मराठी म्हणी व अर्थ | Marathi Mhani ani Arth | Marathi Grammar

मराठी म्हणी व अर्थ: मराठी व्याकरणाचा अभ्यास करताना आपल्याला शब्दसंग्रह वाचावा लागतो त्यामुळे मराठी म्हणी अतिशय महत्त्वाच्या आहे कोणत्याही परीक्षेमध्ये किंवा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण म्हणींचा वापर करत असतो त्यामुळे मराठी म्हणी व अर्थ येथे खाली देण्यात आलेले आहे 200 पेक्षा जास्त म्हणी आहेत. तुम्ही या म्हणी काळजीपूर्वक वाचून त्यांचा अर्थ नीट जाणून घ्या जेणेकरून कुठल्याही परीक्षेमध्ये प्रश्न विचारल्यास तुम्हाला त्याचा परिपूर्ण अर्थ माहित होईल.

मराठी म्हणी व अर्थ

क्र..म्हणीअर्थ
1 अति तेथे माती कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो.
2 अति शहाणा त्याचा बैल रिकामा अति शहाणपण नुकसानकारक ठरते.
3 असतील शिते तर जमतील भुते आपल्याजवळ पैसे असे तोवर मित्रांची वाण नसते.
4 अंथरूण पाहून पाय पसरावे आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च ठेवावा.
5 अडला नारायण गाढवाचे पाय धरी थोर माणसांनाही प्रसंगी मूर्खांची मनधरणी करावी लागते.
6 आयत्या बिळावर नागोबा दुसऱ्याच्या श्रमाचा फायदा स्वतःसाठी करून घेणे.
7 आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे अपेक्षेपेक्षा किती तरी अधिक फायदा होणे.
8 असंगासी संग आणि प्राणाशी गाठ दुर्जन माणसाशी संगत केल्यास प्रसंगी जीवालाही धोका निर्माण होतो.
9 आधी पोटोबा मग विठोबा प्रथम पोटाची सोय पहावी; नंतर देवधर्म करावा.
10 आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास एखादी गोष्ट करायला अनुत्सुक माणसाला न करायला नेमके कारण सापडते.
11 आडात नाही तर पोहऱ्यात कोठून येणार ? स्वतःजवळ नाहीतर तो दुसऱ्यास काय देणार ?
12 अंगापेक्षा बोंगा मोठा खऱ्या गोष्टीपेक्षा त्याचे अवडंबरच मोठे.
13 आपला हात जगन्नाथ आपल्याला घेण्याची संधी मिळताच मुबलक घेणे.
14 इकडे आड तिकडे विहिर दोन्ही बाजूंनी अडचणीत सापडणे
15 आंधळे दळते नि कुत्रे पिठं खाते एकाने मेहनत करायची व दुसऱ्याने त्याचा फायदा घ्यायचा.
16 उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग उतावळपणानेमूर्खासारखे वर्तन करणे.
17 उचलली जीभ लावली टाळ्याला अव्चाराने वागणे .
18 उथळ पाण्याला खळखळाट फार अंगी गुण श्रोडे असणारा बढाई मारतो.
19 उंदराला मांजर साक्ष वाईट कृत्य करत असताना एकमेकांना साक्ष देणे.
20 एक ना धड भाराभर चिंध्या एकाच वेळी अनेक गोष्ठी केल्याने सर्वच गोष्टी अर्धवट राहतात.
21 एका हाताने टाळी वाजत नाही भांडणातील दोष एकाच पक्षाकडे असतं नाही.
22 एका किंवा एकाच माळेचे मणी सगळीच माणसे सारख्या स्वभावाची.
23 ऐकावे जनाचे करावे मनाचे अनेकांचा सल्ला घ्यावा पण स्वतःला पटेल तेच करावे.
24 करावे तसे भरावे वाईट कृत्य करणाऱ्यास त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात.
25 कर नाही त्याला*डर कशाला ? निरपराधी माणूस निर्भय असतो.
26 कसायाला गाय धार्जिणी दुष्ट व कठोर माणसांशी सर्व लोक नम्रतेने वागतात.
27 कानामागून आली आणि तिखट झाली श्रेष्ठापेक्षा कनिष्ठ मार्णसाने वरचढ ठरणे.
28 काप गेले नि भोके रांहिली वैभव जाऊन त्याच्या फक्त खुणा राहिल्या.
29 काखेत कळसा आणि गावाला वळसा हरवलेली वस्तू जवळ असताना सर्वत्र शोधत राहणे.
30 कामापुरता मामा काम साधण्यासाठी गोड बोलणारी व्यक्ती.
31 कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही क्षुद्र माणसांच्या निंदेने. थोरांचे नुकसान होत नाही.
