महाराष्ट्र लोकसेवा आयोग आधारित परीक्षा घेण्यात येतात त्या सर्व परीक्षांसाठी 2019 मध्ये आयोगाने संधींची मर्यादा लागू केली होती.
यूपीएससीमध्ये ज्याप्रमाणे प्रवर्गानुसार संधींची मर्यादा ठरवून दिली होती त्याप्रमाणे एमपीएससीने संधीचे मर्यादा ठरवलेली होती.
आयोगाद्वारे काही जाहिरातींमध्ये खूप कमी पदांची संख्या दिलेली होती. त्यातल्या त्यात एमपीएससीने संधींची मर्यादा लागू केली . त्यामुळे महाराष्ट्रामध्ये पहिले येऊनही उमेदवारांना उपजिल्हाधिकारी तहसीलदार ही पदे मिळाली नाही. जसे प्रमोद चौगुले सर महाराष्ट्रात पहिले येऊन देखील त्यांना उपजिल्हाधिकारी हे पद मिळाले नाही. म्हणून परीक्षा देऊन इच्छित पद नाही मिळाले तर याला काही अर्थ नाही असे उमेदवारांचे म्हणणे आहे.
म्हणूनच उमेदवारांनी आयोगाला विविध निवेदने दिली. विविध माध्यमातून आयोगाशी संपर्क करून आयोगाला विद्यार्थ्यांची व्यथा सांगितली. त्यामुळे आयोगाने त्याचे उत्तर म्हणून समिती स्थापन करून त्या विषयी अहवाल दिला.
या अहवालामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोग एमपीएससी द्वारा घेतल्या जाणाऱ्या सर्व परीक्षांना संधींची मर्यादा रद्द करण्यात आलेली आहे. जोपर्यंत एखाद्या उमेदवाराची प्रवर्गानुसार वयोमर्यादा असेल तोपर्यंत तो उमेदवार एमपीएससीच्या सर्व परीक्षा देऊ शकतो आणि त्याची निवड होऊ शकते.
(MPSC attempt limit is cancelled from 2022 onwards)
उमेदवारांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे कारण खूप जणांना यामुळे अतिरिक्त संधी मिळणार आहेत.
मित्रांनो आयोगाने संधीची मर्यादा हटवली म्हणजे खूप वेळ एमपीएससी करत राहावं असं नाही तुम्ही स्वतःसाठी काही ठराविक वर्ष ठरवून द्या त्या वर्षांमध्ये खूप जास्त प्रयत्न करा तर यश नक्कीच तुमचे राहील