डॉ पंजाबराव देशमुख: डॉ पंजाबराव देशमुख यांचा जन्म 27 डिसेंबर 1998 मध्ये अमरावती जिल्ह्यात पाबळ येथे झाला. त्यांचे मूळ आडनाव कदम हे होते. त्यांनी प्राथमिक शिक्षण पाबळ येथे पूर्ण केले आणि पुढील शिक्षण जून 1915 मध्ये हिंदू हायस्कूल अमरावती येथे पूर्ण केले. त्यांना मध्यप्रदेश सरकारची १४ रुपयाची शिष्यवृत्ती मिळाली आणि 1918 मध्ये ते महाविद्यालय शिक्षणासाठी पुण्याला गेली व फर्ग्युसन कॉलेज पुणे येथे प्रवेश घेतला. महाविद्यालयीन काळामध्ये मराठा विद्यार्थी संघ व सीपी बेगर स्टुडन्ट असोसिएशनची स्थापना केली.1920 साली उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेले त्यांना हॉकी आणि टेनिस ची आवड होती, केंब्रिज विद्यापीठात बॅरिस्टर साठीच्या परीक्षेसाठी बसण्यासाठीची प्राथमिक परीक्षा पंजाबराव उत्तीर्ण झाले व बॅरिस्टर साठी प्रवेश मिळाला.
1921 मध्ये एम ए संस्कृत विषयामध्ये ऑनर्सला एडीबरो विद्यालयात प्रवेश घेतला व 1923 ला परीक्षा पास झाले. त्यावेळी त्यांना शंभर पोंडांची व्हॅन्स डनलॉप संस्कृत रिसर्च स्कॉलरशिप मिळाली.
1926 मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठाने डॉक्टर पंजाबराव देशमुख यांना वैदिक साहित्यातील धर्माचा उगम व विकास या विषयासाठी डॉक्टरची डी फिल्म पदवी दिली. पंजाबरावांनी बॅरिस्टर होण्याची प्रेरणा रामराव देशमुख यांच्याकडून घेतली होती त्यांनी मुंबई येथे जातीने सोनार असलेल्या विमलाबाई वैद्य यांच्याशी 25 नोव्हेंबर 1927 रोजी सत्यशोधक पद्धतीने आंतरजातीय विवाह केला कृष्णाबाई बोरकर व गुलाबराव बसू यांनी हा विवाह जमविला.
स्वामी श्रद्धानंद वसतिगृह १९२७
- पंजाबरावांचा सरकारी नोकरी करायला विरोध असल्याने ते अमरावती कोर्टात वकिली करू लागले आणि कोर्टातील कामे संपली की ते शिवाजी हायस्कूलमध्ये जाऊन संस्कृत गणित भूगोल शिकवीत. भाऊराव पाटील यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांनी १९२७ साली श्रद्धानंद वसतिगृहाची स्थापना केली.
- 1926 मध्ये स्वामी श्रद्धा आनंद यांचा खून झाला होता व ते आर्य समाजाचे समर्थक होते. ते वस्तीगृह सर्व जाती-धर्मांच्या मुलांसाठी खुले होते.
श्री शिवाजी व्यायाम प्रसारक मंडळ 1926
- 1914 पासून अमरावतीत हनुमान व्यायाम शाळा वैद्य बंधू व मोहोळ बंधू चालवीत. पंजाबरावांनी मोहोळ बंधूंच्या मदतीने 1926 ला दसऱ्याच्या मुहूर्तावर श्री शिवाजी व्यायाम प्रसारक मंडळ स्थापन केले.
अंबादेवी मंदिर सत्याग्रह 1927
- अमरावती येथील अंबादेवीचे मंदिर अस्पृश्यांसाठी खुले व्हावे यासाठी अस्पृश्य समाज प्रयत्नशील होता म्हणून पंजाबराव देशमुख यांनी सत्याग्रहात भाग घेण्यापूर्वी विविध रावसाहेब रणदिवे नाना अमृतकर दलपसिंह यांची एक कमिटी नेमली. या कमिटीने व पंजाबरावांनी तेथे मंदिर प्रवेशा संदर्भात जनतेत जागृती निर्माण केली.
- 1927 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यक्षतेत विदर्भ प्रांतिक परिषद आयोजित केली. दादासाहेब खापर्डे यांनी तीन महिन्यात देवस्थान कमिटीचे सदस्याचे मन वळून ते अस्पृश्यासाठी खुले केले.
जिल्हा कौन्सिलचे अध्यक्षपदी 1928
- रामराव देशमुख यांच्या मध्य प्रांत वराडचे मंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर जिल्हा कौशलचे अध्यक्ष पद रिकामी झाले. त्यासाठी पंजाबराव देशमुख यांचे नाव पुढे आले व राष्ट्रीय पक्षातर्फे दादासाहेब शेवडे यांच्यात लढत झाली व पंजाबराव देशमुख यामध्ये विजयी झाले.