32 कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ आपल्याच जातीतला फितुरीमुळे आपला घात करतो.
33 कोळसा उगाळावा तितका काळांच वाईट गोष्ट कितीही तपासली तरीही त्यांतून वाईटच निघणार.
34 कोल्हा कांकडीला राजी क्षुद्र माणसे क्षुल्लक गोष्टीने संतुष्ट होतात.
35 खाई त्याला खवखवे वाईट काम करणाऱ्याच्या मनात भीती असते.
36 खाण तशी माती आईवडीलांप्रमाणे त्यांच्या मुलांची वर्तणूक हृअसते.
37 खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी परिस्थितीशी जुळवून न घेता स्वतःच्या हट्टी मताप्रमाणे वागणारा.
38 खायला काळ भुईला भार निरूद्योगी मनुष्य सर्वांना भारभूत होतो.
39 खोट्याच्या कपाळी गोटा वाईट काम करणाऱ्याचेच नुकसान होते.
40 गरज सरो वैद्य मरो गरज संपल्यावर उपकारकर्त्याला विसरणे.
41 गर्जेल तो पडेल काय ? केवळ बडबड करणाऱ्या माणसाकडून काहीच होत नाही.
42 गर्वाचे घर खाली घमेंडखोर माणसावर नाचक्कीची वेळ येते.
43 गाढवाला गुळाची चव काय ? मूर्खाला चांगल्या गोष्टीची किंमत कळत नाही.
44 गुरूची विद्या गुरुला फळली एखादयाचा डाव त्याच्यारच उलटणे.
45 गाढवापुढे वाचली गीता कालचा गोंधळ बरा होता मूर्खाला केलेला उपदेश निष्फळ ठरतो.
46 गाड्याबरोबर नळ्याची यात्रा मोठ्यांच्या आश्रयाने लहानांचाही फायदा होतो.
47 गाढवांचा गोंधळ, लाथांचा सुकाळ मूर्ख लोक एकत्र आल्यास मूर्खपणाचीच कृत्यं करणार.
48 गोगल गाय अन्‌ पोटात पाय एखाद्याचे खरे स्वरूप न दिसणे.
49 घरोघरी मातीच्या चुली सर्वत्र सारखीच परिस्थिती.
50 घर फिरले म्हणजे घराचे वासेही फिरतात प्रतिकूल परिस्थितीत सारेच उलट वागू लागतात.
51 घरचे झाले थोडे, व्याह्याने धाडले घोडे स्वतःच्या कामाचा व्याप असताना दुसऱ्याने आपलेही काम लादणे.
52 चार दिवस सासूचे चार दिवसं सुनेचे प्रत्येकाला अधिकार गाजविण्याची आयुष्यात संधी मिळतेच.
53 चोराच्या मनात चांदुणे वाईट काम करणाऱ्याच्या मनात भीती असते.
54 चोराच्या उलट्या बोंबा स्वतःच गुन्हा करून दुसऱ्याला दोष देणे.
55 चोर सोडून संन्याशाला सुळी देणे खऱ्या अपराध्याला सोडून निरपराधी माणसाला शिक्षा देणे.
56 चोराच्या हातची लंगोटी लबाड कंजूषाकडूंन थोडे मिळाले तरी भाग्याचे.
57 जळात राहून माशाशी वैर सहवासात रहायच्या व्यक्तीशी वैर करू नये.
58 जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही मुळचा स्वभाव आयुष्यात कधीच बदलत नाही.
59 ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी एकमेकांची वर्मे ठाऊक असणाऱ्या माणसांशी गाठ पडणे.
60 ज्याच्या हाती ससा तो पारधी ज्याला यश आले तो कर्तबगार.
61 ज्याचे करावे बरे तो म्हणतो आपलेच खरे एखाद्याचे भले करायला जावेतर तोत्या गोष्टीस हेकेखोरपणे विरोध करतो.
62 ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी उपकारकर्त्याचे उपकार स्मरून. त्याची बाजू घेणे.
63 झाकली भूठ सव्वा लाखाची व्यंग गुप्त ठेवणेच फायदेशीर असते , मौन पाळून अब्रू राखणे.
64 टाकीचघाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही कष्ट सोसल्याशिवाय मोठेपणा प्राप्त होत नाही.
65 डोळ्यात केर आणि कानात फुंकर रोग एका जागी पण इलाज दुसरीकडे कंरणे.
66 तळे राखी तो पाणी चाखी स्वाधीन केलेल्या गोष्टींचा तो थोडा तरी फायदा घेतोच.
67 ताकापुरते रामायण एखाद्याकडून आपले काम होईपर्यंत त्याची खुशामत करणे.
