर्व माहिती घेऊन नंतरच जॉब सोडण्याचा निर्णय घेतला होता.


जॉब सोडल्यानंतर त्यांनी त्यांच्या मित्रांसोबत पुण्यामध्ये अभ्यास सुरू केला. परंतु अभ्यास सुरू केल्यानंतर दोन-तीन महिन्यांनी एक गोष्ट घडली. त्यांच्या वडिलांना पॅरॅलिसिस चा अटॅक आला. आणि त्यांना पाच दिवस आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. आणि या वेळेमध्ये प्रसाद सर त्यांच्यासोबत होते. या गोष्टींमुळे मनात विचारांचं वादळ सुरू होऊन आपण जॉब सोडून चुकीचा निर्णय घेतला आहे का अशी त्यांना शंका आली आणि या विचारांतून ‘आपण एमपीएससी नक्की पास करायची’ असा त्यांनी मनोमनी निर्धार केला. जे काही करायचं आहे ते याच Attempt मध्ये करायच आहे.

पूर्व परीक्षा देण्याआधी त्यांना पूर्व परीक्षेविषयी Confidence होता आणि पूर्व परीक्षा अगोदरच मुख्य परीक्षेचा काही विषयांचा अभ्यास झाल्यामुळे मनामध्ये एक वेगळाच आत्मविश्वास होता, Prelims परीक्षा दिल्यानंतर अतिशय चांगला Score आला होता. (see prasad sir marksheet) व दुसऱ्याच दिवसापासून मुख्य परीक्षेसाठी अभ्यास सुरू केला. Mains चा  60 टक्के अभ्यास अगोदरच झाला होता राहिलेला 40 टक्के त्यांनी नंतर दोन महिन्यांमध्ये कव्हर केला. आणि नंतरचे दोन महिने पूर्णपणे रिविजन केली. ते सांगतात की ‘या परीक्षेमध्ये जर तुम्हाला म्हणायचं असेल तर रिव्हिजन करणे अतिशय महत्त्वाचे आहे’.

मुख्य परीक्षादेखील confidence  ने त्यांनी दिलेली होती आणि त्यानंतर त्यांनी score जवळपास 480 एवढा येईल असं predict केलं होतं. पहिल्या उत्तर तालिका नंतर त्यांना 481 मार्क आले होते. 

त्यानंतर त्यांनी इंटरव्यू च्या सरावासाठी पुण्यामध्येच mock इंटरव्यू दिले आणि इंटरव्यू मध्ये कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारतील याविषयी त्यांनी एक basic idea अगोदरच घेतली होती आणि त्यानुसार त्यांना इंटरव्यू मध्ये प्रश्न विचारण्यात आले आणि इंटरव्यू देखील चांगला गेला.

इंटरव्यू दिल्यानंतर त्यांना असे वाटत होते की, आपण पहिल्या तीन टॉपर मध्ये नक्की येऊ असा मनोमनी आत्मविश्वास वाटत होता.

19 जून ला त्यांना त्यांच्या मित्राचा  call आला आणि तो सांगू लागला की तू महाराष्ट्र (prasad chaugule 1st in MPSC in Maharashtra) मध्ये पहिला आला आहेस. हे माहीत होता क्षणी त्यांनी प्रथमता स्वतः चेक केले आणि त्यांच्या आईला सांगितले, आईच्या डोळ्यात आनंदाश्रू आले . वडिलांना देखील खूप आनंद झाला.

त्यांच्या प्रयत्नांना यश आलं होतं.

प्रसाद सर आपल्याला सांगतात-

  1. स्पर्धा परीक्षा या क्षेत्रात उतरताना प्रथमता स्वतःचे analysis करा.
  2. आपल्यामध्ये काय कमी आहे? स्पर्धा परीक्षांसाठी आपल्याला काय करावे लागेल हे लक्षात घ्या.
  3. अभ्यास सुरू करण्यापूर्वी प्रथम त्या specific exam ची सर्व माहिती जाणून घ्या, प्रश्न कुठले येतात अभ्यास कोणता करावा लागेल etc
  4. कोणतीही पूर्वतयारी न करता स्पर्धा परीक्षा क्षेत्रात उतरू नका. हे तुमच्यासाठी खूप धोक्याचे ठरू शकते.
  5. स्वतःच्या क्षमता ओळखा आणि स्वतः मध्ये किती प्रयत्न शक्ती, इच्छाशक्ती आहे हे ओळखा.
  6. स्वतःला ठरवलेला वेळ द्या आणि त्या वेळे मध्येच जे काही करायचे आहे ते करा.
  7. जरी तुम्हाला या क्षेत्रामध्ये यश आले नाही तरी इतर भरपूर क्षेत्र आहे ज्यामध्ये तुम्ही खूप काही चांगले करू शकता.
तुम्ही देखील MPSC ची तयारी करत असाल तर खालील links तुमच्यासाठी महत्वाच्या असू शकतात.

Thank you for visiting.

0 thoughts on “रिस्क घेऊन नोकरी सोडली – आज उपजिल्हाधिकारी | Prasad Chaugule MPSC success story”

Leave a Comment