आर्थिक नियोजन ( economic planning ) for MPSC

नमस्कार मित्रांनो खाली तुम्हाला आर्थिक नियोजन या घटकावरील महत्त्वाच्या नोट्स अगदी मोफत मिळणार आहेत त्यामुळे तुम्ही संपूर्ण नोट्स वाचा आणि जर तुम्हाला त्या नोट्स ची पीडीएफ डाऊनलोड करायची असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.


प्रथमतः जर तुम्हाला लेक्चरचा व्हिडिओ बघायचा असेल तर खाली दिलेल्या व्हिडिओ वर क्लिक करा.



                                   ६. आर्थिक नियोजन
पूर्वनिर्धारीत सामाजिक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी देशातील संसाधनांना संघटित करून त्यांचा महत्तम लाभकारक उपयोग करण्याच्या दृष्टीने अवलंबिण्यात येणारी पद्धती म्हणजे आर्थिक नियोजन होय.



नियोजनाची प्रक्रिया:
१. देशातील संसाधनांचा आढावा घेणे
२. नियोजनाची उद्दिष्टे निश्चित करणे
३. संसाधनांचे वितरण
४. योजनेची अंमलबजावणी
५. मध्यवर्ती आढावा
६. पुनर नियोजन 

भारतातील आर्थिक नियोजन:
-1934 मध्ये एम विश्वेश्वरय्या यांनी प्लॅन इकॉनोमी फोर इंडिया या ग्रंथात नियोजनाची संकल्पना मांडली.
-1936 मध्ये त्यांनी नियोजन करा किंवा नष्ट व्हा असा संदेश दिला.
– 1938 मध्ये काँग्रेसच्या हरिपुरा अधिवेशनात पंडित नेहरूंच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय नियोजन समितीची स्थापना करण्यात आली.
– 1944 मध्ये आठ उद्योगपतींनी मिळून बॉम्बे प्लॅन तयार केला सर्वप्रथम मिश्र अर्थव्यवस्थेची संकल्पना यांमध्ये मांडण्यात आली.
– 1944 मध्ये श्री श्रीमान नारायण यांनी गांधी योजना तयार केली.
-एप्रिल 1945 मध्ये मानवेंद्रनाथ रॉय यांनी जनता योजना तयार केली.

नियोजन मंडळ:
स्थापना 15 मार्च 1950 शासनाचा भाग 1961.
स्वरूप असंविधानिक, अवैधानिक सल्लागार मंडळ
रचना सदस्य संख्या तसेच सदस्य पात्रता निश्चित नाही अध्यक्ष पंतप्रधान पदसिद्ध अध्यक्ष असतात उपाध्यक्ष पूर्णवेळ काम करणारे सदस्य असतात काही कॅबिनेट मंत्री असतात आणि काही अर्थतज्ञ व विचारवंत असतात .पंचवार्षिक योजना तयार करणे हे महत्त्वाचे कार्य आहे.

राष्ट्रीय विकास परिषद:
-स्थापना सहा ऑगस्ट 1952 ( पंचवार्षिक योजना तयार करण्याच्या प्रक्रियेत घटक राज्यांना सहभागी करून घेण्यासाठी)
-स्वरूप असंविधानिक अवैज्ञानिक अपेक्स पॉलिसी मेकिंग बॉडी.
-रचना 1967 पासून एन डि सी मध्ये खालील सदस्य असतात
पंतप्रधान सर्व केंद्रीय कॅबिनेट मंत्री घटक राज्याचे मुख्यमंत्री केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासक नियोजन मंडळाचे सर्व सदस्य.
वर्षातून कमीतकमी दोन सभा झाल्या पाहिजे.


Leave a Comment