नमस्कार मित्रांनो एमपीएससी द्वारा राज्य कर निरीक्षक हे पद भरले जाते. एमपीएससी मध्ये दोन हजार एकोणवीस या वर्षांमध्ये एकूण 35 राज्य कर निरीक्षक या पदांसाठी जाहिरात आलेली होती. या पदाच्या पूर्व आणि मुख्य परीक्षा वेळेवर न झाल्यामुळे निकालास विलंब झाला. एमपीएससीने नव्याने सुरू केलेल्या opting out ऑप्शन मुळे बऱ्याच उमेदवारांना फायदा झाला.
राज्य कर निरीक्षक हे महाराष्ट्र शासनातील गट ब संवर्गाचे पद आहे. एमपीएससी मधील सर्वात दर्जेदार हे पद मानले जाते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगा द्वारा एमपीएससी राजपत्रित संयुक्त गट ब परीक्षा घेतली जाते त्या परीक्षेमधून राज्य कर निरीक्षक या जागा भरल्या जातात.
या निकालामध्ये महाराष्ट्र राज्यात प्रथम अनिकेत पाटील सर आहेत आणि मुलींमधून आशा घुले मॅडम प्रथम आहेत. अनिकेत पाटील सरांना मुख्य परीक्षेमध्ये एकूण 143 गुण आहेत.
2019 मध्ये 35 जागांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. त्या परिस्थितीत जागांमध्ये निवड झालेल्या उमेदवारांची यादी खाली दिलेली आहे.
तसेच इतर निवड न झालेल्या उमेदवारांना राज्य कर निरीक्षक मुख्य परीक्षेमध्ये किती गुण मिळाले हे देखील तुम्ही बघू शकतात खाली पीडीएफ दिलेली आहे.
ज्यांचे सिलेक्शन झाले त्या सर्वांचे अभिनंदन आणि ज्यांचे नाही झाले त्यांना पुढील भविष्यासाठी शुभेच्छा. धन्यवाद.