68 तेरड्याचा रंग तीन दिवस एखाद्या गोष्टीचे नावीन्य अल्पकाळच टिकते.
69 तेल गेले, तुप गेले, हाती धुपाटणे आले फायद्याच्या दोन्ही गोष्टी मूर्खपणामुळे हातच्या जाऊन क्षुल्लकगोष्टयेणे.
70 थेंबे थेंबे तळे साचे थोड्या थोड्या बचतीचा कालांतराने मोठा संचय होतो.
71 दगडापेक्षा वीट मऊ मोठ्या संकटापेक्षा लहान संकट सुसह्य वाटते.
72 दाम करी काम पैशाने सर्व कामे साध्य होतात.
73 दिव्याखाली अंधार मोठ्या माणसांत देखील दोष असतात.
74 दुरून डोंगर साजरे दुरून चांगल्या दिसणाऱ्या गोष्टींचे खरे स्वरुप जवळून समजते.
75 दुष्काळात तेरावा महिना अगोदरच्या संकटात आणखी भर.
76 दुभत्या गाईच्या लाथा गोड ज्याच्यापासून लाभ होतो त्यांचा त्रासही माणूस सहन करतो.
77 देश तसा वेश परिस्थितीनुसार वागणे विल्या .
78 दे माय धरणीं ठाय पुरे पुरेसे होणे.
79 देव तारी त्याला कोण मारी देवं पाठिराखा असलेल्याचे कोणीही नुकसान करू शकणार नाही.
80 दोन्ही घरचा पाहुणा उपाशी दोन्ही गोष्टींवर अवलंबून असणाऱ्याला कोणतीच गोष्ट मिळत नाही.
81 दोघांचे भांडण तिसऱ्याचां लाभ दोघांच्या वादात तिसऱ्या व्यक्तीचा फायदा होतो.
82 देखल्या देवा दंडक्त एखादी व्यक्तीच सहजगत्या भेटली म्हणून केवळ तिची विचारपूस करणे.
83 दैव देते आणि कर्म नेते सुदैवाने,लाभलेली वस्लू नियतीने गमावून बसणे.
84 दृष्टी आड सृष्टी आपल्यामागे जे काय चालते त्याकडे दुर्लक्ष करणे.
85 न कर्त्याचा वार शनिवार न करायंचे काम सबबी सांगून टाळणे.
86 नव्याचे नऊ दिवस नवीन गोष्टीचे काही दिवस कौतुक होते.
87 नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्ने दोषयुक्त कामात अनेक अडचणी येतात.
88 नाचता येईना अंगण वाकडे उणिवा झाकण्यासाठी दुसऱ्या वस्तूला नावे ठेवणे.
89 नावडतीचे मीठ अळणी नावडत्या व्यक्तीाने केलेली चांगली गोष्ण्ी वाईट वाटते.
90 नाव मोठे लक्षण खोटे भपका मोठा पण वस्तुस्थिती नेमकी उलटी.
91 नाव सोनुबाई हाती कथलाचा वाळा नाव मोठे पण कर्तृत्व कमी प्रतीचे.
92 नाक दाबले की तोंड उघडते अडवणूक करून काम साधणे.
93 नाकापेक्षा मोती जड मालकापेक्षा नोकर शिरजोर, कुवतीपेक्षा अवघड कामगिरी स्वीकारणे.
94 नवी विटी नवे राज्य सगळीच परिस्थिती नवीन असणे.
95 पदरी पडले पवित्र झाले स्वीकारलेल्या बाबीला नावे न ठेवता समाधान मानणे.
96 पळसाला पाने तीनच कोठेही गेले तरी मनुष्य स्वभाव सारखाच.
97 पाचामुखी परमेश्व र पुष्कळ लोक बोलतात ते खरे मानावे.
98 पी हळद अनू हो गोरी एखाद्या कृत्याचा त्वरीत लाभ मिळावा अशी अपेक्षा करणे.
99 पालथ्या घागरीवर पाणी केलेला उपदेश वाया जाणे.
100 पुढच्यास ठेच मागचा शहाणा दुसऱ्याच्या अनुभवातून आपण धडा घेणे.
101 पुराणातील वांगी पुराणात उपदेशाप्रमाणे वर्तन नसणे.
102 पेरावे तसे उगवते चांगल्या किंवा वाईट कृत्याप्रमाणे त्याचे तसे फळ मिळते.
103 प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्नांती असाध्य गोष्ट साध्य करता येते.
104 बडा घर पोकळ वासा दिसायला श्रीमंती परंतु प्रत्यक्षात तिचा अभाव.
105 बळी तो कान पिळी शक्तीमान मनुष्य दुसऱ्यावर अधिकार गाजवतो.