- सार्वजनिक शिक्षण स्वस्त व सुलभ करणे हा अध्यक्ष पदावरील त्यांचा पहिला उपक्रम होता व त्यासाठी सविस्तर शिक्षणाचा आराखडा त्यांनी मांडला. त्यांनी अकरा वर्षापर्यंतच्या मुला मुलींना प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले आणि पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी घेतला अस्पृश्यांसाठी स्वतंत्र विहिरी बांधल्या त्यांनी अस्पृश्यांसाठी त्यांचे मोलाचे योगदान दिले. 1930 मध्ये क्रांती कायदे मंडळाचे निवडणुकीत पंजाबराव देशमुख यांनी रामराव देशमुख यांचा 800 मतांनी पराभव केला.
शिवाजी शिक्षण संस्था 1932
- शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना 1932 मध्ये 1 जुलै रोजी झाली. या संस्थेचे संस्थापक पंजाबराव देशमुख हे आहेत. या संस्थेचा जन्म खामगाव येथील अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या अधिवेशनामध्ये झाला.
अमरावती येथे विदर्भ मराठा शिक्षण मंडळ स्थापना झाली व या संस्थेने मराठा हायस्कूल स्थापन केले. - 1932 मध्ये विदर्भ शिक्षण मंडळ हे नाव बदलून त्याऐवजी श्री शिवाजी शिक्षण सोसायटी हे नाव दिले.
- स्त्रियांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी श्री शिवाजी शिक्षण संस्थेने वरुड येथे पार्वतीबाई धर्माधिकारी कन्या शाळा स्थापली व स्त्री शिक्षण क्षेत्रात प्रवेश केला.
- पंजाबरावांनी अमरावती येथे 1952 मध्ये कस्तुरबा कन्या शाळा सुरू केली आणि १९५३ साली पंजाब रावांनी श्रद्धानंद वस्तीगृहाची कन्या शाळा स्थापली. देवास संस्थानात कार्य – देवा संस्थानाचे संस्थानिक राजसाहेब पवार यांनी बंजारा देशमुख यांची मध्य भारत वर्णन संस्थांच्या संघटना या संघटनेच्या सल्लागार पदी निवड केली व संस्थानाचा राजकीय मंत्री नेमले.
डॉ पंजाबराव देशमुख यांचे शेतीविषयक कार्य
- पंजाबराव देशमुख यांनी शेतकरी संघाची स्थापना 1927 मध्ये गेली आणि शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी एखादी संघटना असावी या विचारांमधून त्यांनी 1927 मध्ये शेतकरी संघ ची स्थापना केली.
- शेतकरी संघाचे अध्यक्ष बॅरिस्टर एन एम देशमुख होते कार्यवाहक अध्यक्ष पंजाबराव देशमुख होते. उपाध्यक्ष अड चौबळ चिटणीस बाबासाहेब खेडकर हे होते. पंजाब रावांनी शेतकरी संघाचे विचार प्रसारासाठी महाराष्ट्र केसरी वृत्तपत्र सुरू केले.
- पंजाबरावांनी भाताचे उत्पादन वाढवण्यासाठी जपानी पद्धतीचा प्रयोग केला आणि त्यांची निवड कृषी मंत्री पदी 1952 मध्ये झाली. भारत कृषक समाज पंजाबराव देशमुख यांनी 7 फेब्रुवारी 1955 मध्ये भारत कृषक समाजाची स्थापना केली.
- या समाजाचा उद्देश शेतकऱ्यांना शेतीविषयक नवीन माहिती देणे आधुनिक पद्धतीच्या शेतीची माहिती देणे शेतकऱ्यांच्या सर्व समस्यांचा आढावा घेणे कृषी विषयक प्रदर्शनी संमेलने भरवणे शेतीविषयक धोरणे ठरवणे
- समाजाने शेतकऱ्यांसाठी विमा योजना सुरू केली समाजामार्फत राष्ट्रीय कृषी सहकारी खरेदी विक्री संघ कृषी सहकारी अधिकोष व ऑफरो आशियाई ग्रामीण पुनर्रचना संघटना स्थापल्या. 1960 साली भारत कृषक समाजाच्या वतीने दिल्लीमध्ये पहिले जागतिक कृषी प्रदर्शन भरविले.
पंजाबराव देशमुख यांच्या बद्दल केलेले गौरवोद्गार
- “साधे कायदे साधी शिष्टाचार व सरळ माणसे हवीत ते तिन्ही गुण असलेले डॉक्टर पंजाबराव हे कदाचित भारतात या युगातील एकमेव माणूस असतील” – महात्मा गांधी
- “भारतात हरिजन जातीव्यतिरिक्त दुर्लक्षित व असाय अशा आणखी जाती आहेत याची जाणीव घटना समितीला पंजाबरावामुळे झाली. त्यामुळे त्या जातीच्या प्रगतीसाठी काही तरतुदी करता आल्या.” -बाबासाहेब आंबेडकर
- “असा हा घटनेचा एक चिकित्सक शिल्पकार अमरावती परिसरात जन्माला येणे हे या भूमीचे भाग्य म्हणावे लागेल.” – डॉ राजेंद्रप्रसाद