106 बाप तसा बेटा बापाचे गुणावगुण मुलाच्या अंगी असणे.
107 बुडत्याचा पाय खोलात अधोगती होऊ लागली की अनेक बाजूंनी होते.
108 बुडत्याला कडीचा आधार संकटात थोडीशी मदत देखील महत्वाची वाटते.
109 बैल गेला नि झोपा केला हानी झाल्यावर संरक्षणाची तयारी व्यर्थ.
110 भरवशाच्या म्हशीला टोणगा ज्याच्या विषयी अपेक्षा आहेत अशा व्यक्तीेने संपूर्ण निराशा करणे.
111 भित्या पाठी ब्रह्मराक्षस भित्र्या माणसावरच संकटे कोसळतात.
112 भीक नको, पण कुत्रं आवरं एखादयाने कार्यास मदत केली नाही तरी चालेल पण त्या कार्यात विघ्न न आणू नयेत अशी स्थिती.
113 भुकेला कोंडा निजेला धोंडा अतिशय गरज असली म्हणजे काहीही चालते.
114 मनी वसे ते स्वप्नी दिसे जसा विचार तशी स्वप्ने पडणे.
115 मांजरांच्या गळ्यात घंटा कोणी बांधावी ? जोखमीचे काम करण्यास कोणी पुढे सरसावत नाही.
116 मनात मांडे पदरात धोंडे केवळ दिवास्वप्न पाहून प्रत्यक्षात काही मिळत नाही.
117 मुलाचे पाय पाळण्यात दिसतात भविष्यात कोण होणार याचा अंदाज बालपणी बांधता येतो.
118 मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये कोणाच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ नये.
119 यथा राजा तथा प्रजा प्रमुख व्यक्तीणच्या वर्तणुकीचा त्याच्या हाताखालच्या व्यक्तीोवर प्रभाव पडतो.
120 रात्र थोडी सोंगे फार कामे पुष्कळ त्यामानाने वेळ थोडा.
121 रोज मरे त्याला कोण रडे वारंवार घडणाऱ्या गोष्टीविषयी स्वारस्य उरत नाही.
122 लहान तोंडी मोठा घास आपली योग्यता नसताना मोठ्यांस सल्ला देणे.
123 लेकी बोले सुने लागे एखादयाला उद्‌देशून पण दुसऱ्याला लागेल असे बोलणे.
124 वराती मागून घोडे काम पूर्ण झाल्यावर मदतीस येणे, एखादी गेष्ट घडून गेल्यावर मदतीस येणे.
125 वड्याचे तेल वांग्यावर एकाबद्‌दल दुसऱ्यास दोष देणे.
126 वासरांत लंगडी गाय शहाणी मूर्ख माणसांत थोडेसे ज्ञान असलेला शहाणा ठरतो.
127 शहाण्याला शब्दांचा मार सूज्ञ माणूस सूचना देऊनही सुधारतो.
128 शेंडी तुटो की पारंबी तुटो पक्का निश्चय करणे.
129 शेरास सव्वाशेर सामर्थ्यवान माणसाला गर्व उतरवणारा अधिक बलवान माणूस भेटतो.
130 शितावरून भाताची परीक्षा वस्तूच्या लहानशा भागावरून संपूर्ण वस्तूची परीक्षा करणे.
131 सगळे मुसळ केरात मुख्य बाबीकडे दुर्लक्ष केल्यास सर्व श्रम वाया जाणे.
132 सरड्याची धाव कुंपणापर्यंत प्रत्येक गोष्टीची मर्यादा ठरलेली असते.
133 साखरेचे खाणार त्याला देव देणार सुदैवी माणसाला कशाचीही उणीव पडत नाही.
134 सुंभ जळाला तरी पीळ जात नाही हट्टापायी नुकसान झाले तरी त्याचा हट्टीपणा जात नाही.
135 सुंठीवाचून खोकला जाणे उपचाराशिवाय दोष निवारण होणे.
136 हलवायाच्या घरावर तुळशीपत्र आपली नसलेल्या वस्तूचे दान करणे, परस्पर दुसऱ्याची वस्तू तिसऱ्याला देणे.
137 हत्ती गेला शेपूट राहिले बहुतेक काम पूर्ण होऊन थोडेसे शिल्लक राहणे.
138 हातच्या काकणाला आरसा कशाला प्रत्यक्ष दिसणाऱ्या गोष्टीला पुराव्याची गरज नसते.
139 हाजीर तो वजीर वेळेवर हजर राहणाऱ्याला लाभ होतो.
140 हातचे सोडून पळत्याच्या पाठी लागणे सहज साध्य सोडून अशक्य गोष्टीच्या मागे लागणे.

Leave a Comment